Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

आनंदाची बातमी ! आता वर्सोवावरून समुद्रमार्गे पालघर जाता येणार; प्रवासाचा वेळ येणार निम्म्यावर, पहा कसा असेल मार्ग

Versova Virar Sea Link Project : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून मुंबई व उपनगरात रस्ते व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबई व उपनगरात या अनुषंगाने विविध मोठ-मोठे प्रकल्प सुरु आहेत.

Versova Virar Sea Link Project : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून मुंबई व उपनगरात रस्ते व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबई व उपनगरात या अनुषंगाने विविध मोठ-मोठे प्रकल्प सुरु आहेत. या प्रकल्पामध्ये वर्सोवा ते विरार सिलिंक प्रकल्पाचा देखील समावेश आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हा सिलिंक बांधला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान आता या सी लिंक प्रकल्पाबाबत मोठी माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा सिलिंक प्रकल्प विस्तारला जाणार आहे. आता हा प्रकल्प पालघर पर्यंत वाढवला जाईल अशी माहिती एका मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिल्यानंतर हा प्रकल्प पालघर पर्यंत वाढवला जात असल्याची माहिती हाती आली आहे. दरम्यान यासाठीचा अहवाल तयार करण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.

हे पण वाचा :- स्कायमेट वेदरचा अंदाज आला रे…! यंदा कसा असणार मान्सून? अल निनो राहणार का? पहा काय म्हणतंय Skymet Weather

वर्सोवा विरार सी लिंक प्रकल्पाबाबत थोडक्यात

खरं पाहता हा प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केला जात होता. मात्र नंतर हा प्रकल्प एमएमआरडीए अर्थातच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे वळविण्यात आला आहे, सध्या एमएमआरडीए याचे काम पाहत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की वर्सोवा ते विरार दरम्यान विकसित होणारा हा सीलिंक प्रकल्प मुंबईमधील तिसरा सिलिंक प्रकल्प आहे.

वांद्रे ते वरळी दरम्यान असलेला सी लिक प्रकल्प यापूर्वी पूर्ण करण्यात आला असून सध्या वांद्रे ते वर्सोवापर्यंत 17 किलोमीटर लांबीच्या सीलिंकचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान वर्सोवा ते विरार हा मुंबईमधील तिसरा सिलिंक प्रकल्प राहणार आहे. आता हा प्रकल्प पालघरपर्यंत वाढवला जाणार आहे. हे तिन्ही प्रकल्प एकमेकांना कनेक्ट करण्याची योजना एमएमआरडीएने आखली आहे.

हे पण वाचा :- कोकणच्या केशर आंब्याप्रमाणे प्रसिद्ध आहे अहमदनगरमधील ‘टिकल्या आंबा’; याची शेती शेतकऱ्यांसाठी ठरतेय लाखमोलाची, वाचा याच्या विशेषता

कसा राहणार वर्सोवा ते पालघर सी लिंक प्रकल्प?

वर्सोवा ते विरार हा सी लिंक प्रकल्प पालघरपर्यंत वाढवला जाणार आहे. एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा मार्ग एकूण जवळपास 43 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. हा मार्ग सागरी किनाऱ्यापासून एक किलोमीटरवर विकसित होणार आहे.

एकंदरीत पालघर पर्यंत हा प्रकल्प विस्तारला जाणार असल्याने याचा लाभ येथील प्रवाशांना होणार आहे. यामुळे प्रवासाचा कालावधी थेट निम्म्यावर येणार आहे. निश्चितच, एम एम आर डी ए ने घेतलेला हा निर्णय वर्सोवा ते पालघर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो इकडे लक्ष द्या! ‘ही’ कागदपत्रे तयार असतील तरच मिळणार कांदा अनुदानाचे पैसे, पहा….