शेळी पालन व्यवसाय करायचा आहे पण पैसे नाहीत? शेळीपालनासाठी ‘ही’ बँक देईल 50 हजार ते 50 लाखापर्यंत कर्ज! वाचा संपूर्ण माहिती

Ajay Patil
Published:
goat rearing

सध्या नोकऱ्यांची उपलब्धता खूपच कमी असल्यामुळे अनेक सुशिक्षित तरुण तरुणी आता व्यवसायांकडे वळू लागले आहेत. परंतु व्यवसाय करायचा म्हटला म्हणजे तुम्हाला भांडवल म्हणून पैसा हा लागतो. त्यामुळे बऱ्याच जणांच्या व्यवसाय कल्पना या पूर्णत्वास येत नाहीत. अनेक जणांची व्यवसाय करण्याची इच्छा असते व त्यासंबंधीचे सगळे प्लॅनिंग देखील होते.

परंतु गोष्ट अडते ती प्रामुख्याने पैशांमध्ये. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रयत्न करून किंवा बँकांच्या माध्यमातून व्यवसाय कर्ज घेऊन व्यवसाय उभारणीसाठी प्रयत्न केले जातात. अगदी याचप्रमाणे शेतीशी प्रमुख निगडित असलेल्या जोडधंदा जर पाहिला तर हा आता शेळीपालन असून अनेक सुशिक्षित तरुण आता शेळीपालन व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत.

कारण हा व्यवसाय करण्यासाठी कमी खर्च तसेच कमी जागा लागते व त्यामानाने आर्थिक नफा मात्र चांगला मिळतो. परंतु शेळी पालन व्यवसाय करायचा म्हटला म्हणजे याकरिता देखील पैसा लागतोच. त्या अनुषंगाने या लेखामध्ये जर तुम्हाला देखील शेळीपालन व्यवसाय करायचा असेल तर  तुम्ही बँकेच्या माध्यमातून कर्ज मिळवू शकतात. याच कर्जासंबंधीचे संपूर्ण माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 आयडीबीआय बँक देते शेळीपालनासाठी कर्ज

जर आपण देशामधील प्रमुख बँक पाहिल्या तर त्यामध्ये अग्रगण्य बँक म्हणून आयडीबीआय बँक ओळखली जाते. या बँकेच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना शेळीपालनासाठी कर्जाची सुविधा दिली जाते व बँकेच्या या कर्ज योजनेचे नाव आहे कृषी कर्ज शेळी- मेंढी पालन योजना होय. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज देण्यात येते.

जर तुम्हाला देखील शेळीपालन व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला आयडीबीआय बँक पन्नास हजारापासून ते 50 लाख रुपयांपर्यंत असलेल्या तुमच्या प्रकल्प अहवालानुसार कर्जाची सुविधा देते व याकरता करिता बँकेच्या माध्यमातून सात टक्क्यांचा व्याजदर आकारला जातो.

 कोण कोणती लागतात कागदपत्रे?

आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून जर शेळीपालनासाठी कर्ज घ्यायचे असेल तर त्याकरिता अर्जदाराकडे पासपोर्ट आकाराचा फोटो, मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट, तुमचा शेळी पालन व्यवसायाचा संपूर्ण प्रकल्प अहवाल, रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, बीपीएल कार्ड( जर असेल तर) आणि जात प्रमाणपत्र( प्रामुख्याने एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील असतील तर)

 या कर्जासाठी कुठे कराल अर्ज?

1- तुम्हाला जर शेळीपालन व्यवसाय उभा करायचा असेल व त्याकरिता कर्ज हवे असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर आयडीबीआय बँकेच्या शाखेला भेट देणे गरजेचे आहे.

2- या भेटी वेळी तुम्ही बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या योजनेबद्दलची सर्व माहिती घेणे गरजेचे आहे.

3- त्यानंतर त्यांच्याकडून कर्जासाठी आवश्यक अर्ज घ्यावा व तो भरून घ्यावा.

4- अर्जामध्ये जी जी माहिती विचारलेली आहे ती काळजीपूर्वक भरावी व सांगितलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडून तो अर्ज बँकेमध्ये जमा करावा.

5- त्यानंतर बँक तुमच्या अर्जाची पडताळणी करून तुमचा शेळी पालन व्यवसायाचा प्रकल्प अहवाल बघते व कर्ज मंजूर करण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करते.

 मुद्रा लोन योजनेतून देखील मिळते आर्थिक मदत

जर आपण शेळीपालन व्यवसायाचा प्रकार पाहिला तर हा गैर कृषी व्यवसायामध्ये गणला जातो. त्यामुळे सरकारकडून सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसायांच्या श्रेणीत हा व्यवसाय ठेवण्यात आला आहे. शेळीपालनासाठी अनुदानावर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेळ्यांचे गट वाटप देखील केले जाते.

परंतु ही योजना अनुसूचित जाती/ जमाती शेतकऱ्यांसाठी असते व त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. परंतु मोठ्या क्षमतेने जर सर्व शेतकऱ्यांना शेळीपालन व्यवसाय करायचा असेल तर केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून मुद्रा लोन योजनेच्या अंतर्गत देखील शेळीपालन व्यवसायासाठी कर्जाचा पर्याय उपलब्ध आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe