Diwali Special : दिवाळीच्या पूजेसाठी लक्ष्मीचा शुभ फोटो कोणता ? पूजेकरिता कोणता फोटो वापरू नये?

Ajay Patil
Published:

Diwali Special :- भारतातील सर्वात महत्त्वाच्या दिवाळी सणाला सध्या सुरुवात झालेली असून 10 नोव्हेंबर म्हणजेच आज धनत्रयोदशी आहे व 12 नोव्हेंबरला सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लक्ष्मीपूजन आहे.

या दिवशी घराघरांमध्ये देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. घरामध्ये लक्ष्मी नांदावी आणि भरभराट व्हावी हा महालक्ष्मी पूजनामागील प्रमुख उद्देश असतो. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते व याकरिता देवी लक्ष्मीचे चित्र म्हणजेच फोटोचा वापर सगळेजण करतात.

परंतु लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा लवकर सफल व्हावी याकरिता फोटोच्या बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. याबाबतीत ज्योतिषी यांचे मत काय आहे? तसेच लक्ष्मीपूजनासाठी कोणता फोटो वापरावा आणि कोणता वापरू नये? याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती या लेखात घेऊ.

दिवाळीच्या पूजेसाठी लक्ष्मीचा शुभ फोटो कोणता?

1- दिवाळीच्या पूजेकरिता तुम्हाला लक्ष्मीचा फोटो घ्यायचा असेल तर तो विकत घेताना देवी ज्या फोटोमध्ये कमळाच्या आसनावर बसलेले आहे तोच फोटो खरेदी करावा.

2- लक्ष्मीच्या फोटो सोबत जर ऐरावत हत्ती असेल तर हा फोटो पूजेसाठी खूप उत्तम मानला जातो.

3- तसेच फोटोमध्ये लक्ष्मीच्या दोन्ही बाजूला दोन हत्ती वाहत्या पाण्यामध्ये उभे आहेत व नाण्यांचा वर्षाव करत आहेत अशा पद्धतीचा फोटो देखील शुभ असतो.

4- तसेच ज्या फोटोमध्ये लक्ष्मी सोबत हत्ती आहेत व त्यांच्या सोंडेमध्ये सोन्याचे कलश घेऊन ते उभे आहेत अशा प्रकारचा फोटो देखील शुभ आहे.

5- तसेच ज्या फोटोमध्ये लक्ष्मी आणि भगवान विष्णू गरुडावर विराजमान आहे व देवी लक्ष्मी श्री विष्णूच्या पायाजवळ बसलेली आहे. असा फोटो देखील शुभ आहे.

6- तसेच लक्ष्मी सोबत श्री गणेश आणि सरस्वती सुद्धा असतील तर ते शुभ आहे.

7- तसेच ज्या फोटोमध्ये देवी दोन्ही हातांनी पैशांचा वर्षाव करत आहे तो फोटो देखील शुभ आहे. 8- तसेच भगवान विष्णू सोबत देवी लक्ष्मी गरुड देवावर विराजमान असेल तर असा फोटो पूजेसाठी खूप चांगला मानला जातो. अशा फोटोची पूजा केल्यानंतर घरामध्ये सुख समृद्धी तसेच शांती टिकून राहते. एवढेच नाही तर वैवाहिक जीवनामध्ये प्रेम टिकून राहते.

पूजेकरिता कोणता फोटो वापरू नये ?

1- ज्या फोटोमध्ये देवीचे पाय दिसत असतील किंवा देवी उभी असेल असा फोटो पूजेसाठी वापरू नका किंवा ठेवू नका. यामागे अशी मान्यता आहे की जेव्हा आपण लक्ष्मीची पूजा करतो तेव्हा देवी जास्त वेळ करीता आपल्या घरामध्ये थांबत नाही. त्यामुळे आसनावर बसलेल्या लक्ष्मीची पूजा करणे श्रेष्ठ मानले जाते.

2- घुबडावर बसलेल्या लक्ष्मीच्या फोटोची पूजा करू नये. कारण यामागे अशी मान्यता आहे की अशा देवी लक्ष्मीची पूजा केली तर घरात वाईट धन येण्याची शक्यता बळावते व अशा संपत्तीमुळे घरामध्ये कलह व अशांतता येते.

3- तसेच एकट्या लक्ष्मीची पूजा करू नये. यासोबत श्री गणेश आणि सरस्वती या दोन्ही देवता लक्ष्मीदेवीच्या सोबत असतील तर ते शुभ आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe