Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

महिलांसाठी खुशखबर ! शासनाच्या ‘या’ योजनेतून मिळणार 5 लाखांचं विनातारण अन बिनव्याजी कर्ज; कोणत्या महिलांना मिळणार पाच लाख? पहा…

Women Business Loan Scheme : महिला सक्षमीकरणासाठी शासनाकडून वारंवार प्रयत्न केले जात आहेत. केंद्र शासन तसेच राज्य शासन आपापल्या स्तरावर महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. वास्तविक, महिला आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

उद्योग असो, कृषी असो किंवा अन्य कोणतेही क्षेत्र महिला आता प्रत्यक क्षत्रात आपला ठसा उमटवू लागल्या आहेत. शिक्षणात नैपूण्य मिळवलेल्या महिला आता उद्योगात देखील आपलं नशीब आजमावत आहेत. विशेष म्हणजे उद्योगात महिला पुरुषांना वरचढ ठरत आहेत.

पुरुषांपेक्षा अधिक यश महिलांनी मिळवून दाखवले आहे. परंतु व्यवसायाची सुरुवात करताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यात सर्वाधिक मोठी अडचण म्हणजे पैशांची अडचण. पैशाअभावी मनात इच्छा असून देखील महिलांना आपला व्यवसाय थाटता येत नाही, उभारता येत नाही.

हे पण वाचा :- अवकाळी पावसाचा मुक्काम लांबला ! तब्बल ‘इतके’ आठवडे सलग पाऊस पडणार; भारतीय हवामान तज्ज्ञांचा अंदाज

परंतु आता व्यवसाय करण्याची जिद्द असलेल्या महिलांसाठी केंद्र शासनाने पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे. केंद्र शासनाने सूचना केल्याप्रमाणे आता अनेक बँकांनी महिलांना व्यवसायात मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

केंद्र शासनाने सूचना दिल्याप्रमाणे उद्योगिनी योजना बँकांच्या माध्यमातून राबवली जात असून या योजनेअंतर्गत महिलांना पाच लाखांपर्यंतचे कर्ज मिळत आहे. विशेष बाब म्हणजे हे कर्ज विनातारण म्हणजेच काहीही गहाण न ठेवता महिलांना देऊ केलं जाणार आहे. तर काही महिलांना या योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज मिळतं तर काही महिलांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होतं.

दरम्यान आज आपण कोणत्या महिलांना बिनव्याजी कर्ज मिळतं, तर कोणत्या महिलांना व्याज द्यावे लागेल याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच कोणत्या व्यवसायासाठी महिलांना कर्ज मिळू शकत याबाबत देखील तपशीलवार पण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा :- मुंबई-अहमदाबाद प्रवास आता होणार सुसाट आणि सुरक्षित; Mumbai-Ahmedabad हायवेवर ‘या’ ठिकाणी तयार होणार नवीन भुयारी मार्ग, पहा…..

कोणत्या महिलांना मिळणार बिनव्याजी कर्ज?

या योजनेअंतर्गत 3 लाखापासून ते पाच लाखापर्यंतच कर्ज व्यवसायासाठी मिळत असतं. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच शारीरिक दृष्ट्या विकलांग असलेल्या महिलांना बिनव्याजी कर्ज दिले जात आहे. इतर महिलांना मात्र यासाठी व्याज द्यावे लागणार आहे. मात्र व्याजदर हे अत्यल्प असणार आहे.

कोणत्या बँका देणार कर्ज?

अनेक सरकारी आणि खाजगी बँका आहेत जेथून हे कर्ज मिळू शकतं. पंजाब बँक, सिंध बँक आणि सारस्वत बँक यांसारख्या बँकेतून सहजतेने महिलांना हे कर्ज उपलब्ध होऊ शकतं.

कोणत्या व्यवसायासाठी मिळणार कर्ज?

बांगड्या बनवण्याचा व्यवसाय, ब्युटी पार्लर व्यवसाय, बेडशीट आणि टॉवेल बनवण्याचा व्यवसाय, बुक बायडिंग आणि नोटबुक बनवण्याचा व्यवसाय, कॉफी आणि चहा पावडर बनवण्याचा व्यवसाय, मसाल्याचा व्यवसाय, कापूस धागा उत्पादन, रोपवाटिका व्यवसाय, कापड कापड व्यवसाय, दुग्धव्यवसाय आणि पोल्ट्री संबंधित व्यवसाय, डायग्नोस्टिक लॅब व्यवसाय, ड्राय क्लीनिंग व्यवसाय, सुक्या मासळीचा व्यापार, खाण्याचा व्यवसाय, खाद्यतेलाचे दुकान इत्यादी व्यवसायासाठी या योजनेअंतर्गत महिलांना पाच लाखापर्यंतच कर्ज मिळू शकत.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो काळजी घ्या ! ‘या’ जिल्ह्यात कोसळणार अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट