समोसा विकून कोणी 40 कोटीच्या पुढे वार्षिक उलाढाल करू शकतो का? हो करू शकतो! बंगळुरूमधील एका तरुण जोडप्याने करून दाखवल शक्य

Ajay Patil
Published:
samosa sing

तुमचा व्यवसाय छोटा असो किंवा मोठा असो परंतु त्या व्यवसायाला जर कल्पकतेची जोड दिली व परिस्थितीनुसार आणि बाजारपेठेतील ग्राहकांच्या मागणीनुसार जर बदल करत गेले तर तो व्यवसाय कालांतराने खूप मोठा होतो व त्यामधून व्यक्ती लाखो-कोटींचा टर्न ओव्हर करायला लागतो.

सध्या भारतामध्ये स्टार्टअप्स सुरू करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे व यामध्ये कल्पकतेला खूप मोठी चालना मिळते व कल्पकतेच्या जोरावरच स्टार्टअप्सची उभारणी केली जाते. तसेच अशा उद्योगांना बँकांकडून आणि सरकारच्या अनेक योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाते.

यामध्ये असे अनेक तरुण-तरुणी आता नोकरीच्या मागे न लागता छोटे-मोठे व्यवसाय उभारून चांगल्या पद्धतीचा आर्थिक नफा देखील मिळवताना आपल्याला सध्या दिसून येत आहेत.

अगदी याच पद्धतीने जर आपण निधी सिंग व त्यांचा पती शिखर वीर सिंग यांची यशोगाथा पाहिली तर ती देखील थक्क करणारी आहे. हे जोडपे निव्वळ समोसे विकून वर्षाला 40 कोटीच्या पुढे उलाढाल करतात. नेमकी त्यांनी हे कसे शक्य केले? याबद्दलची माहिती आपण या लेखात बघू.

 वाचा समोसा सिंगची यशोगाथा

निधी सिंग आणि शिखर वीर सिंग यांच्या भेटीपासून यांचा जीवन प्रवास पाहिला तर जेव्हा हरियाणामध्ये बायोटेक्नॉलॉजी या विषयांमध्ये दोघेजण बी टेक करत असताना त्यांची भेट झाली व नंतर त्यांनी लग्न केले व आज त्यांच्या लग्नाला पाच ते सहा वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे.

शिखर वीर सिंग यांनी हैदराबादच्या इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्स मधून एम टेक केले आणि बायोकॉन या ठिकाणी प्रिन्सिपल सायंटिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. परंतु या नोकरीत मन लागत नसल्यामुळे 2015 या वर्षी त्यांनी नोकरीला रामराम ठोकला.

त्याचप्रमाणे शिखर यांच्या पत्नी निधी यादेखील एका फार्मा कंपनीमध्ये उत्तम पगाराच्या नोकरीवर काम करत होत्या. परंतु दोघांनी 2015 मध्ये नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय करावा हे दोघांच्याही मनात असल्यामुळे मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या सोडून आता व्यवसाय सुरू करावा म्हणून त्यांनी स्वतःची बचत वापरली व समोसा सिंग नावाचा व्यवसाय सुरू केला.

विशेष म्हणजे या व्यवसायासाठी त्यांनी स्वतःचे घर देखील विकले व व्यवसाय मोठा करण्यावर लक्ष केंद्रित केले. अशाप्रकारे समोसा सिंग या व्यवसायाची सुरुवात झाली.

 दररोज विकतात बारा लाखाचे समोसे

बेंगलोर मध्ये त्यांनी समोसा सिंग नावाचे फूड स्टार्टअप सुरू केले व आज त्यांचा हा व्यवसाय इतका प्रचंड वाढला आहे की, त्यांच्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 45 कोटी रुपयांच्या पुढे गेलेला आहे. विशेष म्हणजे बंगलोर मध्ये सुरू केलेला त्यांचा हा फूड स्टार्टअप समोसा सिंग एका दिवसाला 12 लाख रुपयांचे समोसे विकतो.

आपल्याला माहित आहे की, आज असा एकही व्यक्ती सापडणार नाही की त्याला समोसे आवडत नाही. हीच गोष्ट संधीमध्ये रूपांतर करून त्यांनी व्यावसायिक शिक्षण घेऊन चांगली नोकरी सोडली व हा फूड स्टार्टअप सुरू केला.

तसेच समोसा विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याच्या कल्पनेमागे एक गोष्ट कारणीभूत ठरली व ती म्हणजे एका फूड कोर्टबाहेर एका मुलाला समोसा खाण्यासाठी रडताना बघून व्यवसायाची कल्पना सुचली. आज त्यांच्या समोसा सिंग मध्ये कढई पनीर समोसा पासून  नूडल्स समोसापर्यंत असे अनेक प्रकारचे समोसे खायला मिळतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe