Patt Cummins Price : शेरास सव्वाशेर…! ऑस्ट्रेलियन खेळाडूंना विक्रमी बोली, काही तासातच कमिन्सवर पडला स्टार्क भारी…. !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Patt Cummins Price : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 साठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी (19 डिसेंबर) दुबईमध्ये झाला. इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या लिलावात इतिहासातील सर्वात मोठी बोली दिसली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. अशा प्रकारे पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. पण त्याचा हा विक्रम काही तासाभरातच मोडला.

कमिन्सचा हा विक्रम वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने मोडला आहे. आता ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले.

कमिन्सला विकत घेण्यासाठी आरसीबीनेही धडपड केली, पण सनरायझर्सने यात बाजी मारली. कमिन्सची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. कमिन्सला विकत घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात जोरदार बोली युद्ध रंगले होते.

खास बाबा म्हणजे, पॅट कमिन्सने या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या दोन आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत. पॅट कमिन्स हा WTC फायनल 2023 चा विजेता कर्णधार देखील होता, तर अलीकडेच विश्वचषक 2023 फायनलचा विजेता देखील पॅट कमिन्स होता.

IPL च्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंची यादी…

पॅट कमिन्स

पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. अशा प्रकारे पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. पण त्याचा हा विक्रमही तासाभरात मोडला. पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटींना विकत घेतले.

मिचेल स्टार्क

कमिन्सचा हा विक्रम वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने मोडला आहे. आता ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले.

सॅम कुरन

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन हा आयपीएल लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा खेळाडू आहे. आयपीएल 2023 च्या लिलावात कुरनने इतिहास रचला होता. या वेगवान अष्टपैलू खेळाडूला पंजाब किंग्ज (PBKS) फ्रँचायझीने 18.50 कोटी रुपयांना विकत घेतले. कुरन सध्या पंजाब किंग्जचा भाग आहे.

कॅमेरॉन ग्रीन

सॅम कुरननंतर, कॅमेरॉन ग्रीन हा लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाच्या या स्टार अष्टपैलू खेळाडूला मुंबई इंडियन्सने (MI) 17.50 कोटींची बोली लावून विकत घेतले. ग्रीन आगामी आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) कडून खेळताना दिसणार आहे. लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने ग्रीनचा व्यवहार केला होता.

बेन स्टोक्स

इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा आयपीएलच्या इतिहासातील चौथा सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याला चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने IPL 2023 च्या लिलावात 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले. स्टोक्सने वर्कलोड मॅनेजमेंटमुळे आगामी आयपीएल हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.

ख्रिस मॉरिस

दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस आयपीएल लिलावात विकला गेलेला चौथा सर्वात महागडा खेळाडू आहे. आयपीएल 2021 च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने (RR) मॉरिसला 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले. त्यानंतर मॉरिसने या प्रकरणात युवराज सिंगला मागे टाकले होते. युवराजला 2015 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने 16 कोटी रुपयांना खरेदी केले होते.

निकोलस पूरन

कॅरेबियन क्रिकेटर निकोलस पूरन या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. मागील आयपीएल लिलावात पूरनला लखनौ सुपर जायंट्सने (एलएसजी) १६ कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले होते. पूरन पुढील आयपीएल हंगामात लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे.

भारतीय खेळाडूंमध्ये युवराज आघाडीवर…

टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग हा लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा भारतीय खेळाडू आहे. युवराजला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 16 कोटींना विकत घेतले. मात्र, 2015 च्या मोसमात युवराज काही विशेष करू शकला नाही. त्याला 14 सामन्यांत 19 च्या सरासरीने केवळ 248 धावा करता आल्या. पुढील हंगामापूर्वी युवराजला फ्रँचायझीने सोडले. युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.

टॉप 5 सर्वात महाग विकले जाणारे भारतीय… 

1. युवराज सिंग (16 कोटी)
2. इशान किशन (15.25 कोटी)
3. गौतम गंभीर (14.90 कोटी)
4. दीपक चहर ( 14 कोटी)
5. दिनेश कार्तिक (12.50 कोटी)