Vegetable Farming In Summer Season : राज्यात गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये मोठा बदल केला जात आहे. शेतकऱ्यांनी तज्ञ लोकांच्या सल्ल्याने आता पीक पद्धतीत देखील बदल करण्यास सुरुवात केली आहे. पारंपारिक पिकांची शेती न करता नवीन नगदी पिकांची लागवड करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. आता राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कमी कालावधीत काढण्यासाठी तयार होणाऱ्या भाजीपाला पिकांची तसेच कलिंगड, खरबूज यांसारख्या हंगामी पिकांची शेती सुरू केली आहे
दरम्यान कृषी तज्ञांनी शेतकरी बांधवांना उन्हाळी हंगामात भाजीपाला लागवड करण्याचा सल्ला दिला आहे. कमी पाण्यात अधिक उत्पादन जर मिळवायचे असेल तर शेतकऱ्यांनी भाजीपालाची शेती करावी आणि कमी खर्चात अधिकची कमाई काढावी असं आवाहन तज्ञ लोकांकडून यावेळी केल जात आहे. याबाबत भोर तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळी हंगामात शेतकरी बांधव काही मोजक्या आणि निवडक भाजीपाला पिकांची शेती करून कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळवू शकणार आहेत.
हे पण वाचा :- सोयाबीन उत्पादकांना लवकरच मिळणार गोड बातमी; दरात ‘या’ एका कारणामुळे होणार वाढ, पहा तज्ज्ञांचा अंदाज
त्यांनी शेतकऱ्यांना सल्ला देताना सांगितले की, त्यांनी रब्बी हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर लगेचच भाजीपाला पीक लागवड केली पाहिजे. खरं पाहता भाजीपाला पीक कमी पाण्यात उत्पादित केले जाऊ शकते शिवाय उन्हाळ्यात नेहमीच भाजीपाल्याला अधिक दर मिळतात या पार्श्वभूमीवर भाजीपाला लागवड उन्हाळ्यात केल्यास शेतकऱ्यांना अधिकचा नफा या ठिकाणी मिळू शकणार आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर यांनी उन्हाळी हंगामात निवडक भाजीपाला वर्गीय पिकांची शेती केली पाहिजे.
यामध्ये काकडी, दोडका, घोसाळी, कारली, दुधी भोपळा, तोंडली, भेंडी, गवार, टोमॅटो, वांगी, मिरची, चवळी, घेवडा, कोथिंबीर, मेथी, राजगिरा, माठ आणि पोकळा या काही भाजीपाला पिकांची शेतकरी बांधव शेती करू शकतात. मात्र या पिकांची शेती करताना शास्रोक्त पद्धतीने शेती होणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजीपाला पिकांच्या पिकाची निवड करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे. कमी कालावधीत उत्पादन देणाऱ्या जातींची शेतकऱ्यांनी निवड करायची आहे.
हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार; जुनी पेन्शन योजनेसह या मागणीवरही शिंदे-फडणवीस सरकार सकारात्मक, पहा….
तसेच पाणी व्यवस्थापन करताना ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन यांसारख्या आधुनिक तंत्राचा वापर करायचा आहे. सोबतच पाण्याची धूप रोखण्यासाठी नैसर्गिक मल्चिंगचा वापर करायचा आहे. यामध्ये शेतकरी बांधव गेल्या हंगामातील पिकांचे अवशेष जमिनीवर पिकांच्या भोवती टाकू शकतात. यामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी वेगाने होते आणि यामुळे जमिनीतील पाण्याची धूप होत नाही, परिणामी कमी पाण्यातही दर्जेदार उत्पादन भाजीपाला पिकातून शेतकऱ्यांना मिळवता येणे शक्य होणार आहे.
शिवाय यामुळे तणनियंत्रण देखील होते. शेतकरी बांधवांनी पिकांची लागवड करण्यापूर्वी बीजप्रक्रिया करणे आवश्यक राहणार आहे. निश्चितच शेतकऱ्यांसाठी भोर तालुका कृषी अधिकारी यांनी दिलेला हा सल्ला मोलाचा राहणार आहे. जर शेतकरी बांधवांनी उन्हाळी हंगामात या पद्धतीने भाजीपाला वर्गीय पिकांचे व्यवस्थापन केले तर त्यांना यातून चांगली कमाई होऊ शकते.
हे पण वाचा :- पांढऱ्या टरबूज लागवडीचा यशस्वी प्रयोग; 70 दिवसांत अर्ध्या एकरात झाली दीड लाखांची कमाई, कोणत्या जातीची केली लागवड?, पहा….