सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून काही ठिकाणी तर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. मागील आठवड्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याचे सध्या दिसून येत आहे.
त्यामुळे हा संपूर्ण ऑगस्ट महिना मुसळधार पावसाने जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पोळ्याचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असून या पोळ्याच्या सणाला देखील पाऊस हजेरी लावेल की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात असेल.

कारण बैलपोळ्याला पावसाची हजेरी थोड्याफार प्रमाणात का असेना पण ती असतेच. याचविषयी ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी हवामान अंदाज वर्तवला असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बघितले तर यावर्षीचा बैलपोळ्याचा सण हा पावसात साजरा होणार असून या दिवशी संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
24 ते 28 ऑगस्ट पर्यंत राज्यात होईल सर्वदूर मुसळधार पाऊस
प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबरावांनी पावसाविषयी माहिती देताना म्हटले आहे की, यंदाचा बैलपोळा सणाला जोरदार पावसाची हजेरी असणार आहे. तसेच राज्यामध्ये 24 ऑगस्ट पासून ते 28 ऑगस्टपर्यंत सर्वदूर मुसळधार पाऊस होणार आहे. तसेच 28 तारखेपर्यंत राज्यात सूर्यदर्शन होणार नाही असे देखील त्यांनी म्हटले आहे.
इतकेच नाही तर या कालावधीमध्ये राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस होणार असून अनेक ठिकाणी नदी व नाले दुथडी भरून वाहणार असल्याचा अंदाज देखील त्यांनी वर्तवला आहे. 27 ऑगस्ट पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार असून राज्यातील नासिक, मुंबई, ठाणे तसेच पालघर,
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे तसेच विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, अमरावती, भंडारा तसेच नागपूर या जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस राहणार असल्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. याशिवाय 27 ऑगस्ट पर्यंत मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस राहील अशी देखील शक्यता आहे
व त्यासोबतच नासिक घाटपरिसर, कोल्हापूर, सातारा आणि पुणे परिसरामध्ये देखील जास्त पाऊस राहील अशी शक्यता पंजाबरावांनी वर्तवली आहे.
त्यानंतर मात्र 28 ऑगस्ट पासून पाऊस कमी होईल व 30 ऑगस्टपर्यंत हवामान कोरडे राहील. परंतु सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच एक तारखेपासून ते 5 सप्टेंबर पर्यंत परत मोठ्या पावसाचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवलेला आहे.