प्रत्येकाला स्वतःचे हक्काचे घर असावे हे स्वप्न असते. परंतु घरांच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला घर खरेदी करणे किंवा नवीन घर बांधणे शक्य होत नाही. याकरिता स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करता यावे म्हणून व्यक्ती गृहकर्जाचा पर्याय निवडतो व गृह कर्ज घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करतो.
साहजिकच गृह कर्ज घेतल्यामुळे त्याचे हप्ते आपल्याला फेडावे लागतात व गृह कर्जाची रक्कम मोठी असल्यामुळे कधी कधी पूर्ण आयुष्यभर देखील आपण गृह कर्जाचे हप्ते फेडण्यामध्ये गुंतून पडतो. आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण होमलोन घेतो अशावेळी घेतलेल्या कर्जापेक्षा जास्तीचे रक्कम आपण नुसती व्याज म्हणून बँकेला देत असतो.
घरमालकाचे कित्येक लाख रुपये फक्त व्याजापोटी जातात. परंतु जर तुम्ही आयुष्यामध्ये योग्य आर्थिक नियोजन केले व होमलोन घेतले परंतु योग्य ठिकाणी काही उरलेल्या पैशांची गुंतवणूक केली तर होमलोन साठी करावी लागणारी रक्कम तुम्ही गुंतवलेले पैशांमधून वसूल करून घर फुकटात पदरात पाडू शकतात.
एसआयपीतील गुंतवणूक यामध्ये करेल तुम्हाला मदत
फुकटामध्ये घर पदरात पाडून घेण्याची संकल्पना ही एसआयपीशी निगडित करून पाहिली तर एसआयपीतील गुंतवणूक त्यासाठी योग्य पर्याय आहे.
आपल्याला माहित आहे की जर म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक केली तर त्यावर आपल्याला चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळत असतो व यामुळे तुम्ही एसआयपी मध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेवर मोठा नफा आपल्याला मिळतो. याप्रकारे तुम्ही होम लोनच्या माध्यमातून घरात गुंतवलेली रक्कम एसआयपीच्या माध्यमातून वसूल करू शकतात.
उदाहरणाने समजून घेऊ..
समजा तुम्ही 50 लाख रुपये किमतीचे घर घेतले हे घर घेण्यासाठी तुम्ही होमलोनचा पर्याय निवडला. आज होमलोन घेतले तर त्यावर तुम्हाला आठ ते नऊ टक्क्यांची व्याज बँकेकडून आकारले जाते. समजा तुम्ही 8.5% व्याजदराने होमलोन घेतले व या कर्जाची तुम्हाला 25 वर्षांमध्ये परतफेड करायचे आहे तर प्रति वर्ष 8.5% या व्याजदराने तुम्हाला महिन्याला 40261 रुपये हप्ता भरावा लागेल.
जेव्हा तुम्ही 40,261 रुपये हप्ता 25 वर्ष सलग भराल तेव्हा तुम्ही त्यावर 70 लाख 78 हजार 406 इतकी व्याज द्याल. म्हणजेच पंचवीस वर्षांमध्ये तुम्ही 50 लाख होमलोन करिता बँकेला एकूण 1 कोटी 20 लाख 78 हजार रुपये परत करतात. परंतु ही सगळी रक्कम तुम्ही एसआयपीत केलेल्या गुंतवणुकीच्या माध्यमातून वसूल करू शकतात.
जेव्हा तुम्हाला चाळीस हजार दोनशे एकसष्ट रुपये होमलोनचा हप्ता सुरू होतो त्याच महिन्यापासून तुम्ही जर सात हजार रुपयांची एसआयपी करायला सुरुवात करणे गरजेचे आहे व होमलोनचा कालावधी संपेपर्यंत सुरू ठेवणे महत्त्वाचे राहील. यामध्ये जर तुम्ही सलग 25 वर्षांसाठी 7000 रुपयांची प्रति महिना एसआयपी केली तर तुमची होमलोन पोटी बँकेला गेलेले एक कोटी 20 लाख 76 हजार 406 रुपयाची रक्कम वसूल करता येऊ शकतात.
कसे होईल हे शक्य?
एसआयपी ही भांडवली बाजाराशी कनेक्ट असली तरी देखील यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो व साधारणपणे 12 टक्के दराने हा परतावा मिळतो. एसआयपीत केलेल्या गुंतवणुकीवर 12 टक्के दराने परतावा गृहीत धरला तरी देखील प्रत्येक महिन्याला सात हजार रुपये एसआयपी 25 वर्षांसाठी केल्यास तुमची एकूण गुंतवणूक 21 लाख रुपये होते व यातून तुम्हाला 25 वर्षानंतर एक कोटी अकरा लाख 83 हजार 446 रुपये व्याज मिळते.
म्हणजेच होमलोन संपेल तेव्हाच तुमची एसआयपी देखील संपेल. जेव्हा तुमची एसआयपी संपेल तेव्हा तुम्हाला एक कोटी 32 लाख 83 हजार 446 रुपये मिळतील. म्हणजेच पंचवीस वर्षाच्या होम लोनकरिता तुम्ही जितके पैसे बँकेला देत आहात तितकेच पैसे तुम्हाला एसआयपी मुळे परत मिळतात.
म्हणजे अगदी सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे तुम्हाला तुमचे घर फुटतात पडते. दुसरा फायदा म्हणजे पंचवीस वर्षानंतर घेतलेल्या तुमच्या घराची किंमत काही पटींनी देखील वाढलेली असते.