तुमच्या मनामध्ये देखील एखादी SUV कार खरेदी करण्याचा विचार सुरू आहे व तुम्हाला कमी किमतीतली चांगली एसयूव्ही कार खरेदी करायची आहे तर ही बातमी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी ठरेल. कारण भारतातील प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्सच्या माध्यमातून कंपनीच्या लोकप्रिय असलेल्या एसयूव्ही सफारी कारवर बंपर सूट देण्यात येत असून
तुम्ही जर ऑगस्ट महिन्यामध्ये टाटा सफारी खरेदी केली तर या कारवर तब्बल एक लाख 65 हजार रुपयांपर्यंत तुम्ही बचत करू शकणार आहात. या सवलतीमध्ये कार्पोरेट सुट तसेच एक्सचेंज बोनस आणि रोख सवलतीचा समावेश करण्यात आलेला आहे.

टाटा मोटर्सच्या माध्यमातून देण्यात येत असलेली ही सूट टाटा सफारीच्या MY 2023 वर देण्यात येत आहे. जर तुम्हाला ही कार घ्यायची असेल व या ऑफरबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरची संपर्क साधू शकतात.
काय आहेत टाटा सफारीमध्ये महत्त्वाची वैशिष्ट्ये?
या कारच्या इंटेरियरमध्ये ग्राहकांना 12.3 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आले असून 20.25 इंच फुल डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 10 स्पीकर जेबीएल साऊंड सिस्टम आणि वायरलेस फोन चार्जर सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. एवढेच नाही तर या कारमध्ये ऑटोमॅटिक एसी, पॅनोरामिक सनरूफ आणि एअर पुरिफायर देखील देण्यात आले आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या कारमध्ये स्टॅंडर्ड सहा एअर बॅग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, 360 डिग्री कॅमेरा व त्यासोबत इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण देखील उपलब्ध आहे.
सुरक्षिततेच्या बाबतीत सफारीला मिळाले आहेत पाच स्टार रेटिंग
जर या कारचा पावरट्रेन पाहिला तर यामध्ये 2.0 लिटर डिझेल इंजिन देण्यात आलेले असून ते जास्तीत जास्त 170 बीएचपी पावर आणि ३५० एनएमचा पिक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
तसेच या एसयूव्हीचे इंजिन सहा स्पीड मॅन्युअल आणि सहा स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले असून या कारचे मायलेज पाहिले तर टाटा सफारीच्या मॅन्युअल व्हेरियंटमध्ये 16.30 किमी प्रति लिटर मायलेज देण्याचा कंपनीचा दावा आहे तर ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये 14.50 किलोमीटर प्रतिलिटरचे मायलेज देण्याचा दावा कंपनी करते.
महत्वाचे म्हणजे टाटा सफारी ही सहा सीटर आणि सात सीटर कॉन्फिगरेशन मध्ये येते व ज्याला ग्लोबल आणि इंडिया एनसीईपीद्वारे कौटुंबिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून क्रॅश चाचणीमध्ये 5 स्टार रेटिंग देण्यात आले आहे.
किती आहे टाटा सफारीची किंमत?
जर आपण टाटा सफारी या कारची भारतीय बाजारपेठेमधील एक्स शोरूम किंमत पाहिली तर ती 16 लाख 19 हजार रुपये असून टॉप मॉडेलसाठी ही किंमत 27 लाख 34 हजार रुपये आहे.