Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

सावधान ! अवकाळी परत येतोय; ‘या’ भागात पुढील 3 दिवस कोसळणार वादळी पाऊस, तुमच्या भागात कसं राहणार हवामान?

Weather Update : मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील सुरुवातीचे चार दिवस राज्यात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान माजवले होते. विशेषता मार्च आणि एप्रिलमधला पाऊस हा शेतकऱ्यांच्या शेती पिकांसाठी मोठा घातक ठरला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पीक वाया गेले आहे. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक पावसाच्या भक्षस्थानी केल्यामुळे शेतकऱ्यांना यंदा रब्बी हंगामातून फारसे उत्पन्न मिळणार नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान गेल्या आठ ते दहा दिवसापासून राज्यातील तापमानाने विक्रम मोडण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात या हंगामातील विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, वाचा….

यामध्ये जळगाव जिल्ह्यात कमाल तापमानाने जवळपास 44 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. ईतरही उत्तर महाराष्ट्राचे जिल्ह्यात तापमान अधिक आहे. विदर्भात तर अक्षरशः अंगाची लाहीलाही होत आहे. अशातच मात्र पुन्हा एकदा देशातील हवामानाच रूप बदलणार असल्याचे चित्र आहे. या प्रचंड उकाड्यात आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रासह कोकणातील बहुतांशी भागात रात्रीच्या तापमानात घट झाली आहे. याशिवाय देशातील काही राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. अशातच स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने देशात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले आहे.

हे पण वाचा :- रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! पैसे नसले तरीही रेल्वेचे तिकीट बुक करता येणार, भारतीय रेल्वेने सुरू केली ‘ही’ विशेष सुविधा, पहा…

कोणत्या भागात पडणार पाऊस?

देशाच्या उत्तरेकडील राज्यात पावसाची शक्यता आहे. यामध्ये पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता असल्याचे मत स्कायमेटने व्यक्त केले आहे. केरळ, तामिळनाडू, बिहार, गिलगिट, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या राज्यातही पावसाची शक्यता आहे.

विशेष म्हणजे काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते असा अंदाज आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर ढगाळ हवामानाची शक्यता आहे.

हे पण वाचा :- ब्रेकिंग ! म्हाडाच्या मुंबई मंडळातील 4 हजार घरांसाठी सोडतीचे वेळापत्रक जाहीर; केव्हा निघणार जाहिरात, केव्हा लागणार लॉटरी, पहा…..

पावसाची शक्यता मात्र वर्तवण्यात आलेली नाही. परंतु ढगाळ हवामान राहील. मेघालय, आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, त्रिपुरामध्ये 18 ते 21 मे या दिवसांत मुसळधार पावसाचा ईशारा दिला आहे. साहजिकच तेथील जनतेला सतर्क राहणे अपेक्षित आहे.

काही हवामान तज्ञानी महाराष्ट्रात देखील 21 मे पासून हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 21 मे ते 24 मे च्या दरम्यान काही भागात पावसाची शक्यता राहणार आहे. त्यामुळे निश्चितच राज्यातील शेतकऱ्यांची खरीपपूर्व कामे खोळंबण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा :- मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसला ‘या’ रेल्वे स्थानकावर देखील मिळणार थांबा, पहा….