Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अन ‘या’ जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता ! हवामान विभागाचा इशारा

Weather Update : राज्यात मार्च महिन्यापासून अवकाळी पाऊस पडत आहे. काही ठिकाणी गारपीट देखील झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान होत आहे. ऐन उन्हाळ्यात पडणारा हा पाऊस शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आता मान्सून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनच आगमन होण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही राज्यात पाऊस पडत असल्याने याचा परिणाम येत्या मान्सूनवर होऊ शकतो अशी भीती काही तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान आज देखील राज्यात पावसाची शक्यता कायम आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवार 5 मे 2023 रोजी राज्यातील काही भागात विजा, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता कायम राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की काल जालना आणि परभणी या दोन जिल्ह्यात पावसाची हजेरी पाहायला मिळाली.

याव्यतिरिक्त मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात देखील पाऊस झाला आहे. दरम्यान आज देखील राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

खरं पाहता सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत या वादळी पावसामुळे लग्न कार्यामध्ये विघ्न पडत आहे. दरम्यान आज कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे याबाबत आता आपण जाणून घेणार आहोत.

या जिल्ह्यात पडणार पाऊस 

IMD ने जारी केलेल्या माहितीनुसार, आज कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम आहे.

तसेच मध्य महाराष्ट्र विभागातील धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात देखील वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात वादळी पाऊस पडणार असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

तसेच विदर्भ विभागातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.