Success Story : गेल्या काही वर्षांपासून नवयुवक शेतकऱ्यांची शेती (Farming) परवडत नाही अशी धारणा बनली आहे. खरं पाहता, गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेतीतून कमाई (Farmer Income) खूपच नगण्य होतं आहे.

अशा परिस्थितीत जर शेतकरी बांधवांनी (Farmer) काळाच्या ओघात शेतीमध्ये (Agriculture) बदल केला आणि मागणी मध्ये असलेल्या पिकांची जर शेती केली तर निश्‍चितच त्यांना करोडो रुपयांची कमाई होणे शक्य आहे. राजस्थान मधील एका प्रयोगशील शेतकऱ्याने (Successful Farmer) देखील हे दाखवून दिले आहे.

मित्रांनो राजस्थानमधील एका कर्तुत्वशील शेतकऱ्याने काळाच्या ओघात बदल करत आपल्या एक हेक्टर शेतजमिनीवर खजूर शेतीच्या माध्यमातून करोडो रुपयांची माय करण्याची किमया साधली आहे. त्यामुळे सध्या अवनिया संपूर्ण राजस्थान तसेच देशात चर्चेचा विषय ठरत आहे. आज आपण देखील या अवलियाची यशोगाथा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया राजस्थान मधील या प्रयोगशील शेतकऱ्यांचा हा भन्नाट प्रयोग (Farmer Success Story).

मित्रांनो राजस्थानमधील केहराराम चौधरी नामक शेतकऱ्याने शेतीमधून करोडो रुपयांची कमाई केली आहे आणि ज्या लोकांना शेती परवडत नाही असे वाटते त्यांच्यासाठी आरसा दाखवण्याचे कार्य केले आहे. या प्रयोगशील शेतकऱ्याने खजुराच्या लागवडीत हात आजमावला आणि त्यांना नशिबाने साथ दिली.

त्यांनी सात हेक्टरमध्ये खजुराच्या लागवडीतून कोट्यवधींची कमाई करून त्यांनी शेती हा तोट्याचा सौदा नाही हे दाखवून दिले आहे. निश्चितच केहराराम यांनी शेतीचा व्यवसाय योग्य पद्धतीने केला तर त्यातून कोट्यवधी रुपयांची कमाई होऊ शकते हे जगाला दाखवून दिले आहे.

सात एकर क्षेत्रात खजुराची सेंद्रिय शेती अन पट्ठ्या बनला करोडपती 

मित्रांनो केहरा राम चौधरी राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील दाता गावातील प्रयोगशील शेतकरी आहेत. शेतकरी केहराराम चौधरी हे एक यशस्वी आणि समृद्ध शेतकरी असून शेतीमध्ये कायमचं नवनवीन प्रयोग राबवत असतात. मीडिया रिपोर्ट नुसार, केहराराम यांच्याकडे एकूण 7 हेक्टर जमीन आहे. यामध्ये त्यांनी शेतीमध्ये बदल करण्याचा निश्चय केला आणि जगभरात शेतीसाठी विख्यात इस्रायली तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे ठरवले.

या अनुषंगाने केराराम यांनी खजुराची सेंद्रिय शेती केली आहे. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि नफ्याचे प्रमाण वाढविण्यासाठी त्यांनी सेंद्रिय तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून त्याचे चांगले परिणाम मिळत आहेत. या तंत्राने ते सामान्य शेतकऱ्यापेक्षा जास्त नफा कमावत आहेत. सेंद्रिय शेतीच्या तंत्राने उत्पादित केलेल्या भाज्या आणि फळांना बाजारात चांगली किंमत मिळते. त्यामुळे लागवडीचा खर्च कमी होऊन चांगला नफा मिळतो असे मत केराराम यांनी व्यक्त केले आहे.

केहराराम यांनी अशी सुरु केली खजुराची शेती

केहराराम यांनी दहा वर्षांपूर्वी डाळिंबाची लागवड सुरू केली. त्यांना पहिल्याच प्रयत्नात डाळिंब लागवडीत यश आले आणि चांगले उत्पादन मिळाले. हे पाहून इतर शेतकऱ्यांनीही डाळिंबाची लागवड सुरू केली आणि आज परिस्थिती अशी आहे की, दाते गावासह जिल्ह्यातील शेकडो शेतकरी डाळिंबाची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. येथून मोठ्या प्रमाणात डाळिंब इतर ठिकाणी पाठवले जात आहे.

डाळिंबानंतर खजूर लागवडीत हात आजमावला

डाळिंबाच्या यशस्वी लागवडीनंतर केहराराम चौधरी यांनी खजूर लागवडीत हात आजमावला आणि त्यातही त्यांना यश मिळाले. आज केहराराम चौधरी यांच्यासह जालोर येथील दाता गावातील शेतकरी खजूराच्या शेतीतून मोठी कमाई करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, केहराराम चौधरी यांच्यासह जालोर येथील दाता गावातील शेतकऱ्यांनी 5 वर्षांपूर्वी उद्यान विभागाकडून 3500 रुपये खर्चून 2 विविध प्रकारच्या खजुराच्या 600 रोपांसह खजुराची लागवड सुरू केली होती. आता ही खजुराची रोपे परिपक्व झाली असून, त्यातून शेतकऱ्यांना भरपूर पैसे मिळत आहेत. निश्चितच केराराम चौधरी यांनी इतर शेतकऱ्यांना यशस्वी होण्यासाठी प्रेरित केले आहे.