Tourist Place: महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा आहे ऐतिहासिक दृष्ट्या समृद्ध, ही पाच पर्यटन स्थळे फिरण्यासाठी आहेत महत्वाचे

Ajay Patil
Published:
melghaat

Tourist Place:-  महाराष्ट्राला अनेक दृष्टीने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला असून संतांची भूमी म्हणून महाराष्ट्राला ओळखले जाते. त्यासोबतच नैसर्गिक विविधता देखील मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. यासोबतच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा विचार केला तर  त्यांना नैसर्गिक तसेच ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे.

याच दृष्टिकोनातून जर आपण अमरावती या जिल्ह्याचा विचार केला तर हा जिल्हा ऐतिहासिक दृष्ट्या समृद्ध असून लोकप्रिय पर्यटन स्थळे या जिल्ह्यात आहेत. यामध्ये मंदिर,नैसर्गिक झरे आणि काही अभयारण्य इत्यादींचा समावेश होतो. जर तुम्हाला देखील साहसी पर्यटनाचे हौस असेल तर तुम्ही अमरावती जिल्ह्याला भेट देऊ शकता. या अनुषंगाने आपण अमरावती जिल्ह्यातील पाच महत्त्वाच्या पर्यटन स्थळांची माहिती घेणार आहोत.

 अमरावती जिल्ह्यातील पाच महत्त्वाची पर्यटन स्थळे

1- चिखलदरा हिल स्टेशन चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ असून ते एक हिल स्टेशन देखील आहे. या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारचे वन्य जीव तसेच तलाव आणि धबधबे यांचे दर्शन होते. चिखलदऱ्याचे अगोदरचे नाव किचका असे ठेवले गेले होते व पांडू पुत्र भिमाने जेव्हा किचकाचा वध केला व त्याला एका खोऱ्यात फेकले.

या अर्थाने हे ठिकाण कीचक दरा म्हणून ओळखले जाऊ लागले आणि हळूहळू त्याचे चिखलदरा असे नाव झाले. ठिकाणी असलेल्या खोल दऱ्या तसेच मखमली गवत, मोठमोठे वृक्षांनी हा संपूर्ण परिसर वेढलेला आहे. चिखलदरा ठिकाण हे 1118 मीटर उंचीवर वसलेले असून महाराष्ट्रातील एकमेव असे कॉफी उत्पादक परिसर आहे.

या ठिकाणी असलेले चित्त थरारक धबधबे आणि सरोवर तसेच वेगवेगळ्या प्रकारचे वन्यजीव इत्यादीमुळे चिखलदऱ्याचे सौंदर्य खुलून दिसते. चिखलदऱ्याच्या जवळ मेळघाट व्याघ्र प्रकल्प, गाविलगड किल्ला, नरनाळा किल्ला, पंडित नेहरू बॉटनिकल गार्डन, ट्रायबल म्युझियम इत्यादी लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत.

Beautiful Chikhaldara Hill Station - Best Time and Place to Visit

2- वान वन्यजीव अभयारण महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागामध्ये हे वसलेले असून हे अभयारण्य मेळघाट अभयारण्याचा विस्तार आहे. या ठिकाणी पानझडी जंगले असून हे क्षेत्र वाघ, बिबट्या, हायनास, जंगली कुत्रे तसेच गवा, सांबर, तसेच वन्य डुक्कर इत्यादींनी हा परिसर समृद्ध असून या ठिकाणी जर तुम्हाला भेट द्यायचे असेल तर उत्तम काळ हा ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महिन्यातील आहे.

Wan Sanctuary of Amravati, Wildlife Sanctuaries Amravati

3- देवी पॉइंट देवी पॉईंट हे चिखलदरा हिल स्टेशनवर असलेले ठिकाण असून अमरावती या शहरापासून जवळपास 80 किलोमीटर इतके आहे. देवी पॉईंट या ठिकाणहून चंद्रभागा नदी जाते आणि खडकाळ रांगांमधून वाहते. देवी पॉईंट हे ठिकाण टेकडीच्या शिखरावर असून याठिकाणी मेळघाट अभयारण्याचे संपूर्ण वनक्षेत्र दिसते.

या ठिकाणी दिवसभर एकांतात बसून दिवस घालवण्यात वेगळीच मजा आहे. या ठिकाणी खडकावरती देवीचे मंदिर असून त्याच्या बाजूने एक नदी वाहते. हे एक ऐतिहासिक मंदिर असून खडकाच्या रूपामध्ये आहे. या ठिकाणच्या डोंगराच्या माथ्यावरून काही अंतरावर अमरावती किल्ल्याचे अवशेष देखील पाहायला मिळतात.

Devi Point (Amravati) - All You Need to Know BEFORE You Go

4- गाविलगड किल्ला अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हिल स्टेशन जवळ गाविलगड किल्ला असून हा जवळपास तीनशे वर्ष जुना किल्ला आहे. या किल्ल्याची राजधानी एलीचपुर असून भेट देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. निजामशाहीच्या कालावधीत तयार करण्यात आलेल्या काही सुंदर मूर्ती देखील या ठिकाणी बघायला मिळतात.

गाविलगड किल्ल्याच्या भिंतीवर हिंदी तसेच उर्दू आणि अरबी या लिप्यांमध्ये हत्ती तसेच बैल, वाघ, सिंह आणि काही कोरीव कामांचा समावेश आपल्याला बघायला मिळतो. या ठिकाणी दहा लोखंडी तोफा तसेच गडाच्या आत तांबे आणि पितळ देखील आहे. बाराव्या किंवा तेरावे शतकामध्ये मेंढपाळ समुदायाचे जे काही राज्यकर्ते असलेल्या गवळ्यांनी हा किल्ला बांधला. हा किल्ला सध्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत आहे.

Gawilgadh Fort - DOT-Maharashtra Tourism - Maharashtra Tourism

5- बांबू गार्डन अमरावती जिल्ह्यातील हे एक महत्त्वाचे ठिकाण असून बाबू कृषी संवर्धन कार्यक्रमांतर्गत बांबू गार्डन तयार करण्यात आलेले आहे. या बांबू गार्डन मध्ये बांबूच्या विविध प्रजाती या ठिकाणी संरक्षित करण्यात आला असून त्यांची जोपासना करण्यात आलेली आहे. या ठिकाणी बांबू पासून झोपड्या बनवलेल्या असून पूल देखील बांबूपासून बनवलेले या ठिकाणी दिसून येतात. लहान मुलांकरिता या ठिकाणी एक सुंदरशी पार्क देखील आहे. या ठिकाणी लहान मुलांसाठी राइड्स इत्यादी सारख्या सुविधा देखील तयार करण्यात आलेल्या आहेत.

Bamboo Garden | Bamboo Garden Amravati | YesNearMe-News

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe