कौतुकास्पद ! सुरू केली कलिंगड अन मिरचीची आंतरपीक शेती; एका एकरात झाली 6 लाखांची कमाई, पहा ही भन्नाट यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Watermelon intercropping farming : गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पुढ्यात वेगवेगळी नैसर्गिक संकटे येऊन ठेपत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेती करताना वेगवेगळ्या आव्हानाचा सामना करावा लागत असून अपेक्षित असं उत्पन्न शेतीमधून आता मिळत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे शेतकरी बांधव अहो रात्र काबाडकष्ट करून सोन्यासारखा शेतमाल उत्पादित करतात मात्र बाजारात या शेतमालाला चांगला भाव मिळत नाही. परिणामी शेती व्यवसाय हा तोट्याचा ठरत आहे. सध्या बाजारात कांदा, कापूस, सोयाबीनसह जवळपास सर्वच पिकांच्या बाजारभावात मोठी घसरण पहावयास मिळत आहे.

त्यामुळे पारंपारिक पिकांच्या शेतीत सातत्याने तोटाच सहन करावा लागत असल्याने शेतकऱ्यांनी आता बाजारपेठेच्या मागणीनुसार वेगवेगळ्या हंगामी पिकांची शेती सुरू केली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातही एका प्रयोगशील शेतकऱ्याने बाजाराची मागणी लक्षात घेऊन कलिंगड आणि मिरचीच्या पिकाची आंतरपीक शेती सुरू केली आहे. या शेतीतून या शेतकऱ्याला आता लाखो रुपयांची कमाई होणार आहे.

हे पण वाचा :- पंजाबराव डख हवामानाचा अचूक अंदाज कसा बांधतात; डख यांनी स्वतःच सांगितली याची माहिती

ही किमया साधली आहे ममदापूर येथील जनार्दन उगले या शेतकऱ्याने. उगले कायमच आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करत असतात. दरम्यान यावर्षी त्यांनी बाजारात मिरची आणि कलिंगडची मागणी लक्षात घेऊन या दोन्ही पिकाची शेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी आपल्या एक एकरात मल्चिंग पेपरचा वापर करून कलिंगड आणि मिरचीची आंतरपीक शेती सुरू केली. विशेष म्हणजे तिखट आणि फिकट अशा दोन प्रकारच्या मिरचीच्या पिकाची त्यांनी लागवड केली आहे.

दरम्यान आता त्यांनी लागवड केलेल्या मिरचीच्या पिकातून प्रत्यक्ष उत्पादन मिळू लागले आहे. पीक लागवडीनंतर योग्य व्यवस्थापन केल्यामुळे मिरचीच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळत आहे. सध्या बाजारात फिकी मिरची 30 ते 35 रुपये किलो आणि तिखट मिरची 50 ते 55 रुपये प्रति किलो या दरात विक्री होत आहे. तसेच कलिंगडचे देखील उत्पादन त्यांना मिळू लागले आहे.

हे पण वाचा :- छत्रपती संभाजीनगर वासियांसाठी खुशखबर! ‘या’ मोठ्या शहरादरम्यान सुरू होणार विमानसेवा, केव्हा सुरु होणार विमानसेवा? पहा…

मिरचीच्या पिकातून जवळपास तीन ते साडेतीन लाखांची कमाई होण्याची त्यांना आशा असून कलिंगडच्या पिकातून दोन लाखांपर्यंत उत्पन्न मिळेल असे त्यांनी यावेळी सांगितलं आहे. दरम्यान एका एकरासाठी या दोन्ही पिकांच्या शेतीत त्यांना जवळपास दोन ते अडीच लाखांचा खर्च आला आहे. कलिंगड आणि मिरचीच्या दोन्ही पिकातून युवा शेतकऱ्याला जवळपास सहा ते साडेसहा लाखांची कमाई होणार आहे. म्हणजेच खर्च वजा जाता जवळपास चार लाख रुपयांची कमाई त्यांना एका एकरात राहणार आहे.

निश्चितच एकीकडे बाजारात कांदा, सोयाबीन आणि कापूस अगदी कवडीमोल दरात विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित अशी कमाई होण्याचे चित्र दिसत नसताना या प्रयोगशील शेतकऱ्याने कलिंगड आणि मिरचीच्या पिकाच्या शेतीतून लाखो रुपयांची कमाई करत सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. या शेतकऱ्याची ही कामगिरी कौतुकास्पद असून यामुळे इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल यात तीळमात्र देखील शंका नाही.

हे पण वाचा :- मुंबई, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील टोल दरात ‘या’ दिवसापासून होणार मोठी वाढ, पहा किती लागणार आता टोल