Zodiac Sign : जून महिना हा राशीचक्रातील काही राशीच्या लोकांसाठी विशेष खास ठरणार आहे. खरंतर या महिन्यात नवग्रहातील काही महत्त्वाच्या ग्रहांनी राशी आणि नक्षत्र परिवर्तन केले आहे. दरम्यान 22 जून 2025 रोजी पुन्हा एक महत्त्वाचा ग्रह राशी परिवर्तन करणारा आहे.
नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात त्यानुसार 22 जून रोजी बुध ग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे.

बुध ग्रहाचे राशी गोचर झाल्यानंतर राशीचे घरातील काही राशीच्या लोकांचे आयुष्यात अनेक सकारात्मक गोष्टी करताना दिसणार आहेत. काही राशीच्या लोकांचा वाईट काळ या गोचरमुळे समाप्त होईल आणि नवीन सुवर्णकाळाला सुरुवात होणार आहे.
बुध ग्रहाचे कोणत्या राशीत गोचर होणार?
22 जून 2025 रोजी बुध ग्रहाचे कर्क राशीमध्ये गोचर होणार असल्याची माहिती ज्योतिष तज्ञांनी दिली आहे. बुध ग्रह इतर ग्रहांप्रमाणेच एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतो. सध्या बुध मिथुन राशि मध्ये आहे पण आज 22 जून रोजी रात्री ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुध ग्रहाचे कर्क राशि मध्ये गोचर होणार आहे.
आज रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बुध ग्रहाचे राशी गोचर होणार आहे. दरम्यान कर्क राशीत बुध ग्रहाचा प्रवेश झाल्यानंतर हा ग्रह जवळपास 30 ऑगस्टपर्यंत याच राशीमध्ये विराजमान राहणार आहे.
कोणत्या राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश?
धनू : या राशीच्या लोकांसाठी ही वेळ रखडलेली कामे पूर्ण करण्याची आहे. या राशीच्या लोकांचा वाईट काळ आता समर्थ होणार आहे आणि बऱ्याच काळापासून थांबलेली कामगिरी पुन्हा गती घेताना दिसेल.
करिअरवाईज हा काळ फायद्याचा राहणार आहे कारण की नोकरी करणाऱ्यांना प्रमोशनची भेट मिळू शकते. या काळात या लोकांची समाजातील प्रतिष्ठा आणि सामाजिक ओळख यामध्ये वाढ होईल.
नोकरीच्या ठिकाणी चांगली मेहनत घेतली आणि योग्य ते परिणाम मिळाले तर पगारवाढीची सुद्धा शक्यता आहे. मात्र, या काळात आरोग्याला जपणे आवश्यक आहे. दुर्लक्ष न करता तब्येतीची काळजी घेणे गरजेचे राहणार आहे.
कन्या : या राशीच्या जातकांसाठीही आगामी काळ अनुकूल राहणार आहे. व्यवसाय आणि मालमत्तेशी संबंधित क्षेत्रात या लोकांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत आदर आणि मानसन्मान मिळणार अशी आशा आहे.
तसेच समाजातील प्रतिष्ठाही वाढणार आहे. भावंडांशी संबंध सुधारतील आणि यामुळे तणाव कमी होईल. या लोकांचा वाईट काळ आता समाप्त होणार आहे आणि मेहनतीचे योग्य फळ मिळणार आहे.
मेष : या राशीच्या लोकांचा वाईट काळ सुद्धा आता समाप्त होणार आहे. धनु आणि कन्या राशीच्या लोकांप्रमाणेच मेष राशीच्या लोकांनाही या काळात चांगले यश मिळणार आहे. या राशीसाठी हे गोचर सुखदायक ठरणार आहे. आतापर्यंत ज्या काही अडचणी या राशीच्या लोकांना सतावत होत्या त्या सर्व अडचणी दूर होतील.
या लोकांच्या आईचे बिघडलेले आरोग्य या काळात सुधारेल. कुटुंबात सौहार्द निर्माण होईल आणि प्रभावशाली लोकांशी संबंध प्रस्थापित होतील असे संकेत मिळत आहेत. पैशांच्या बाबतीत सुद्धा हा काळ अनुकूल राहणार आहे आणि मालमत्ता विषयक निर्णयांमध्ये यश मिळू शकते.