Good News : राज्यातील खेळाडूंनाही आता तिप्पट मानधन प्रतिमहिना मिळणार ७ हजार ५०० रुपये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Good News : क्रीडा क्षेत्रात भूषणावह कामगिरी करणारे खेळाडू राज्य व देशाची शानच असतात. त्यांना सातत्याने प्रोत्साहित करणे प्रत्येक भारतीय त्याचप्रमाणे शासनाचे आद्यकर्तव्यच असते.

त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अतुलनीय कामगिरी करणारे वयोवृद्ध खेळाडूंच्या मानधनातही किताबप्राप्त कुस्तिगीरांप्रमाणेच तब्बल अडीच ते तिपटीने वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे १२ वर्षांनंतर ही वाढ करण्यात आली आहे.

राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अतुलनीय कामगिरी केलेल्या राज्यातील खेळाडूंना सन्मानपूर्वक मानधन देण्याची योजना १० जून १९९३ पासून सुरू झाली. तद्नंतरच्या म्हणजे ५ फेब्रुवारी १९९८ सालीही वाढ करण्यात आली.

ही वाढ सन २०१० आणि २१ डिसेंबर २०१२ लाही सुरूच होती. २०१२ नंतर मात्र खेळाडूंच्या मानधनात वाढच झाली नाही. ही वाढ तब्बल १२ वर्षे रखडली. एक तपानंतर सरकारने राज्यातील खेळाडूंना न्याय देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

२०१२ च्या मानधनाची आकडेवारी पाहिली तर मानधन अतिशय तुटपुंजेच आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तर २५०० रुपये, तर ऑलिम्पिक, जागतिक, अजिंक्य कुस्ती, आशियाई अजिंक्यपद, एशियन गेम्स, राष्ट्रकुल व इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा, अर्जुन पुरस्कार,

हिंद केसरी, रुस्तुम-ए- हिंद, भारत, महान भारत व महाराष्ट्र केसरी विजेत्या खेळाडूंना अवघे ६ हजार रुपये प्रतिमहिना मानधन मिळत आहे. या मानधनात वाढच करण्यात आली नव्हती. परिणामी मानधनवाढीपासून खेळाडू पूर्णपणे वंचित होते.

ही बाब क्रीडाप्रेमींना वारंवार खटकत होती. महायुतीच्या सरकारने मात्र मानधनात वाढ करून एकप्रकारे उत्साहित केले आहे.

■ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना २५०० रुपयांहून आता प्रतिमहिना ७ हजार ५०० रुपये इतके मानधन मिळणार आहे. त्याचप्रमाणे आशियाई व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे मानधन ४ हजारांहून १० हजार रुपये इतके वाढवण्यात आले आहे.

तसेच ऑलिम्पिक, अर्जुन पुरस्कार आणि सर्व केसरी प्राप्त खेळाडूंचे मानधन ६ हजारांहून थेट १५ हजार रुपये केले आहे. राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाची नुकतीच बैठक झाली.

त्या बैठकीत मानधनवाढीचा विषय मंजूर करून त्यास मान्यता देण्यात आली. मानधनात वाढ केल्याने खेळाडू त्याचप्रमाणे क्रीडाप्रेमीकडून समाधान व्यक्त होत आहे.