विराट कोहलीकडे आहेत ‘या’ शानदार 9 महागड्या कार, कार कलेक्शन पाहून थक्क व्हाल | Virat Kohli Car Collection In 2023

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Virat Kohli Car Collection : सध्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ एकदम फॉर्मात आहे. आणि तितकाच फॉर्ममध्ये आहे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली. विराटचा खेळ अप्रतिम आहे. नुकतेच त्याने शतकाच्या बाबतीत सचिन तेंडुलकर याचे रेकॉर्ड मोडले.

सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये त्याची प्रचंड हवा आहे. दरम्यान त्याच्या श्रीमांतरीबाबत , त्याच्या कार कलेक्शनबाबत नेहमीच चर्चा होताना दिसते. अनेकांना प्रश्न पडतो की त्याच्याकडे इतके पैसे आहेत तर मग त्याच्याकडे किती व कोणकोणत्या गाड्या असतील?

तुम्हाला त्याच्याकडे असणाऱ्या गाड्या पाहून प्रचंड आश्चर्याचा धक्का बसेल. त्याच्याकडे बेंटले, ऑडी आणि Lamborghini Huracan सारख्या अनेक कार ची लाईनच आहे. चला आपण त्याचे कार कलेक्शन जाणून घेऊयात –

लॅम्बोर्गिनी Huracan Evo
विराटच्या कार कलेक्शनमध्ये लॅम्बोर्गिनी Huracan Evo इचा देखील समावेश आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 3.22 कोटी रुपये आहे. या कारचे मायलेज म्हणाल तर 7.25 kmpl चे मायलेज ही कार देते. या कारमध्ये 5204 cc चे शक्तिशाली इंजिन आहे.

कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले असून ही 2 सीटर स्पोर्ट्स कार आहे. तिचा 325 किमी/तास इतका टॉप स्पीड आहे. याचे टॉप मॉडेल 3.73 कोटी रुपये किमतीचे आहे. या कारचा एरोडायनाम शेप आहे. यामुळे ही कार अतिशय वेगवान दिसते. या कारची लांबी 4549 मिमी, रुंदी 2236 मिमी आणि व्हीलबेस 2620 मिमी आहे.

Bentley Flying Spur
कोहलीकडे Bentley Flying Spur देखील आहे. या सुपरकारमध्ये 6.0-लिटर टर्बोचार्ज W12 इंजिन आहे. हे 8-स्पीड ड्युअल-क्लच गिअरबॉक्सच्या मदतीने 626 bhp आणि 900 Nm टॉर्क जनरेट करते.

या कार ची किंमत जवळपास 3.41 कोटी रुपये आहे.

ऑडी A8L W12 क्वाट्रो
कोहलीच्या कलेक्शनमधील आणखी एक कार म्हणजे A8L W12 क्वाट्रो. याची किंमत 1.87 कोटी रुपये आहे. या कार चे लॉन्ग व्हीलबेस व्हर्जन आहे आणि यात 6.3 लीटर इंजिन आहे जे

494 एचपी आणि 625 एनएम टॉर्क जनरेट करते.

आणखी काही कार कलेक्शन
वरील कार व्यतिरिक्त कोहलीकडे Audi R8 V10, Audi R8 LMX Limited Edition देखील आहे. या देखील अतिशय शानदार व जबरदस्त कार आहेत. या सोबतच त्याच्या कार कलेक्शन मध्ये Bentley Continental GT Mulliner, Bentley Continental GT Mulliner, Lamborghini Huracan, Audi R8 LMX Limited Edition या चार कार चा देखील समावेश आहे. यावरून लक्षात आले असलं की कोहलीचे कार कलेक्शन देखील तितकेच विराट आहे.