अखेर फिक्स झाल रावं ! ‘या’ कारखान्याची धुराडी पुन्हा पेटणार ; 5 तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

Yavatmal News : ऊस हे राज्यात उत्पादित केल जाणारा एक मुख्य नगदी पीक आहे. याची महाराष्ट्रातील सर्वच विभागात लागवड केली जाते. विदर्भातील बागायती भागातही याची लागवड पाहायला मिळते.

दरम्यान आता विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुक्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे स्थित वसंत साखर कारखाना लवकरच सुरू होणार आहे. यामुळे आजूबाजूच्या पाच तालुक्यातील ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हा कारखाना खासदार हेमंत पाटील यांनी पंधरा वर्षासाठी भाडेतत्त्वावर चालवायला घेतला आहे. अशा परिस्थितीत कारखाना चालवण्यासाठी वेगवेगळ्या पदांची आवश्यकता असून या पदांची भरती सुरू झाली आहे. यासाठी नांदेड येथे मुलाखती घेण्यात आल्या आहेत. यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील 30 किलोमीटर अंतरावरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गेली पाच वर्षे हा कारखाना बंद असल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नाईलाजाने दुसरी पिके घ्यावी लागत होती. विशेष म्हणजे कारखाना बंद असल्याने पंचक्रोशीतील छोटी मोठी कृषी आधारित व्यवसाय बंद झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करणार आहेत.

पुन्हा एकदा उद्योगधंद्यांना गती मिळणार आहे. या साखर कारखाना मुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. हा सदर कारखाना बंद असल्याने परिसरातील तरुण रोजगाराच्या शोधात दुसरीकडे पलायन करत होते. त्यामुळे वसंत साखर कारखाना केव्हा सुरू होईल हा प्रश्न शेतकऱ्यांसमवेतच परिसरातील नवयुवकांपुढे उभा झाला होता.

ते आलेल्या माहितीनुसार वसंत कारखान्यासाठी आवश्यक चीफ इंजिनिअर, चीफ केमिस्ट, सुरक्षारक्षक चालक इत्यादी पदांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. यामुळे हा कारखाना लवकरच सुरू होणार आहे. कारखाना सुरू झाल्यास कारखाना क्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून परिसरात उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे.

यामुळे पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. यवतमाळ, हिंगोली, नांदेड, किनवट, माहूर, हिमायतनगर, या परिसरातील शेतकऱ्यांना तसेच बेरोजगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. वसंत मुळे शेतकऱ्यांना आपला ऊस टाकण्यास सोयीचे होणार आहे तर बेरोजगारांना हाताला काम मिळणार आहे.