सध्या जर आपण राज्यातील शिक्षक भरतीच्या संदर्भात पाहिले तर ही भरती प्रामुख्याने पवित्र संकेतस्थळाच्या माध्यमातून पार पाडली जाते. यामध्ये निवड झालेल्या शिक्षकांना स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये नियुक्त केले जाते.
तसेच राज्यातील शिक्षक भरती ही अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मध्ये जे काही गुण मिळतात त्या आधारे केंद्रीय पद्धतीचे पवित्र संकेतस्थळावर राबवली जाते.

अशाप्रकारे सध्या शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे. परंतु अशा पद्धतीने शिक्षक पद भरती झाल्यानंतर मात्र नियुक्त झालेल्या नवीन शिक्षकांना अनेक वर्षांपर्यंत स्वतःचा जिल्ह्याच्या बाहेर राहून इतर जिल्ह्यांमध्ये काम करावे लागते. त्यामुळे आता आंतरजिल्हा बदली संदर्भातली मागणी शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर केली जाते.
याप्रकारे बदली झाल्यानंतर नवीन जिल्ह्यांमध्ये शून्य सेवाजेष्ठतेवर शिक्षकांना यावे लागते. या सगळ्या समस्येवर उपाय म्हणून आता शासनाने महत्त्वाचा एक निर्णय घेतला असून या भरती कार्यपद्धतीमध्येच यामुळे बदल होऊ शकतो.
शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात मिळणार नोकरीची संधी?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीमध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करून नवीन बदल करण्याकरिता शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये सुधारणा करता यावी याकरिता अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे
व त्यामुळे शिक्षकांना आता स्वतःच्या जिल्ह्यामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे बदल करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हालचाली सुरू झालेल्या आहेत.
सध्या जर आपण बघितले तर राज्यातील शिक्षकांची भरती ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जे काही गुण मिळालेले असतात त्या आधारे केंद्रीय पद्धतीने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबवली जाते व या भरती प्रक्रियेतून निवड झालेले शिक्षक हे स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांना उपलब्ध करून दिले जातात.
अशाप्रकारे शिक्षकांची भरती झाल्यानंतर मात्र शिक्षकांना अनेक वर्षांपर्यंत स्वतःच्या जिल्ह्याच्या बाहेर राहून इतर जिल्ह्यात काम करावे लागते व साहजिकच काही दिवसांनी शिक्षकांकडून आंतरजिल्हा बदलीची मागणी केली जाते. अशाप्रकारे बदली झाल्यानंतर मात्र नवीन जिल्ह्यात शून्य सेवाजेष्ठतेवर शिक्षकांना यावे लागते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यामध्ये नोकरीची संधी मिळणे आवश्यक आहे व शिक्षक अधिक कार्यक्षमतेने काम करतील व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देतील या प्रकारचा दृष्टिकोन ठेवून आता सध्याच्या शिक्षक भरती मधील ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करून जिल्हा आणि विभाग स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियेबाबतचा अभ्यास करून कार्यपद्धती सुचवावी
याकरिता शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट नियुक्तीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून या अभ्यासगटामध्ये शिक्षण आयुक्त तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालक
व इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे व या अभ्यास गटाला यासंबंधीचा अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत याबाबत काय निर्णय घेतला जातो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.