पट्ठ्याचा नादच खुळा ! ‘या’ जातीच्या टरबूजची 3 एकरात लागवड केली, मात्र तीन महिन्याच्या काळात 5 लाखांची कमाई झाली; वाचा कसं केलं नियोजन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Watermelon Farming : अलीकडे शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांना बदल देत नवीन हंगामी पिकांची शेती सुरू केली आहे. कमी कालावधीत काढणीसाठी तयार होणाऱ्या या पिकांच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. खानदेशात देखील शेतकरी आता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. असाच एक प्रयोग जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्याच्या मौजे पिळोदा येथील एका प्रगतिशील शेतकऱ्याने केला आहे. पिळोदा येथील नवयुवक शेतकरी अजय गुजर पाटील यांनी पारंपारिक पिकांऐवजी टरबूज या पिकाची शेती सुरू केली.

त्यांनी आपल्या तीन एकर शेत जमिनीत टरबूज ची लागवड केली आणि मात्र तीनच महिन्यात यातून त्यांना विक्रमी उत्पादन मिळालं. या टरबुजाच्या विक्रीतून त्यांना तब्बल पाच लाखांची कमाई झाली आहे. विशेष बाब म्हणजे अजय यांनी उत्पादित केलेले टरबूज थेट जम्मू आणि काश्मीरच्या बाजारात विक्रीसाठी गेले आहेत. त्यामुळे सध्या अजय पाटलांचा हा प्रयोग पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरत आहे.

अजय यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी डिसेंबर महिन्यात टरबूज ची लागवड केली. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या शेवटी त्यांनी आपल्या तीन एकर शेत जमिनीत जिग्ना गोल्ड या जातीच्या कलिंगडची लागवड केली. पीक लागवडीनंतर अंतर मशागत, पाणी व्यवस्थापन, खुरपणी, वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी, खतांची मात्रा देणे यांसारखे नियोजन केले. या कामी कृषी क्षेत्रातील तज्ञ लोकांची देखील त्यांनी मदत घेतली. योग्य व्यवस्थापन केल्यामुळे अजय यांना फक्त 90 दिवसात टरबूज पिकातून उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली.

यातून त्यांना जवळपास 65 टन माल मिळाला. नऊ रुपये प्रति किलो या भावात या टरबूजची विक्री झाली आणि माल हा थेट जम्मू आणि काश्मीरच्या बाजारपेठेत व्यापाराच्या माध्यमातून विक्रीसाठी पाठवण्यात आला. अजय यांनी सांगितल्याप्रमाणे तीन एकरातील या पिकासाठी त्यांना जवळपास 80 ते 85 हजार रुपये खर्च आला. यातून त्यांना पाच लाख 85000 उत्पन्न मिळालं. म्हणजेच त्यांना निव्वळ नफा पाच लाख रुपये राहिला आहे.

अजय सांगतात की, अजून टरबूज पिकातून किमान एक लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळणार आहे. यामुळे कमाईचा आकडा हा सहा लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे. निश्चितच अवघ्या तीन एकरात मात्र तीन महिन्यात पाच ते सहा लाख रुपयांची कमाई करत अजय यांनी इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केलं आहे. शेतकऱ्यांनी जर शेतीमध्ये बाजारपेठेचा अभ्यास करत आणि अशा हंगामी पिकांची लागवड केली तर निश्चितच त्यांना लाखो रुपयांची कमाई होऊ शकते हेच या प्रयोगातुन सिद्ध होत आहे.