Tractor Queen Of India: ‘या’ महिला उद्योजकेला म्हटले जाते भारताची ‘ट्रॅक्टर क्वीन’! वाचा या उद्योजिकेची यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tractor Queen Of India :- महिला म्हटले म्हणजे घरकाम सांभाळणारी आणि मुलाबाळांमध्ये रमणारी ही जी काही संकल्पना होती ती आता काळाच्या ओघात मागे पडली असून महिला या आता प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपल्याला दिसून येत आहे.

मग ते उद्योग व्यवसाय क्षेत्र असो की संरक्षण क्षेत्र, हवाई क्षेत्रामध्ये देखील महिला पुढे आहेत. साध्या उदाहरणावरून आपल्याला जर समजून घ्यायचे असेल तर जर आपण गेल्या काही वर्षांचा यूपीएससी किंवा एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचा निकाल पाहिला तर यामध्ये मुलांपेक्षा मुलीच जास्त प्रमाणात यशस्वी होताना आपल्याला दिसून येत आहेत.

संशोधन क्षेत्रामध्ये देखील महिला पुढे आहेतच परंतु कृषी क्षेत्रामध्ये देखील आता महिलांनी खूप मोठ्या प्रमाणावर अत्युच्च अशी कामगिरी बजावली आहे. आता वाहतूक क्षेत्र म्हणजेच वाहन निर्मितीमध्ये जर विचार केला तर ट्रॅक्टर निर्मिती क्षेत्रामध्ये देखील भारताची एक महिला ही यशाच्या शिखरावर आहे व या महिलेला भारताची ट्रॅक्टर क्वीन म्हणून ओळखले जाते.

या महिलेचे नाव आहे मल्लिका श्रीनिवासन हे होय. मल्लिका श्रीनिवासन या टाफे या ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असून ही कंपनी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते. या लेखामध्ये आपण मल्लिका श्रीनिवासन यांच्या यशाची कहाणी बघणार आहोत.

मल्लिका श्रीनिवासन आहेत भारताच्या “ट्रॅक्टर क्वीन”

मल्लिका श्रीनिवासन यांची यशोगाथा पाहिली तर त्यांनी अगोदर वडिलांचा सल्ला घेतला व त्या सल्ल्यानुसार त्यांच्या कौटुंबिक व्यवसायातून त्यांनी त्यांची कारकीर्द सुरू केली. मोठ्या प्रमाणावर कष्ट आणि धाडसी निर्णय घेण्याचे गुण असल्यामुळे त्यांच्या कौटुंबिक व्यवसायाला त्यांनी आज लाखो डॉलरच्या व्यवसायापर्यंत पोहोचवण्यामध्ये यश मिळवले आहे.

ट्रॅक्टर व्यवसायाच्या त्या खऱ्या मल्लिका आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 1959 यावर्षी जन्म झालेल्या मल्लिका श्रीनिवासन यांनी मद्रास विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले व यूएस मधील व्हार्टन विद्यापीठामधून एमबीए केले. जेव्हा त्या शिक्षण घेऊन भारतामध्ये आल्या तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना टाफे या घरच्या कंपनीमध्ये काम करण्याचा सल्ला दिला.

हा व्यवसाय मल्लिका श्रीनिवासन यांच्या आजोबांनी 1960 मध्ये सुरू केलेला होता व साधारणपणे 1986 मध्ये मल्लिका त्यांच्या या व्यवसायामध्ये सहभागी झाल्या. जेव्हा त्यांनी व्यवसायामध्ये सहभाग नोंदवला तेव्हा ग्राहकांच्या गरजा नेमक्या काय आहेत व ग्राहकांचा ट्रेंड ओळखायला सुरुवात केली व त्या दृष्टीने कंपनीच्या उत्पादनांची निर्मिती करण्यावर भर दिला.

हे काम करत असताना शेतात ट्रॅक्टर चालवणाऱ्यांची नेमकी मत काय आहेत हे जाणून घेण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. ग्रामीण भागातील शेतकरी तसेच कामगारांना भेटी देताना त्यांनी चहाच्या स्टॉलवर थांबून त्यांच्याशी संवाद साधण्यावर भर दिला.

एवढेच नाही तर शेतीच्या संदर्भामध्ये कोणते उपाय लागू करणे गरजेचे आहे हे जाणून घेण्याला देखील महत्त्व दिले.

मल्लिका श्रीनिवासन यांनी टाफेला बनवले दुसरी सर्वात मोठी ट्रॅक्टर निर्माता कंपनी

व्यवसाय म्हटले म्हणजे त्यामध्ये चढ-उतार हे येतच असतात व तसेच अनुभव मल्लिका श्रीनिवासन यांना देखील आले. परंतु बाजारामध्ये येणारे जे काही चढ-उतार आहेत त्या चढउतारांचा चिकाटीने त्यांनी सामना केला. कंपनीचा विकास होण्याच्या

दृष्टिकोनातून सतत नवनवीन उत्पादने बाजारामध्ये आणण्यावर भर देत असताना वाजवी किमतीच्या उत्पादनांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केले. या पद्धतीने ते व्यवसाय वाढवत राहिले व शेवटी भारतातील महिंद्रा अँड महिंद्रा नंतर टाफे ही देशातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची ट्रॅक्टर उत्पादक कंपनी बनली.

या कंपनीचा तुर्की या देशांमध्ये देखील कारखाना आहे. साधारणपणे 1961 मध्ये एका ट्रॅक्टर मॉडेल सह सुरु झालेली टाफेची सध्या वार्षिक उलाढाल दहा हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. एवढेच नाही तर मल्लिका श्रीनिवासन यांना फोरब्सच्या इंडियाच्या वूमन लीडर ऑफ द इयर पुरस्कारासोबतच अनेक महत्त्वाचे सन्मान देखील मिळवले आहेत. तसेच फोर्बच्या आशियाच्या यादीमध्ये टॉप 50 आशियाई पावर बिजनेस वुमन पैकी त्या एक आहेत.

अशाप्रकारे मल्लिका श्रीनिवासन यांनी कठोर मेहनतीच्या जीवावर टाफे आज यशाच्या शिखरावर पोहोचवली आहे.