अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता ! भारतीय हवामान विभागाचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Update : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात तापमानात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. काल जळगाव मध्ये 36 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी राज्यातील काही भागात अजूनही अवकाळी पाऊस कोसळत आहे.

यामुळे मात्र संबंधित भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. विशेष बाब अशी की आज देखील राज्यातील काही भागात भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एकंदरीत राज्यातील काही जिल्ह्यात तापमानात वाढ होत आहे तर काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनतेला सध्या मिश्र हवामानाची अनुभूती येत आहे.

दरम्यान आज राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाडा विभागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जवळपास सर्वच विभागात पावसाची शक्यता राहणार आहे.

मात्र या सर्व विभागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून आज या विभागात ताशी 30 ते 40 किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने संबंधित विभागातील नागरिकांनी अधिक सतर्क असणे गरजेचे आहे.

कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस?

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार आज चार मे 2023 रोजी राज्यातील कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

त्यामुळे कोकणातील या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय आज मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता राहणार असून या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट आयएमडीने जारी केला आहे.

तसेच आज छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर या मराठवाड्यातील जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे. तसेच विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात देखील आज पावसाची शक्यता कायम राहणार आहे.