Offer On Smartphone:- जेव्हा आपण स्मार्टफोन घ्यायचा विचार करत होतो तेव्हा साधारणपणे कमीत कमी किमतीमध्ये चांगले वैशिष्ट्ये, उत्तम स्टोरेज असलेला स्मार्टफोन शोधत असतो. तसेच आपल्याला उत्तम फोटोग्राफी करता येईल आणि तो जास्त कालावधीपर्यंत वापरायला टिकेल असा फोन कमी किमतीत मिळवण्यासाठी बरेच जण प्रयत्नशील असल्याचे आपल्याला दिसतात.
बाजारामध्ये सध्या अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोन आपल्याला दिसून येतात आणि त्यातील काही स्मार्टफोन हे कमी किमतीत चांगली फीचर्स आपल्याला प्रदान करतात. जर तुम्हाला देखील असाच कमी किमतीमध्ये चांगला स्मार्टफोन हवा असेल तर तुम्ही Realme C53 या स्मार्टफोनचा विचार करू शकतात.
कारण हा स्मार्टफोन फोटोग्राफीसाठी देखील उत्तम आहे व तो दीर्घकाळ वापरण्यासाठी देखील तितका चांगला आहे व त्याचा लुक देखील आकर्षक आहे. तुम्हाला जर स्वस्तामध्ये चांगला स्मार्टफोन हवा असेल तर तुम्ही हा स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या माध्यमातून घेऊ शकतात. सध्या फ्लिपकार्ट वर बंपर ऑफर सह हा फोन उपलब्ध आहे.
काय आहे Realme C53 स्मार्टफोनवर ऑफर?
या स्मार्टफोनचे सहा जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेले व्हेरिएंट सध्या फ्लिपकार्टवर उपलब्ध असून यावर दोन हजार रुपयांची थेट सवलत मिळत आहे व त्यानंतर हा फोन फक्त दहा हजार 999 मध्ये खरेदी करिता फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आलेला आहे.
एवढेच नाही तर हा फोन खरेदी करण्यासाठी जर तुम्ही फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्ड वापरले तर 5% कॅशबॅक देखील तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तसेच हा फोन तुम्ही ईएमआय वर देखील खरेदी करू शकतात व जर तुम्हाला ईएमआयवर हा फोन खरेदी करायचा असेल तर 387 रुपये महिना प्रारंभिक ईएमआय वर तुम्ही त्याला खरेदी करू शकता.
काय आहेत Realme C53 स्मार्टफोनची वैशिष्ट्ये?
या फोनचे डिझाईन अतिशय स्लिम आणि आधुनिक असून त्याला प्रीमियम लुक देण्यात आलेला आहे. तसेच या फोनचा डिस्प्ले हा 17.12 cm म्हणजेच 6.74 इंचाचा असून तो एचडी डिस्प्ले आहे व त्यामुळे चांगले व्हिज्युअल आपल्याला प्रदान करतो. तसेच यामुळे व्हिडिओ पाहणे व गेमिंग याचा विलक्षण अनुभव आपल्याला येतो.
याचा फ्रंट कॅमेरा 108 मेगापिक्सल+ दोन मेगा पिक्सल ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून तो उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी उत्तम आहे. तसेच यामध्ये आठ मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा असून ज्यामुळे तुम्ही उत्कृष्ट सेल्फी देखील घेऊ शकतात. तसेच या फोनमध्ये T612 प्रोसेसर देण्यात आला असून बॅटरी ही 5000 mAh ची देण्यात आलेली आहे.
साधारणपणे एकदा चार्ज केल्यानंतर दिवसभर बॅटरी टिकते. या फोनमध्ये सहा जीबी रॅम आणि 128 जीबी पर्यंत स्टोरेज आहे. जे डेटा आणि एप्लीकेशन स्टोरेज करण्यासाठी पुरेसे ठरते. एवढेच नाही तर तुम्ही मायक्रो एसडी कार्डचा वापर करून दोन जीबी पर्यंत स्टोरेज वाढवू शकता. त्यामुळे तुम्हाला अधिक डेटा स्टोअर करणे शक्य होते.