Investment Tips : तुमच्या मुलांना कोट्याधीश बनवायचं ? हा आहे सर्वात सोपा मार्ग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Investment Tips :- भविष्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक नियोजन करणे हे खूप गरजेचे असते. कारण व्यक्तीच्या आयुष्यामध्ये मुला मुलींचे शिक्षण, नोकरी, आजारपण, घर किंवा इतर गोष्टी खरेदी करणे इत्यादी प्रसंग येतात व यासाठी पैसा लागतो.

त्यामुळे आपण कमवत असलेल्या पैशांचा विनियोग आणि त्यांची बचत या दृष्टिकोनातून खूप लक्ष पुरवणे गरजेचे असते.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे केलेल्या बचतीची गुंतवणूक ही देखील फार महत्वाची असते. यासाठी स्वतःला आर्थिक नियोजनाची शिस्त लावणे महत्त्वाचे असते. मुलांच्या भविष्याची काळजी राहू नये या दृष्टिकोनातून बऱ्याच व्यक्ती गुंतवणूक करतात.

यासाठी अनेक गुंतवणूक योजना आहेत. यातील आपण या लेखांमध्ये अशा एका योजनेची माहिती घेणार आहोत की जी तुमच्या मुलाच्या भविष्याची चिंता कमी करेल व त्याला कोट्यावधीचा मालक देखील बनवू शकेल.

मुलांच्या उज्वल भविष्यासाठी महत्त्वाची असलेली गुंतवणूक योजना

आयुष्यामध्ये मुलं जशी जशी मोठी होतात तशी आपल्याला त्यांचे शिक्षण व लग्न इत्यादी बाबींसाठी लागणाऱ्या पैशांची तजवीज करून ठेवणे खूप गरजेचे असते.

तुम्ही आत्ताच पालक झालेले असाल तर तुम्ही मुलांच्या जन्मापासून या गुंतवणूक योजनेमध्ये गुंतवणूक करणे सुरू करू शकतात. या योजनेमध्ये जर तुम्ही मुलाच्या जन्मापासून गुंतवणूक करायला सुरुवात केली तर 21 व्या वर्षात तुम्हाला दोन कोटी पेक्षा जास्त परतावा मिळतो.

कोणत्या योजनेत करावी गुंतवणूक?

तुमच्या मुलाला जर तुम्हाला 21 व्या वर्षापर्यंत कोट्यावधीचा मालक बनवायचे असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. या माध्यमातून तुम्ही जेव्हा मुलगा 31 वर्षाचा होईल तेव्हा त्याच्या नावावर 25 लाख वीस हजार रुपये जमा करू शकतात.

जर अंदाजे या एसआयपी वर तुम्हाला 16 टक्के परतावा मिळाला तर 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलगा हा 2.06 कोटी रुपयांचा मालक होईल. तुम्ही 21 वर्षापर्यंत जमा केलेली रक्कम हे २५.२० लाख रुपये असल्यास 21 वर्षात तुम्हाला 1.81 कोटी रुपये मिळतील.

ही रक्कम मुलगा एकवीस वर्षाचा झाल्यानंतर त्याचे शिक्षण तसेच लग्न किंवा एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी वापरू शकतात. 16% ऐवजी जर तुम्हाला एसआयपी मध्ये फक्त 12% व्याज मिळाली तरीही तुम्ही मुलाच्या 25.20 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 88.66 लाख रुपयांचा परतावा मिळू शकतात.