Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

मोठी बातमी ! 30 अन 31 मार्चला होणार दानाफान, ‘या’ भागात पुन्हा गारपीटीची शक्यता; हवामान विभागाचा गंभीर इशारा

Weather Update : मार्च महिन्यात महाराष्ट्रासह देशातील बहुतांशी राज्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली. राज्यातील विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे.

Weather Update : मार्च महिन्यात महाराष्ट्रासह देशातील बहुतांशी राज्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली. राज्यातील विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. अवकाळी पावसासोबतच अनेक जिल्ह्यात गारपीट देखील झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे शेतकऱ्यांनी अगदी तळ-हाताच्या फोडाप्रमाणेच जोपसलेले रब्बी हंगामातील पीक वाया गेले आहे. दरम्यान आता दोन ते तीन दिवसांपासून पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास घेतला असून रब्बी हंगामातील काढणी योग्य पिकांची पुन्हा एकदा हार्वेस्टिंग जोमात सुरू आहे.

राज्याच्या बहुतांशी जिल्ह्यात गहू आणि हरभरा या रब्बी हंगामातील मुख्य पिकाची काढणी झाली आहे तर ज्या शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केली होती त्यांची देखील काढणी काही ठिकाणी पूर्ण झाली असून काही ठिकाणी सध्या स्थितीला सोंगणीचे कामे सुरू आहेत. दरम्यान आता भारतीय हवामान विभागाच्या वतीने एक गंभीर इशारा देण्यात आला आहे.

हे पण वाचा :- कौतुकास्पद ! सुरू केली कलिंगड अन मिरचीची आंतरपीक शेती; एका एकरात झाली 6 लाखांची कमाई, पहा ही भन्नाट यशोगाथा

देशातील काही राज्यात पुन्हा एकदा गारपीटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 30 ते 31 मार्च या कालावधीमध्ये गारपीटीची शक्यता राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 29 मार्च पर्यंत राज्यासह संपूर्ण देशभरात कोरडे हवामान राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी या कालावधीत आपली शेतीची कामे करून घेणे गरजेचे राहणार आहे.

कारण की, 30 मार्चपासून नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव दिसून येणार असल्याची माहिती विभागाच्या माध्यमातून सार्वजनिक करण्यात आली आहे. याचा प्रभाव म्हणून वायव्य भारतात 30 व 31 मार्चला विजांच्या गडगडाटांसह पावसाची शक्यता कायम राहणार आहे. अवकाळी पावसासोबतच गारपीट देखील या कालावधीत होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, 30 मार्चला हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, पूर्व उत्तर प्रदेश, राज्यस्थानमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे.

यासोबतच 31 मार्चला महाराष्ट्रातील विदर्भात गारपीटीची शक्यता आहे. यासोबतच छत्तीसगड आणि मध्यप्रदेश मध्ये ही 31 मार्चला गारपीट होऊ शकते असा अंदाज आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व भारतातील काही जिल्यांमध्येही पावसाची शक्यता कायम असून 1 एप्रिलपर्यंत या भागात पाऊस पडेल असा अंदाज आहे.

हे पण वाचा :- पंजाबराव डख हवामानाचा अचूक अंदाज कसा बांधतात; डख यांनी स्वतःच सांगितली याची माहिती

महाराष्ट्रातील या भागात पडणार अवकाळी पाऊस अन गारपीट

दरम्यान राज्यात वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रामुख्याने विदर्भात 31 मार्चला गारपीटीची शक्यता राहणार आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भात 30 आणि 31 मार्च रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गारपीट आणि अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता विदर्भातील शेतकऱ्यांना अधिक सजग राहण्याची गरज आहे.

हे पण वाचा :- छत्रपती संभाजीनगर वासियांसाठी खुशखबर! ‘या’ मोठ्या शहरादरम्यान सुरू होणार विमानसेवा, केव्हा सुरु होणार विमानसेवा? पहा…