Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

1 एप्रिलपासून काय होणार महाग काय होणार स्वस्त; आताच चेक करा यादी

Whats become cheaper and Whats costlier : आर्थिक वर्ष 2022-23 उद्या संपणार आहे. त्यानंतर नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होईल. या नवीन आर्थिक वर्षात मात्र काही वस्तू मागणार आहेत तर काही वस्तू स्वस्त होणार आहेत. जसं की आपणास ठाऊकच आहे नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक उत्पादनांवर सीमाशुल्क आणि आयात शुल्क वाढवण्यात आले आहे. तर काही उत्पादनांच्या सीमा शुल्कात आणि आयात शुल्कात कपातही करण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून काही वस्तूंच्या किमती या विक्रमी वाढणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तर काही वस्तूंच्या किमती या विक्रमी कमी होणार आहेत. 1 फेब्रुवारी 2023 रोजी सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी नेमक्या कोणत्या उत्पादनांवर सीमाशुल्क आणि आयात शुल्क वाढवले आहे आणि कोणत्या उत्पादनांवरील हे शुल्क कमी केले आहे याबाबत आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया एक एप्रिल 2023 पासून म्हणजेच नवीन आर्थिक वर्षात कोणत्या वस्तू स्वस्त होतील आणि कोणत्या वस्तू या महाग होतील.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ईस्टर्न फ्रीवे बाबत मुंबई महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, वाचा याविषयी सविस्तर

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की वित्तमंत्री निर्मला सीतारमणीची यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना देशांतर्गत उद्योगाला चालना देण्यासाठी खासगी विमाने, हेलिकॉप्टर, हाय-एंड इलेक्ट्रॉनिक्स, दागिने, हाय- ग्लॉस पेपर यांच्या आयात वाढ करण्याची घोषणा केली आहे.

या पार्श्वभूमीवर आता एक एप्रिल 2023 पासून म्हणजेच येत्या महिन्यापासून त्यांच्या किमती वाढू शकतात. यासोबतच नवीन आर्थिक वर्षापासून गोल्ड आणि प्लॅटिनमच्या किमती देखील वाढणार आहेत. तसेच, केंद्र सरकारने कापड, फ्रोझन शिपले, फ्रोझन सक्विड, हिंग व कोको बीन्सवर कस्टम ड्यूटी कमी केली आहे, ज्यामुळे त्यांच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे.

याशिवाय, अॅसिटिक अॅसिड, पेट्रोलियम पदार्थामध्ये वापरण्यात येणारी रसायने आणि मोबाइलच्या कॅमेरा लेन्सवरील सीमा शुल्क कमी करण्यात आले आहे. म्हणजेच आता ज्या उत्पादनावरील शुल्क वाढवण्यात आले आहे त्यांच्या किमती वाढतील आणि ज्यांचे शुल्क कमी करण्यात आले आहे त्यांच्या किमती स्वस्त होणार आहेत. 

हे पण वाचा :- शिंदे-फडणवीस सरकारचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना ‘थोडी खुशी तो थोडा गम’ देणारा निर्णय; मानधनवाढ दिली पण अटी खूपच जाचक, पहा….

एक एप्रिल पासून काय स्वस्त होणार

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, एक एप्रिल 2023 पासून देशात खेळणी, सायकल, स्मार्ट टीव्ही, एलईडी टीव्ही, मोबाइल कॅमेरा लेन्स, लॅब-ग्रोन डायमंड, हिंग, तयार कपडे या सर्व वस्तू स्वस्त होणार आहेत. निश्चितच यामुळे देशभरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 

काय होणार महाग

येत्या आर्थिक वर्षात घरातील इलेक्ट्रिक चिमणी, सोन्या-चांदीचे दागिने, परदेशातून आयात केलेला माल, सिगारेट-तंबाखू उत्पादने, सोने, प्लॅटिनम, चांदीची भांडी महाग होणार आहेत. निश्चितच सोन्या चांदीच्या किमती वाढणार असल्याने महिलांसाठी ही एक धक्कादायक बाब राहणार आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! संपात सामील झालेल्या ‘त्या’ 18 लाख कर्मचाऱ्यांबाबत शिंदे-फडणवीस सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, पहा….