सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचे आगमन झाले असून रिमझिम पडणाऱ्या पावसामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून डोंगर रांगा तसेच धबधबे इत्यादी ठिकाणी फिरायला जाणे आणि प्रवासात मस्तपैकी रिमझिम पावसाचा आनंद घेत चहाचा झुरका मारणे यातील आनंद काही औरच असतो. त्यामुळे आपल्यापैकी बरेच जण पावसाच्या दिवसांमध्ये पर्यटनाचा आनंद लुटतात. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा विचार केला तर निसर्ग सौंदर्याने महाराष्ट्र हा नटलेला असून महाराष्ट्र मध्ये भरपूर अशी पर्यटन स्थळे आहेत.
बरेच तालुक्यांना डोंगररांगांची सोबत लाभल्यामुळे या डोंगर रांगांमधून वाहणाऱ्या नद्या, खळाळणारे धबधबे, हिरवीगार वनराई पाहून मन प्रफुल्लित होते. याच अनुषंगाने जर आपण आंबेगाव तालुक्याचा विचार केला तर सह्याद्रीच्या पर्वतमाथा परिसरात असलेला या तालुक्याचा पश्चिम पट्ट्या हा आता पडणाऱ्या पावसामुळे बहरून गेलेला आहे. याचा अनुषंगाने या लेखात आपण आंबेगाव तालुक्यातील निसर्ग सौंदर्य आणि इतर महत्त्वाच्या बाबी पाहणार आहोत.
आंबेगाव तालुक्यातील पश्चिम पट्टा पर्यटकांसाठी आहे महत्त्वाचा
सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाने हजेरी लावली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सलग पाऊस पडत आहे. आंबेगाव तालुक्यात देखील पावसाची हीच स्थिती असल्यामुळे त्या ठिकाणी निसर्ग सौंदर्य आता बहरून आलेले आहे. या ठिकाणी जोरदार पाऊस नसला परंतु रिमझिम पाऊस सतत सुरू असल्यामुळे डोंगरदऱ्यांमधून वाहणारे धबधबे आता खळाळून वाहू लागले आहेत. जर आपण आंबेगाव तालुक्याचा विचार केला तर या तालुक्याचा पश्चिम भागाला निसर्गाने भरभरून दिलेले आहे.
हा भाग सह्याद्रीचा परिसर असल्यामुळे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी अनेक लहान मोठे पाण्याचे प्रवाह आणि धबधबे प्रवाहित होतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या परिसराने जणू काही हिरवाईची शाल पांघरलेली असते. या ठिकाणी असलेले डिंभे धरण एक पर्यटनाचे आकर्षण असून या धरणाच्या बाजूला असलेला वळणावळणाच्या रस्त्याने जाताना तुम्हाला बऱ्याच ठिकाणी भातशेती,तसेच या धरणाचा विस्तीर्ण जलाशय पाहता येतो.
या धरणाच्या डाव्या बाजूला जो काही रस्ता आहे या रस्त्यावरून जाताना दोन किलोमीटर अंतर पार केल्यानंतर पोखरी घाट लागतो.हा गाठ निसर्गसौंदर्याची खाण असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर निसर्ग सौंदर्याचा आनंद पर्यटकांना अनुभवता येतो. या ठिकाणी असलेल्या डोंगररांगा या दिवसांमध्ये हिरव्यागार होतात. या हिरव्यागार असलेले डोंगर रांगांमधून पांढरे शुभ्र आणि फेसाळत वाहणारे पाणी आणि धुक्याने वेढलेला संपूर्ण परिसर व या डोंगरी भागामध्ये पडणारा सततचा पाऊस इत्यादीमुळे या ठिकाणी असलेल्या भीमाशंकर जंगल परिसरामध्ये दिसतो.
असे महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला या ठिकाणी धबधबे पाहिजे असतील तर कोंढवळ परिसर खूप प्रसिद्ध आहे. सध्या या ठिकाणी पर्यटकांची हे धबधबे पाहण्यासाठी खूप गर्दी होत आहे. या ठिकाणी आपल्याला डोण धबधबा हा समुद्रसपाटीपासून 200 ते 300 फूट उंचावरून कोसळतो. हा एक वैशिष्ट्यपूर्ण असा धबधबा असून याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या वरच्या बाजूकडून खालच्या बाजूकडे एकंदरीत 100 फूट इतक्या उंचावरून पाणी पडते.
परंतु हे पाणी पडताना ते तीन टप्प्यात पडते. त्यामुळे या ठिकाणी सध्या पर्यटकांची खूप मोठी गर्दी होत आहे. सध्या या ठिकाणी पर्यटकांची खूप मोठी गर्दी होत असून सतत पडणाऱ्या पावसामुळे आंबेगाव तालुक्याला आता निसर्ग सौंदर्याने वेढले असून या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.त्यामुळे जर तुमचा देखील अशा ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही आंबेगाव तालुक्यातील पश्चिम पट्ट्याची निवड करू शकतात.