Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

तरुणांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ जिल्हा परिषदेत 612 रिक्त पदांसाठी होणार भरती; वाचा सविस्तर

Zilla Parishad Recruitment Maharashtra : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. वास्तविक स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सववर्षानिमित्त शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून राज्यभरात 75 हजार रिक्त पदांची सरळसेवेने भरती होणार आहे. यानुसार ग्रामविकास विभाग अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद अंतर्गत विविध संवर्गातील जवळपास 18 हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

निश्चितच राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी ही एक आनंदाची बातमी राहणार आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यात देखील जिल्हा परिषद अंतर्गत विविध संवर्गातील जवळपास 612 रिक्त पदे भरली जाणार आहेत. याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एका प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

हे पण वाचा :- गुंतवणूकदार बनलेत मालामाल ! ‘हा’ शेअर ठरला मल्टिबॅगर स्टॉक, एक लाखाचे बनलेत 12 कोटी; कोणता आहे तो स्टॉक, पहा….

यामुळे जिल्ह्यातील तरुणांसाठी लवकरच सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शेकडो बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरी मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार यासाठी आयबीपीएस या कंपनीच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यातील रिक्त पदांसाठी आवश्यक जाहिरातीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

म्हणजेच लवकरच जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेअंतर्गत भरल्या जाणाऱ्या या 612 रिक्त पदांमध्ये दहा टक्के पदे हे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून भरले जाणार आहेत तर 20 टक्के पदे हे अनुकंपाची राहणार आहेत.

हे पण वाचा :- पुण्याच्या शिरेपेच्यात मानाचा तुरा; देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशनं पुण्यात, पहा कोणतं आहे ते स्टेशनं?

खरं पाहता 15 ऑगस्ट 2023 पर्यंत रिक्त पदे भरण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. यामुळे लवकरच जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदांसाठी जाहिरात अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.

यामुळे जिल्हा परिषदेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांनी आतापासूनच तयारी करायची आहे. यासाठी आतापासूनच अभ्यासाच्या तयारीला उमेदवाराने सुरवात करावी तसेच या पदभरती संदर्भात अपडेट जाणून घेण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन वेळोवेळी शहानिशा करत रहावे.

हे पण वाचा :- शिंदे सरकारचा नवीन फंडा ! आता शिक्षकांची बदली होणार नाही? एकाच शाळेत तळ ठोकून बसावं लागणार; दीपक केसरकर म्हणतात…..