Sarkari Yojana:- केंद्र सरकारच्या माध्यमातून अल्पवयीन मुलांकरिता एक नवीन पेन्शन योजना सुरू करण्यात आली असून त्या योजनेचे नाव एनपीएस वात्सल्य योजना असे आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुलै 2024 च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा केलेली होती व तेव्हा ती संपूर्ण देशात 75 ठिकाणी सुरू करण्यात आली.
त्यानंतर 250 पेक्षा अधिक मुलांना प्राण म्हणजेच कायम सेवानिवृत्ती खाते क्रमांकाचे देखील वाटप करण्यात आलेले आहे. एनपीएस वात्सल्य योजना पालकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी बचत करण्याची एक सुवर्णसंधी देते या योजनेमध्ये पालकांना मुलांच्या नावाने पेन्शन खाते उघडता येते व दीर्घ कालावधीसाठी त्यांना चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळवण्याची सुवर्णसंधी देखील या योजनेतून मिळते.

या योजनेमध्ये पालक कमीत कमी एक हजार रुपये वार्षिक जमा करू शकतात. अलीकडेच या योजनेचा शुभारंभ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या मते, एनपीएस वात्सल्य योजना तरुणांना बचतीची सवय लावण्यासाठी प्रोत्साहन देईल तसेच या योजनेत चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळणार असल्याने ते चांगल्या प्रकारचा निधी देखील उभारू शकतील. ही योजना व्यक्तींना त्यांच्या वृद्धापकाळात चांगले जीवन जगण्यास मदत करेल.
या योजनेत किती रक्कम जमा करता येईल?
एनपीएस वात्सल्य योजनेत तुम्ही तुमच्या मुलासाठी किती बचत करू शकतात याचा तपशील जर बघितला तर…
जर एखाद्या व्यक्तीने मुलासाठी प्रत्येक वर्षाला दहा हजार रुपये जमा केले व ते दहा हजार रुपये मुलगा अठरा वर्षे वयाच्या होईपर्यंत जमा केले तर त्याचे एकूण साधारणपणे पाच लाख रुपये जमा होतात व त्या पाच लाखावर जर 10% दराने परतावा मिळाला तर साठ वर्षाचा अंदाजित निधी जवळपास दोन कोटी 75 लाख रुपये इतका होतो. जर परताव्याचा दर 11.59% राहिला तर 5.97 कोटी व परताव्याचा दर12.86% राहिला तर एकूण 11.05 कोटी रुपये या माध्यमातून जमा होतात.
काय आहेत एनपीएस वात्सल्य योजनेची वैशिष्ट्ये?
1- पात्रता निकष– कोणतेही अल्पवयीन त्याच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड आहे आणि त्याचे वय 18 वर्षापेक्षा कमी असेल असे अल्पवयीन या योजनेसाठी पात्र आहेत.
2- कमीत कमी या योजनेतील योगदान– वार्षिक किमान 1000 रुपये योगदान देता येऊ शकते जास्तीत जास्त योगदानावर कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही.
3- योजनेसाठी योगदानकर्ता– एनपीएस वात्सल्य योजनेमध्ये पालक त्यांच्या मुलांच्या वतीने या योजनेत योगदान देऊ शकतात.
4- अठरा वर्षानंतरचा बदल– आवश्यक केवायसी कागदपत्रे सादर केल्यानंतर अल्पवयीन व्यक्तीचे एनपीएस खाते मानक एनपीएस खात्यात रूपांतर केले जाईल.
या योजनेसंबंधित महत्त्वाचा नियम
गंभीर आजार तसेच शिक्षण आणि अपंगत्वासाठी तीन वर्षाच्या लॉक इन कालावधीनंतर एकूण जमा केलेल्या रकमेच्या पंचवीस टक्के पर्यंत पैसे काढण्याची परवानगी या योजनेत आहे व जास्तीत जास्त तीन वेळा पैसे काढता येऊ शकतात.
अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर पैसे काढण्याची परवानगी
जर या योजनेत अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त निधी असेल तर 80% निधी वार्षिक खरेदी करण्यासाठी वापरला जातो आणि 20% रक्कम एकरकमी म्हणून काढता येते. तसेच अडीच लाख किंवा त्यापेक्षा कमी रक्कम असेल तर संपूर्ण रक्कम एकरकमी म्हणून काढली जाऊ शकते.
मुलाचे एनपीएस वात्सल्य योजनेत खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1- अल्पवयीन मुलाच्या जन्मतारखेचा पुरावा( जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला/ मॅट्रिक्वेलशन प्रमाणपत्र, पॅन कार्ड आणि पासपोर्ट)
2- पालकाची केवायसी ओळख आणि पत्त्याचा पुरावा(आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, मनरेगा जॉब कार्ड आणि राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर) सादर करणे आवश्यक आहे.
3- पालक जर NRI असतील तर अल्पवयीन( एकल किंवा संयुक्त)NRE/NRO बँक खाते असणे आवश्यक.