अहो आहात कुठे! वयाच्या 21 व्या वर्षी तुमचा मुलगा होऊ शकतो करोडपती; फक्त ‘या’ फार्मूल्यावर करावे लागेल काम

गुंतवणूक ही देखील व्यवस्थित नियोजनाने केली तरच आपल्याला चांगला फायदा मिळताना दिसून येतो. याकरता गुंतवणुकीचे नियोजन अगदी नेमकेपणाने करणे खूप गरजेचे असते. याच अनुषंगाने आपण या लेखात असा एक सोपा फार्मूला बघणार आहोत तो तुमच्या मुलाला अगदी वयाच्या एकविसाव्या वर्षी देखील करोडपती करू शकतो.

Ajay Patil
Published:

व्यक्ती आयुष्यामध्ये जेव्हा जन्माला येतो तेव्हा कालांतराने त्याच्यावर बऱ्याच गोष्टींच्या जबाबदारीचे ओझे पडायला लागते व या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचे  कर्तव्य पार पाडावे लागते. या जबाबदाऱ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी असते ती म्हणजे मुला मुलींचे भविष्य शैक्षणिक,आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करणे हे होय.

त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आयुष्याच्या अगदी सुरुवातीच्या कालावधीपासून खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करणे गरजेचे असते. मुला मुलींचे  लग्न तसेच त्यांचे शिक्षण इत्यादी करता लागणारा पैसा आपल्या जवळ असणे खूप महत्त्वाचे असते व त्याकरिता योग्य पद्धतीने गुंतवणूक हाच पर्याय तुमच्या कामाला येऊ शकतो.

परंतु गुंतवणूक ही देखील व्यवस्थित नियोजनाने केली तरच आपल्याला चांगला फायदा मिळताना दिसून येतो. याकरता गुंतवणुकीचे नियोजन अगदी नेमकेपणाने करणे खूप गरजेचे असते. याच अनुषंगाने आपण या लेखात असा एक सोपा फार्मूला बघणार आहोत तो तुमच्या मुलाला अगदी वयाच्या एकविसाव्या वर्षी देखील करोडपती करू शकतो.

21×10×12 चा फार्मूला करेल तुम्हाला मदत

तुम्हाला जर तुमच्या मुलाच्या उज्वल भवितव्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर आतापासून गुंतवणूक करणे गरजेचे आहे व त्या गुंतवणुकीसाठी तुम्ही हा फार्मूला जर वापरला तर नक्कीच तुमचा मुलगा 21 व्या वर्षी करोडपती होऊ शकतो. हा फार्मूला मध्ये जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा तुम्हाला एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करून कोट्यावधीपर्यंतचा प्रवास साधता येतो.

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही म्युच्युअल फंडात  गुंतवणूक केली तर तुम्हाला फायदा मिळतो. या फार्मूल्यातील जर आपण अंकांनुसार बघितले तर यातील 21 म्हणजे सलग एकवीस वर्षे गुंतवणूक करणे, या फार्मूल्यातील 10 चा अर्थ बघितल्या तर प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपयांची गुंतवणूक करणे

आणि बारा या अंकाचा अर्थ बघितला तर तुमच्या गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला साधारणपणे 12% चा रिटर्न म्हणजेच परतावा मिळणे असा त्याचा अर्थ होतो. साधारणपणे म्युच्युअल फंडात तुम्ही जे काही पैसे गुंतवतात त्यावर तुम्हाला 12% चा परतावा दिला जातो. त्यामुळे वर दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्ही तुमच्या मुलाला एक कोटी रुपयांचा धनी बनवू शकतात.

 या माध्यमातून तुमचा मुलगा कोटी रुपयांचा धनी कसा होणार?

तुम्ही जर हा फार्मूला वापरला आणि 21 वर्षासाठी प्रत्येक महिन्याला सातत्याने दहा हजार रुपयांची गुंतवणूक केली तर तुमचे 21 वर्षांमध्ये साधारणपणे 25 लाख वीस हजार रुपयांची गुंतवणूक होते व या गुंतवणुकीवर 21 वर्षात जर तुम्हाला 12 टक्के दराने व्याज मिळाले तर 88 लाख 66 हजार 742 रुपयांचे तुम्हाला व्याज मिळते.

म्हणजेच जेव्हा तुमचा मुलगा एकवीस वर्षाचा होईल तेव्हा त्याच्याकडे तूमची गुंतवलेली रक्कम व त्यावर मिळालेले व्याज असे मिळून एक कोटी तेरा लाख 86 हजार 742 रुपये  असतील.

हे पैसे तुमच्या मुलाच्या उज्वल भविष्यासाठी पुरेसे ठरतील यात शंकाच नाही. पन्नास हजार रुपये जर व्यक्तीला पगार असेल तर तो आर्थिक नियोजनाच्या नियमाप्रमाणे त्याच्या पगारातील किमान 20% रकमेची गुंतवणूक करेल व इतकी गुंतवणूक 50 हजार पगार असलेल्या व्यक्तीने करणे गरजेचे असते. पन्नास हजार रुपये पगार असेल तर या 50 हजार रुपयांचे 20% म्हणजेच दहा हजार रुपये गुंतवणूक करणे सहज शक्य होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe