नागरिकांनो सावधान ! ‘या’ जिल्ह्यात येणार उष्णतेची लाट, तर ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस, भारतीय हवामान विभागाचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Update : महाराष्ट्रातील काही भागात भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे.

यामध्ये अहमदनगर (Ahmednagar Weather Update), मुंबई, नवी मुंबई, ठाणे तसेच विदर्भातील आणि मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांचा समावेश आहे. विदर्भात तर तापमानाने यंदाच्या हंगामातील विक्रमच मोडला आहे.

याशिवाय खानदेशातील जळगाव जिल्ह्यात देखील विक्रमी तापमानाची नोंद केली जात आहे. विदर्भ विभागातील नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, गोंदिया या जिह्यात तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. यामुळे तेथील जनतेला उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

हे पण वाचा :- रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; ‘अस’ झालं तर तिकीट असतानाही तुम्हाला दंड भरावा लागणार, काय सांगतो रेल्वेचा नियम, पहा….

नवी मुंबईत देखील अशीच परिस्थिती असून काल रविवारी म्हणजे सुट्टीच्या दिवशी देखील नवी मुंबईमध्ये अगदी पिन ड्रॉप सायलेन्स सारखी परिस्थिती बघायला मिळाली. दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून मुंबई, पालघर, ठाणे, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ विभागातील जिल्ह्यांना उष्णतेची लाट येणार असा इशारा दिला आहे.

त्यामुळे संबंधित जिल्ह्यांतील नागरिकांना अधिक सतर्क राहावे लागणार आहे. दरम्यान वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका कायम आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत उष्माघाताने तीन बळी घेतले आहेत.

यात नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा समावेश असून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात एका महिलेचा आणि भडगावमधील तरुणाचा देखील उष्माघाताने मृत्यू झाला आहे. यामुळे तापमान वाढीचा हा कहर जीवावर बेतत असल्याचे चित्र आहे.

हे पण वाचा :- शेअर आहे का कुबेरचा खजाना ! फक्त 3 वर्षात ‘या’ स्टॉकने दिला 3,050 टक्क्याचा परतावा, 1 लाखाचे बनलेत किती?, पहा….

म्हणून नागरिकांना तापमानात होणारी ही विक्रमी वाढ पाहता अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असून केवळ कामानिमित्त बाहेर पडावे असे आवाहन जाणकारांच्या माध्यमातून केले जात आहे. दरम्यान, आगामी काही दिवस राज्यात अशीच परिस्थिती पाहायला मिळू शकते असा अंदाज काही हवामान तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे.

याव्यतिरिक्त, देशातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता तयार होत आहे. मोच्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे दिल्ली -एनसीआरसह पंजाब, हरियाणा, चंदीगड तसेच राजस्थानच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सोबतच नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपूरा, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांची बल्ले बल्ले! 8 दिवस अगोदरच मान्सूनच आगमन; ‘या’ तारखेला महाराष्ट्रात दाखल होणार Monsoon, पंजाब डख यांचा अंदाज