जगातील सर्वाधिक लांबीचे रेल्वे प्लॅटफॉर्म हिंदुस्थानात ! गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे नाव, कोणते आहे ते स्टेशनं, पहा
Worlds Longest Railway Platform in India : भारतात प्रवासी प्रवासासाठी रेल्वेला विशेष पसंती दाखवतात. लांब पल्ल्याचा प्रवास नेहमीच रेल्वे मार्गे करण्यावर प्रवासी भर देतात. याच प्रमुख कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास आपल्या देशात खूपच स्वस्त आहे आणि जलदही आहे.
यामुळे जलद गतीने आणि स्वस्तात प्रवासासाठी रेल्वेला पसंती दाखवली जाते. भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे देशातील सर्वाधिक लांबीचे चौथे नेटवर्क आहे. एका आकडेवारीनुसार देशात जवळपास चार कोटी लोक रोजाना रेल्वे मार्गे प्रवास करतात. निश्चितच भारतीय दळणवळण व्यवस्थेत रेल्वेचे एक मोलाचे स्थान आहे.
विशेष म्हणजे भारतात जगातील सर्वाधिक लांबीचे रेल्वे प्लॅटफॉर्म देखील आहे. निश्चितच ही भारताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची बाब आहे. दरम्यान आज आपण जगातील सर्वाधिक लांबीचे रेल्वे प्लॅटफॉर्म भारतात कुठे आहे आणि या प्लॅटफॉर्मच्या विशेषता काय आहेत याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- गुंतवणूकदारांची झाली चांदी ! ‘हा’ 37 रुपयाचा स्टॉक पोहचला 490 रुपयांवर; वाचा स्टॉकची सविस्तर माहिती एका क्लिकवर
जगातील सर्वाधिक लांबीचे रेल्वे प्लॅटफॉर्म
देशातील आणि जगातील सर्वाधिक लांबीचे रेल्वे प्लॅटफॉर्म कर्नाटक राज्यात आहे. कर्नाटक मधील हुबली रेल्वे स्थानकावर हे प्लॅटफॉर्म आहे. याला श्री सिद्धारूढ़ स्वामीजी हुबली स्टेशन म्हणून संपूर्ण जगात ख्याती प्राप्त आहे. या रेल्वे स्टेशनचे केंद्र शासनाच्या माध्यमातून वीस कोटी रुपये खर्च करून पुनर्निर्माण करण्यात आले आहे.
भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे झोनमध्ये या रेल्वे स्थानकाचा समावेश होतो. हुबली रेल्वे स्टेशन हे कर्नाटक मधील महत्त्वाचे जंक्शन आहे. या रेल्वे स्टेशनवर वाढणारी प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वे स्टेशनवर पाच प्लॅटफॉर्मच रिनोवेशन करण्यात आल आहे सोबतच तीन नवीन प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहेत.
यापैकी फलाट क्रमांक-8 ची म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक 8 ची लांबी 1507 मीटर आहे. हेच रेल्वे प्लॅटफॉर्म जगातील सर्वाधिक लांबीचे रेल्वे प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाते. लांब मालवाहू गाड्यांच्या मुक्कामासाठी हा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे. या स्थानकावरून दोन इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह मालगाड्या एकाच वेळी धावतात.
ही या प्लॅटफॉर्मची विशेषता आहे. या प्लॅटफॉर्मचा गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच १३६६.३३ मीटर लांबीचे गोरखपुर जंक्शन वरील रेल्वे प्लॅटफॉर्म देशातील दुसऱ्या सर्वाधिक लांबीचे रेल्वे प्लॅटफॉर्म आहे आणि केरळमधील कोल्लम जंक्शनवरील 1180.5 मीटर लांबीचे प्लॅटफॉर्म हे देशातील सर्वाधिक लांबीचे तिसरे प्लॅटफॉर्म आहे.
हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! आरोग्य विभागात मोठी भरती; ‘या’ पदाच्या 4751 पदे भरली जाणार, वाचा सविस्तर