पोस्टाची ‘ही’ योजना आहे लयभारी! दिवसाला 333 रुपयांची बचत मिळवून देईल तुम्हाला 17 लाख रुपये; कसे ते वाचा?

गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर पोस्ट ऑफिस आणि बँकांच्या योजनांना प्राधान्य दिले जाते. यामध्ये विविध बँकांच्या मुदत ठेव योजना आणि पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव आणि त्यासोबतच बचत योजना ह्या खूप फायद्याच्या आहेत.

post office scheme

Post Office RD Scheme: गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर पोस्ट ऑफिस आणि बँकांच्या योजनांना प्राधान्य दिले जाते. यामध्ये विविध बँकांच्या मुदत ठेव योजना आणि पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव आणि त्यासोबतच बचत योजना ह्या खूप फायद्याच्या आहेत.

विशेष म्हणजे या योजनांमध्ये गुंतवणूक सुरक्षित राहतेच परंतु परतावा देखील चांगला मिळतो. कमीत कमी स्वरूपामध्ये तुम्ही गुंतवणूक करून लाखो रुपयांचा निधी या योजनांच्या माध्यमातून जमा करू शकतात. फक्त यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करताना गुंतवणुकीत सातत्य ठेवणे खूप गरजेचे असते.

पोस्ट ऑफिसच्या योजनांच्या दृष्टिकोनातून बघितले तर पोस्ट ऑफिस कडून अनेक बचत योजना चालवल्या जात असून यातील बहुतांश योजना या गुंतवणूकदारांच्या पसंतीस पडल्याचे आपल्याला दिसून येते.

अशाच प्रकारची पोस्ट ऑफिसची आकर्षक आणि गुंतवणूकदारांमध्ये प्रसिद्ध असलेली योजना बघितली तर ती म्हणजे पोस्ट ऑफिस आरडी स्कीम होय.या योजनेलाच पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम असे देखील म्हणतात. या लेखात आपण या योजनेबद्दलची माहिती थोडक्यात बघू.

 पोस्ट ऑफिस आरडी स्कीमचे स्वरूप कसे आहे?

पोस्ट ऑफिसची आरडी म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट स्कीम ही जोखीममुक्त स्कीम असून तुम्ही महिन्याला फक्त शंभर रुपयांची गुंतवणूक करून या योजनेत खाते उघडू शकतात. या योजनेमध्ये सिंगल किंवा जॉईंट म्हणजे संयुक्त खाते देखील उघडता येते.

सध्या या योजनेत तुम्हाला 6.8 टक्के वार्षिक दराने व्याज मिळेल. या योजनेमध्ये जर तुम्ही 333 रुपयाची दररोज बचत करून गुंतवणूक केली तर तुम्ही जवळपास 17 लाख 8 हजार 546 रुपये जमा करू शकता.

 दररोज 333 रुपयांची बचत मिळवून देईल तुम्हाला 17 लाख रुपये

पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये दररोज 333 रुपयांची बचत करून तुम्ही गुंतवणूक केली तर महिन्याला साधारणपणे तुमचे दहा हजार रुपये या योजनेमध्ये जमा होतात व एका वर्षात एक लाख वीस हजार रुपये या योजनेत तुम्ही जमा करतात.

पाच वर्षानंतर या योजनेत तुमची एकूण जमा रक्कम 5 लाख 99 हजार चारशे रुपये होते.या जमा रकमेवर 6.8% वार्षिक व्याजदर पकडला तर तुम्हाला व्याजापोटी एक लाख 15 हजार 427 रुपये मिळतात.

म्हणजेच पाच वर्षात तुम्हाला एकूण मुद्दल आणि व्याज मिळून सात लाख 14 हजार 827 रुपयांचा निधी मिळतो.पण पाचवर्षांऐवजी या योजनेत जर तुम्ही आणखीन पाच वर्षांनी वाढ केली

तर तुमचे एकूण दहा वर्षात बारा लाख रुपये जमा होतात व त्याला जर व्याज जोडले तर साधारणपणे दहा वर्षानंतर तुम्हाला 17 लाख 8 हजार 546 रुपये मिळतात. अशा पद्धतीने तुम्ही गुंतवणुकीत सातत्य ठेवून दररोज 333 रुपयांची बचत करून ती गुंतवली तर दहा वर्षात तुम्ही 17 लाख 8 हजार 546 रुपये मिळवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe