Diwali Health Tips :- दिवाळी म्हटले म्हणजे अगदी प्रसन्न वातावरण आणि दुसरी बाब म्हणजे घरात बनलेले चविष्ट असे फराळ याची जणू पर्वणीच असते. फराळ म्हणून चकल्या, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू तसेच चिवडा, शंकरपाळे इत्यादी अनेक चविष्ट असे खाद्यपदार्थ फराळ म्हणून बनवले जातात.
यामध्ये बऱ्याच फराळाचे पदार्थ हे घरीच बनवतात. परंतु बऱ्याच कुटुंबांना वेळेअभावी किंवा इतर कारणामुळे घरी फराळ न बनवता बाहेरून विकत आणतात. परंतु या अनुषंगाने आरोग्याच्या दृष्टिकोनातून रेडिमेड आणलेला फराळ उत्तम आहे का?
इत्यादी बाबी पाहणे देखील तितकेच गरजेचे असते. डायबिटीस तसेच इतर काही त्रास असलेल्या व्यक्तींसाठी आरोग्य विषय खूप काळजी घेणे महत्त्वाचे असते. या दृष्टिकोनातून या लेखांमध्ये आपण पुणे येथील के एम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे मधुमेह युनिटमधील डॉ.सोनाली श्रीकांत वागळे यांनी द इंडियन एक्सप्रेस शी बोलताना जी माहिती दिली त्याविषयी पाहणार आहोत.
या टिप्स वापरा आणि आरोग्यदायी फराळ बनवा
1- तेलाचा वापर कसा करावा?- फराळाचे पदार्थ बनवण्याकरिता प्रामुख्याने तेलाचा वापर केला जातो. तेलाचा वापर करताना जेव्हा तुम्ही फराळातील पदार्थ बनवाल तेव्हा डीप फ्राईंग करण्याकरिता उत्तम दर्जाचे व प्रक्रिया न केलेले खाद्यतेल वापरणे चांगले असते. तसेच कमीत कमी तेल वापरण्यावर भर द्या. तयार पदार्थांमधील जास्तीचे तेल शोषले जावे याकरता टिशू पेपरचा वापर करणे गरजेचे आहे. घरगुती गाईच्या तुपाचा वापर करणे खूप फायदेशीर ठरेल.
2- तळण्याऐवजी बेक करणे फायदेशीर- बऱ्याचदा आपण जेव्हा फराळामध्ये डाळ आणि शेंगदाण्याचा वापर करतो तेव्हा ती तळून घेतो. परंतु तळण्याऐवजी जर तुम्ही भाजून त्याचा वापर केला तर खूप फायदेशीर ठरू शकते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे शेव आणि चकली तळण्याऐवजी ते बेक करावेत.
3- वेगवेगळ्या प्रकारच्या पिठाचा वापर ठरेल फायद्याचा- उदाहरणार्थ आपण जेव्हा शेव बनवतो तेव्हा प्रामुख्याने बेसन पिठाचा वापर केला जातो. परंतु त्याऐवजी जर मूग डाळीच्या पिठाचा वापर केला तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून फायद्याचे ठरते. शेव बनवताना सोयाबीन किंवा नाचणीची बनवून पहावी. लाडू किंवा शंकरपाळ्या बनवण्यासाठी मैद्याचा वापर केला जातो. या मैदा सोबतच गव्हाचे पीठ वापरणे फायद्याचे ठरते कारण त्यामुळे मैद्याचा वापर देखील कमी होतो.
4- लाडू मध्ये सुकामेवाचा वापर- दिवाळीमध्ये लाडू बनवण्यासाठी तो पौष्टिक व्हावा याकरिता त्यामध्ये बदाम तसेच मनुका व अक्रोड, खजूर, ओट्स इत्यादी वापरले तर या पदार्थांमुळे लाडू पौष्टिक बनतात.
5- जेव्हा आपण चिवडा बनवतो तेव्हा त्यामध्ये चवीकरिता सुक्या खोबऱ्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो. असे न करता जर त्या ऐवजी ताज्या खोबऱ्याचा वापर करून पहावा व साखर ऐवजी गूळ किंवा खजुराचा वापर करावा. अशा प्रकारे साहित्य जर बदलून पाहिले तरी फायदा होतो.