कौतुकास्पद ! टरबूज लागवडीतून मात्र 3 महिन्यात कमवलेत 5 लाख; युवा शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी

Ajay Patil
Published:
success story

Watermelon Farming : अलीकडील काही वर्षात शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांना छेद देत इतर बागायती आणि हंगामी पिकांच्या लागवडीवर भर दिला आहे. शेतकऱ्यांची ही योजना मात्र त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत आहे. हंगामी पिकातून कमी कालावधीमध्ये आणि कमी खर्चात शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळू लागला आहे.

खानदेशातील धुळे तालुक्यातही असाच एक कौतुकास्पद प्रयोग एका शेतकऱ्याने केला आहे. शरद भगवान पाटील यांनी रमजान आणि अपकमिंग उन्हाळा लक्षात घेऊन आपल्या चार एकर शेतीमध्ये कलिंगड लागवडीचा प्रयोग केला आहे. विशेष बाब म्हणजे या युवा शेतकऱ्याने लागवड केलेले कलिंगड चांगले बहरले असून या चार एकरातून त्यांना विक्रमी उत्पादन मिळणार आहे.

उन्हाळ्याच्या आणि रमजानच्या पार्श्वभूमीवर निश्चितच या टरबूजला मागणी राहणार आहे. यामुळे त्यांना या चार एकर शेत जमिनीतून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे. अद्याप या टरबुजाची हार्वेस्टिंग झालेली नाही मात्र येत्या काही दिवसात याची हार्वेस्टिंग होईल आणि या चार एकरातून पाच लाखांपर्यंतची कमाई होईल असा अंदाज शरद यांनी बांधला आहे.

शरद सांगतात किती आत्तापर्यंत पारंपारिक पिकांची शेती करत आले आहेत. पारंपारिक पिकांमध्ये मात्र त्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा नफा खूपच कमी वाटत होता. परिणामी त्यांनी यावेळी पारंपारिक पिकाला छेद देत आपल्या चार एकर जमिनीत कलिंगड ची शेती करण्याचा निर्णय घेतला. शिवाय रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेली लागवड आता त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे चित्र आहे.

याच्या पार्श्वभूमीवर व्यापारी लोक सात ते आठ रुपये प्रति किलो अशा दरात या टरबुजाची खरेदी करतील असं शरद यांनी सांगितलं असून यातून त्यांना पाच लाखांची कमाई होणार आहे. विशेष म्हणजे व्यापारी आतापासूनच त्यांच्या शेतात गर्दी करत आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी त्यांचा टरबुजाचा प्लॉट पाहिला असून काही व्यापारी बोली देखील लावून गेले आहेत. तूर्तास मात्र त्यांनी टरबुजाची विक्री केलेली नाही तरीदेखील त्यांना यातून पाच लाखांपर्यंत हमखास उत्पन्न मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.

खरं पाहता पारंपारिक पिकांच्या शेती शेतकऱ्यांना सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर खानदेशातील बहुतांशी शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या हंगामी पिकांची आणि भाजीपाला पिकांची शेती सुरू केली आहे. शेतकऱ्यांचा हा निर्णय मात्र त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला आहे. शरद यांच्या कलिंगड लागवडीचा हा प्रयोग देखील यशस्वी ठरला असून इतर शेतकऱ्यांना यातून प्रेरणा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe