Tourist Place In Pune:- पावसाळ्यामध्ये आपल्यापैकी बरेच व्यक्ती हे कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत वन डे ट्रीप प्लॅन करतात. पावसाळ्यात पडणाऱ्या रिमझिम पावसामध्ये एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी भेट देणे व त्या ठिकाणी काही क्षण घालवणे हे मनाला मोहून टाकणारे असते.
त्यातल्या त्यात पावसाळ्यामध्ये सगळीकडे हिरवाईंने नटलेली डोंगरदऱ्या तसेच रस्त्यांच्या दुतर्फा पसरलेली हिरवीगार झाडे यामुळे पावसाळ्यातील पर्यटन हे खास मनाला शांतता आणि समाधान देणारे ठरते.
तुम्हाला देखील जर या पावसाळ्यामध्ये तूमच्या व्यस्त रुटीन मधून विकेंडचा मुहूर्त साधून एक किंवा दोन दिवसाची ट्रिप प्लॅन करायची असेल तर तुम्ही पुण्याजवळ असलेल्या काही महत्त्वाच्या निसर्गरम्य ठिकाणांना भेट देऊ शकतात.
पुण्यापासून काही अंतरावर असलेली ही ठिकाणे पर्यटनासाठी आहेत महत्त्वाचे
1- महाबळेश्वर– समजा तुम्हाला मित्र किंवा कुटुंबासोबत एक दिवसाची ट्रिप प्लॅन करायची असेल तर तुम्ही महाबळेश्वरला जाऊ शकतात. हे एक उत्तम असे हिल स्टेशन असून पावसाळ्यामध्ये या ठिकाणी नटलेली हिरवाई आणि धुके यामुळे खूप सुंदरता पाहायला मिळते.
महाबळेश्वर हे पश्चिम घाटाच्या अगदी कुशीत वसलेले एक हिल स्टेशन असून विकेंड घालवण्याच्या दृष्टिकोनातून महाबळेश्वर आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या ठिकाणांचा तुम्ही विचार करू शकतात.
2- वेताळ टेकडी– पावसाळ्यामध्ये जर छोट्या ट्रिपसाठी तुम्हाला जायचे असेल तर पुण्यातील वेताळ टेकडी हे ठिकाण खूप महत्त्वाचे आहे व बहुतेक पुणेकर याला पसंती देतात. वेताळ टेकडी हे ठिकाण पुणे शहराच्या अगदी मध्यभागी वसलेले असून याला हनुमान टेकडी, पाषाण टेकडी अशा विविध नावांनी देखील ओळखतात. या ठिकाणी ट्रेकिंग साठी देखील अनेक पर्यटक जात असतात.
3- माथेरान– पुण्याच्या आजूबाजूला असलेल्या पर्यटन स्थळांमध्ये माथेरान हे स्थळ खूप प्रसिद्ध आहे व या हिल स्टेशनला जाण्याकरिता नेरळ येथून सुटणारी मिनी ट्रेन तुम्हाला खूप फायद्याचे ठरते. या ट्रेनच्या साह्याने प्रवास करत तुम्ही पावसाळ्यामध्ये या ठिकाणच्या निसर्गाचा आनंद घेऊ शकतात. वन डे विकेंडकरिता माथेरान हिल स्टेशन खूप महत्त्वाचे आहे.
4- वेल्हे आणि भोर– वेल्हे आणि भोर ही ठिकाणे एक दिवसाच्या राईड किंवा ड्राइव्ह साठी चांगला पर्याय आहेत. या परिसरामध्ये जर तुम्ही फिरायला गेलात तर या ठिकाणी अनेक धरणे तसेच किल्ले व ऐतिहासिक वास्तू तुम्हाला बघायला मिळतात. उदाहरणच घ्यायचे झाले तर आंबवडे येथील झुलता पुल, नागेश्वर मंदिर तसेच पंतसचिवांची समाधी व अनेक मंदिरे देखील आहेत.
5- मुळशी धरण– तुम्हाला मित्रांसोबत किंवा तुमच्या कुटुंबीयांसोबत फिरायला जायचे असेल तर हे एक उत्तम असे ठिकाण आहे. मोशी तलावाजवळ कॅम्पिंग किंवा इतर आनंददायक खेळ खेळण्याचा आनंद तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात.
6- लवासा सिटी– हे भारतातील खाजगी हिल स्टेशन असून लवासा या नावाने ते प्रसिद्ध आहे. लवासाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे अगदी हुबेहूब इटालियन शहरांसारखे दिसते. तुम्हाला जर इटली सारखे सौंदर्य भारतामध्ये अनुभवायचे असेल तर तुम्ही लवासाला एकदा भेट देणे गरजेचे आहे आणि पुणेकरांचे पावसाळ्यातील लवासा सिटी हे एक आवडते ठिकाण आहे.