पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जितके पर्यटक हे देशातील विविध ठिकाणांना भेटी देतात आणि त्या भेटीमध्ये विविध निसर्ग सौंदर्य स्थळे तसेच धबधबे, थंड हवेची ठिकाणे, निसर्ग सौंदर्याने नटलेले हिल स्टेशन इत्यादी ठिकाणी भेटी देतात व दैनंदिन जीवनातील ताणतणाव काही काळापुरता तरी दूर करून मनाला निरव शांतता अनुभवता.
अगदी याचप्रमाणे काही पर्यटक हे नैसर्गिक स्थळांसोबतच धार्मिक पर्यटनाकडे देखील मोठ्या प्रमाणावर वळताना आपल्याला दिसून येत असून असे पर्यटक अनेक धार्मिक ठिकाणांना भेटी देतात. आपल्या भारतीय परंपरेमध्ये अनेक सण उत्सव किंवा महिने आहेत की त्यांना धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्व असते व या कालावधीत अनेक ठिकाणी लोक दर्शनाला जातात.

याच प्रमाणे जर आपण श्रावण महिन्याचा विचार केला तर श्रावण महिन्याच्या कालावधीत भगवान शिव शंकराच्या दर्शनाचे महत्त्व अनन्यसाधारण असते व श्रावन महिन्यातील प्रत्येक सोमवारी देशातील बहुसंख्य महादेव मंदिरामध्ये आणि असलेल्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होते.
अगदी याच पद्धतीने आता येऊ घातलेल्या श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी जर तुम्हाला देखील भगवान श्री शिव शंकराचे दर्शन घ्यायचे असेल व तुम्हाला ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाला जायचे असेल तर तुम्ही मध्य प्रदेश राज्यांमध्ये जाऊन दोन दिवसात दोन ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेऊ शकता.
मध्यप्रदेश राज्यात जा आणि दोन ज्योतिर्लिंगांचे दर्शन घ्या
आपल्याला माहित आहे की मध्य प्रदेश राज्यांमध्ये दोन पवित्र ज्योतिर्लिंग असून त्यातील एक ओंकारेश्वर आणि दुसरे म्हणजे उज्जैन या ठिकाणी आहे. तुम्हाला जर श्रावणातील पहिल्या सोमवारी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायचे असेल तर तुम्ही मध्यप्रदेश राज्यातील या दोनही ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन तुमचे अध्यात्मिक पर्यटन व शिव शंकराच्या दर्शनाची इच्छा पूर्ण करू शकतात.
1- उज्जैन येथील महाकालेश्वरचे दर्शन– यातील जर तुम्हाला उज्जैनला दर्शनासाठी अगोदर जायचे असेल तर तुम्ही कुठल्याही राज्यातून येत असाल तर अगोदर तुम्हाला उज्जैन ला जाण्याकरिता ट्रेनचे तिकीट बुक करावे लागेल व नंतर उज्जैन रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर तुम्हाला या ज्योतिर्लिंगाकडे जाण्यासाठी अनेक टॅक्सी आणि ऑटो मिळतात.
या टॅक्सी किंवा ऑटोच्या मदतीने तुम्ही या मंदिरामध्ये जाऊ शकतात. दर्शन घेतल्यानंतर जर तुम्हाला त्या ठिकाणी राहायचे असेल तर राहण्याच्या देखील स्वस्तात सोयी या ठिकाणी उपलब्ध आहेत.
उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराच्या आजूबाजूला अनेक हॉटेल्स तुम्हाला राहण्यासाठी मिळतात. समजा तुम्ही उज्जैन ला गेले व तुम्हाला जर दोन ते तीन दिवस त्या ठिकाणी राहायचे असेल तर तुम्ही ज्योतिर्लिंगा व्यतिरिक्त त्या ठिकाणी असलेले भैरवनाथ मंदिर, हरसिद्धी माता मंदिर, खजराना गणेश यासारख्या पवित्र ठिकाणी भेट देऊ शकतात.
2- ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग– उज्जैन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी ओंकारेश्वर जाण्याचा प्लान बनवू शकतात. तुम्ही जर एखाद्या हॉटेलमध्ये थांबला असाल तर तुम्ही सकाळी लवकर उठून त्या हॉटेल जवळील टूर्स अँड ट्रॅव्हल्सला भेट देऊन एखादी ऑटो किंवा कॅब बुक करू शकतात
व थेट ओंकारेश्वर मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणचे दर्शन करू शकतात. ओंकारेश्वरला गेल्यानंतर तुम्हाला ज्योतिर्लिंगा व्यतिरिक्त नर्मदा नदीत स्नान करण्याचा आनंद घेता येऊ शकतो तसेच तुम्ही त्या ठिकाणी गोविंदा भागवत पाडा गुहा, केदारेश्वर मंदिर तसेच नगर घाट इत्यादी पवित्र ठिकाणांना भेट देऊ शकतात.