पोट सुटेल किंवा वजन वाढेल या भीतीने भात खाणे टाळता का? फक्त भात शिजवताना ‘या’ ट्रिक्स वापरा आणि बिनधास्त भात खा

Ajay Patil
Published:
weight loss tips

 

वाढते वजन किंवा लठ्ठपणा या समस्या दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसून येत आहेत. अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तींपर्यंत  वजन वाढण्याच्या समस्याने त्रस्त झालेले व्यक्ती आपण पाहतो. पोट सुटणे किंवा वजन वाढणे या प्रकारामुळे अनेक समस्या देखील निर्माण होतात.

वाढत्या वजनामुळे आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊन अनेक गंभीर आजार देखील होऊ शकतात. त्यामुळे साहजिकच व्यक्ती वजन कमी करण्यासाठी नानातऱ्हेचे प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. यामध्ये  आहारात देखील अनेक खाद्यपदार्थांचे सेवन टाळले जाते.

वजन कमी करण्यासाठी किंवा पोट सुटू नये याकरिता खाद्यपदार्थांमध्ये भात हा पदार्थ प्रामुख्याने बरेच जण टाळताना आपल्याला दिसून येतात. कारण प्रत्येकाचा असा समज आहे की भात जर खाल्ला तर लठ्ठपणा वाढतो. परंतु याबाबत जर आपण आहार आणि पोषण तज्ञांच्या मतानुसार बघितले तर भात खाऊन देखील तुम्ही वजन कमी करू शकता.

याबाबत आहार तज्ञांनी विशेष माहिती दिलेली आहे. याबाबत तज्ञ म्हणतात की भात खाल्ला तर लठ्ठपणा वाढतो. परंतु जर भात शिजवण्याची पद्धत योग्य असेल तर लठ्ठपणा येत नाही. त्यामुळे तुम्ही भात कसा शिजवता याला खूप महत्त्व आहे.

 वजन कमी करण्यासाठी भात शिजवण्याची योग्य पद्धत

तज्ञांचे मत पाहिले तर वजन कमी करण्यामध्ये जो काही डाइट निश्चित केला जातो त्यामध्ये भाताचा समावेश केला तर त्यातील स्टार्च बाहेर काढणे खूप गरजेचे असते. जर तांदूळ शिजवण्याची पद्धत योग्य असेल तरच तुम्ही स्टार्च बाहेर काढू शकतात. सध्या आपण घरामध्ये पाहतो की भात शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.

परंतु या माध्यमातून जर भात शिजवला तर स्टार्च कधीच पूर्णपणे निघत नाही. त्यामुळे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनचा रिपोर्ट बघितला तर तुम्हाला जर स्टार्च काढायचा असेल तर प्रेशर कुकर ऐवजी तुम्ही भात शिजवण्यासाठी पातेल्याचा वापर करणे गरजेचे आहे.

या पद्धतीमध्ये अधिक पाण्यामध्ये भात उकळून घ्यावा व तांदूळ शिजल्यानंतर त्यातलं पाणी बाहेर काढून घ्या आणि जे पाणी उरेल ते सुद्धा गाळून घ्यावे. ही प्रक्रिया केल्यामुळे तांदळातील स्टार्च पाण्यासोबत निघून जायला मदत होते व आपल्याला स्टार्च मुक्त भात खायला मिळतो.

 ब्राऊन राईसचा वापर ठरेल फायद्याचा

वजन कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या डायटमध्ये पांढऱ्या राईस ऐवजी तुम्ही ब्राऊन राईसचा वापर करू शकतात. ब्राऊन राईसचा ग्लासेमिक इंडेक्स कमी असतो व यामुळे ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढत नाही. तसेच यामध्ये फायबर्स जास्त असतात व कॅलरी इंटेक कमी प्रमाणात असतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ब्राऊन राईस हा प्रभावी मानला जातो.

 भात खा परंतु त्याच्या कॉन्टिटीकडे लक्ष द्या

वजन कमी करण्यासाठी भात पूर्णपणे बंद करण्यापेक्षा तुम्ही जो काही भात खाता त्याचे प्रमाण किती आहे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये भाताचे सेवन फायद्याचे ठरत नाही. याकरिता तुम्ही किती भात खाता हे खूप महत्त्वाचे आहे. साधारणपणे तुम्ही एका छोटेसे बाऊलभर भात खाऊ शकतात व यामुळे तुमच्या वजन देखील वाढत नाही.

 आहारात भात खावा परंतु त्यासोबत प्रोटीनचा समावेश करा

तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल परंतु भात देखील खायचा असेल तर त्यासोबत तुम्ही प्रोटीनचा समावेश करणे गरजेचे आहे. आपल्याला दिसून येते की जेव्हा आपण भात खातो त्यानंतर बराच वेळ पर्यंत आपल्याला भूक लागत नाही. यामुळे अधिकाधिक कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे भातासोबत प्रोटीनचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.