महाराष्ट्र मध्ये अनेक महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर असून यामध्ये अनेक छोटे-मोठे महामार्गाच्या समावेश आपल्याला करता येईल. रस्त्यांचा विकास हा राज्याच्या तसेच ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असतो व याकरिताच राज्यात देखील अनेक महामार्गाचे काम सध्या सुरू आह.
आपण मुंबई ते गोवा या महामार्गाच्या कामाबद्दल बघितले तर मागील कित्येक वर्षापासून या महामार्गाचे काम सुरू आहे. त्यासोबतच आता महाराष्ट्राला कोकणात जाण्याकरिता आणखी दोन महामार्ग मिळणार आहेत. कोकणातील पर्यटनाचा विकास व्हावा त्याला चालना मिळावी हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे.
त्यामुळे आता कोकणामध्ये महत्त्वाची असलेली 93 पर्यटन स्थळे जोडले जातील या उद्दिष्टाने एका महत्वपूर्ण सागरी किनाऱ्याचे काम सुरू होणार असून त्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पावले उचलण्यात आलेली आहेत.
रेवस– रेड्डी सागरी किनारा प्रकल्प ठरेल महत्वाचा
महाराष्ट्राला 720 km लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवासादरम्यान समुद्र किनारपट्टी जवळून हा सागरी किनारा महामार्ग बांधला जाणार आहे. या प्रकल्पामुळे कोकण किनारपट्टी लगतचे जे काही पर्यटन आहे त्याला खूप मोठ्या प्रमाणावर चालना मिळण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प किंवा हा रस्ता संपूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यातून जाणार असल्यामुळे प्रवाशांना कोकणाचे वैभव पाहता येणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून रेवस ते रेड्डी असा सागरी महामार्गासाठी निविदा मागवण्यात आले असून या बांधकाम निविदा अंतिम करण्याच्या प्रक्रियेला देखील आता वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये या प्रकल्पाचे काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
कसे आहे या सागरी किनारा मार्गाचे स्वरूप?
रेवस ते रेड्डी हा सागरी किनारा रस्ता अंदाजे 447 किलोमीटरचा असणारा असून हा मूळ सागरी महामार्ग सलग नसणार आहे. या प्रकल्पामध्ये आठ खाडी पूल बांधले जाणार असून त्यावर हा सागरी किनारा मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार बघितले तर बाणकोट, रेवस, दिघी तसेच केळशी, दाभोळ,
वाडा तिवरे आणि भाटे अशा ठिकाणी खाडीपूल उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाकरिता साधारणपणे दहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा पर्यटकांना महाराष्ट्रातील कोकणचे निसर्ग सौंदर्य आणि सुंदर समुद्रकिनारे न्याहाळत प्रवास करता येणार आहे व विशेष म्हणजे रेवस ते रेड्डी सागरी किनाऱ्याच्या माध्यमातून तब्बल कोकणामधील 93 पर्यटन स्थळ जोडले जाणार आहेत.
कधीपर्यंत पूर्ण होणार हा सागरी किनारा प्रकल्प?
साधारणपणे रेवस ते रेड्डी या सागरी किनारा प्रकल्पाचे काम जेव्हा सुरू होईल त्यानंतर पाच वर्षांमध्ये ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. साधारणपणे 2030 मध्ये प्रवाशांना हा सागरी किनारा मार्ग प्रवासासाठी उपलब्ध होऊ शकतो. या सागरी किनारा मार्गावरून मात्र वेगात प्रवास करता येणे शक्य नाही. या ठिकाणी वळणदार मार्ग आणि खाडी पूल असल्यामुळे अति वेगवान प्रवास करणे या ठिकाणी शक्य होणार नाही.