Successful Farmer: शेती व्यवसायात (Farming) गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांना (Farmer) सातत्याने तोटा सहन करावा लागत असल्याने शेतकरी बांधव आता शेतीऐवजी नोकरी व उद्योगधंद्याला प्राधान्य देत असल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे. राज्यात असे अनेक शेतकरी आहेत जे वारंवार शेतीमध्ये तोटा येत असल्याने शेत जमिनी विकू लागले आहेत.

मात्र जमीन विकायची नसते तर जमीन राखायची असते या डायलॉगप्रमाणे पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने लाखो रुपयांचा तोटा आल्यावर देखील न खचता शेती सुरूच ठेवली आणि शेवटी या प्रयोगशील शेतकऱ्याला शेतीतून लाखो रुपयांची कमाई (Farmer Income) झालीचं. इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथील प्रयोशील शेतकरी आणि गावचे पोलीस पाटील संतोष लक्ष्‍मण शिंगाडे यांनी काळाच्या ओघात शेतीमध्ये (Agriculture) बदल करत विदेशी भाजीपाला पिकवण्याची (Vegetable Farming) किमया साधली आहे.

या प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या अवघ्या दीड एकर क्षेत्रात आईस बर्ग या विदेशी भाजीपाल्याची लागवड करून तब्बल अकरा लाखांची कमाई करून दाखवली आहे. यामुळे सध्या पंचक्रोशीत पाटलांची चांगलीच चर्चा रंगली आहे. पाटलांनी शेतीत केलेला हा बदल आणि झालेली लाखो रुपयांची कमाई यामुळे सर्वत्र पाटलांचे कौतुक केले जात आहे. यामुळे पाटलांच्या आनंदाला सीमा राहिलेली नाही आणि त्यांनी आत्मविश्वासाने आता ब्रोकोली या विदेशी भाजीपाल्याची लागवड केली आहे.

खरं पाहता पाटील पूर्वी ऊस या नगदी पिकाची लागवड करायचे तसेच त्याच्या जोडीला गोपालन देखील करत होते. मात्र त्यांना समाधानकारक असे यश मिळत नसल्याने पाटील यांनी भाजीपाला शेती करण्यास सुरुवात केली आणि त्या अनुषंगाने सुरुवातीला ढोबळी मिरची पिकवली. तसेच याच्या सोबत पाटलांनी खरबूज या हंगामी पिकांची देखील लागवड केली मात्र यात त्यांना अडीच लाखांचे नुकसान सहन करावे लागले.

मात्र, बळीराजा हा कधीच खचत नसतो पाटील देखील खचले नाहीत आणि त्यांनी एका मित्राच्या सल्ल्याने आईसबर्ग या विदेशी भाजीपाल्याची लागवड केली. खरं पाहता भाजीपाला शेती पाटलांसाठी नुकसानदायक ठरली होती. मात्र शेतीत बदल करण्याचे महत्त्वाचे आहे म्हणून पाटलांनी आईसबर्ग या विदेशी भाजीपाल्याची शेती सुरू केली. त्यांनी यापिकाची रोपे मागवली मात्र त्यांना याच्या शेतीची माहिती नव्हती. त्यांनी ऐन उन्हाळ्यात मे मध्ये याची लागवड केली.

गतवर्षी तापमान अधिक असल्याने त्यांच्यापुढे पाण्याचा प्रश्‍न उभा राहिला मात्र त्यासाठी त्यांनी तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केला आणि चांगले उत्पादन मिळवले.  खरं पाहता, आईसबर्ग पिकं दोन महिन्यात काढणीसाठी तयार होते मात्र पाटील यांचे आईसबर्ग अवघ्या दीड महिन्यात काढणीसाठी आले.

आईसबर्ग विक्रीसाठी त्यांनी नाशिकच्या एका व्यापाऱ्याशी संपर्क साधला. आईसबर्गला त्यावेळी दोनशे रुपये किलोचा दर होता. मात्र पाटील यांचे आईसबर्ग उन्हामुळे होरपळून निघल्याने त्याच्या पिकाला दीडशे रुपयेपर्यंत दर मिळाला. दीड एकरात दहा टन एवढे उत्पादन झाले आणि त्या बदल्यात त्यांना सव्वा अकरा लाख रुपये निव्वळ नफा राहिला.