‘या’ ट्रिक्स वापरा आणि चहाच्या टपरीवर मिळतो तसा कडक चहा घरी बनवा! प्याल हा चहा तर वाटेल ताजेतवाने

Ajay Patil
Published:
making tea process

आपल्यापैकी बऱ्याच जणांना चहा पिण्याची खूप मोठ्या प्रमाणावर आवड असते व खास करून मस्तपैकी एखाद्या चहाच्या टपरीवर जाऊन कडक आणि फक्कड अशी चहा पिण्याची मोठ्या प्रमाणावर आवड असते. चहा पिल्यावर बऱ्याचदा मन आणि डोकं अगदी फ्रेश होते व काम करायला देखील ऊर्जा मिळते.

त्यामुळे बरेच व्यक्ती काम करत असताना देखील मध्ये चहाचा डोस घेऊन फ्रेश होतात. कारण घरी आपण जो काही चहा पितो त्यापेक्षा चहाच्या टपरीवरची चहा पिल्यामुळे वेगळाच आनंद वाटतो. त्यामुळे बऱ्याचदा आपल्या मनामध्ये येत असेल की  जो काही आपण चहा बनवतो

तो टपरीवरल्या चहासारखा का येत नाही किंवा त्यामध्ये कडकपणा का जाणवत नाही? परंतु असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर त्याचेच उत्तर आपण या लेखात बघू. या लेखामध्ये अशा तीन ट्रिक्स दिलेल्या आहेत की त्या वापरून तुम्ही घरच्या घरी कडक चहा बनवू शकतात.

 या तीन ट्रिक्स वापरा आणि घरी बनवा चहाच्या टपरीवर बनतो तसा कडक चहा

1- विविध मसाल्यांचा वापर बहुतांशी आपण घरी जेव्हा चहा बनवत असतो तेव्हा त्यामध्ये इतर नेहमीच्या पदार्थांशिवाय फक्त आले टाकतो. कधीकधी चहाचा मसाला बनवून ठेवलेला असतो व तो चहा मध्ये टाकला जातो. परंतु या व्यतिरिक्त जर आपण टपरीवर मिळणाऱ्या चहाच्या दृष्टिकोनातून बघितले तर त्यासाठी टपरीवाले मसाला तयार करून ठेवत नाहीत.

ते दररोज मसाला तयार करतात व तो घरी तयार करतात व त्याचा चहा बनवण्यासाठी वापर करतात. तुम्हाला देखील घरी चहा बनवण्यासाठी मसाला तयार करायचा असेल तर त्याकरिता दालचिनी व वेलची हे दोन मुख्य मसाले थोडे कुटून घ्यावी लागतील व त्यामध्ये थोडे ताजे आले मिसळावे लागेल. अशाप्रकारे मसाला तयार करून तुम्ही घरी चहा बनवला तर त्याच्यात देखील कडकपणा येतो.

2- चहा बनवताना त्याला चांगला उकळू द्यावा जेव्हा आपण घरी चहा बनवतो तेव्हा तो ताबडतोब बनवून मोकळे होतो. त्यामुळे चहात मसाले जरी मिक्स केलेले असतील तरी त्यांचा म्हणावा तसा स्वाद येत नाही

त्यामुळे चहा करण्यासाठी आपण जे काही पाणी गॅसवर गरम करायला ठेवतो त्यामध्ये आधी मसाले व आले टाकून ते दहा ते बारा मिनिटे चांगले उकळून घ्यावे. त्यानंतर चहा पावडर टाकून ती पाच मिनिटे उकळावी व नंतर दूध टाकावे.

3- नीरसे दुधाचा वापर करावा आपण घरी चहा तयार करण्यासाठी ज्या दुधाचा वापर करत असतो ते आपण तापवून ठेवलेले असते व त्यावर येणारी साय देखील आपण काढून टाकतो. परंतु टपरीवर जो काही चहा केला जातो त्यासाठी निरसे म्हणजेच कच्चे व न उकळलेले दुधाचा वापर केला जातो. तुम्ही जर घरच्या चहाला निरसे दूध घालून बनवला तर चहा घट्ट आणि जास्त चवदार होईल.

त्यामुळे या तीनही उपाय जर करून पाहिले तर तुम्हाला टपरीवर मिळतो तसाच चहा घरी प्यायला मिळू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe