अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-  स्नेहबंध फाउंडेशनने नगर शहर हिरवाईने फुलवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून वृक्षारोपण करुन अनेक झाडे जगवली आहेत. हरित नगरसाठी ‘स्नेहबंध’चे पाठबळ महत्वाचे आहे, असे प्रतिपादन उपमहापौर गणेश भोसले यांनी केले.

स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने सावेडी येथील केशवराव गाडीलकर विद्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले, त्या वेळी उपमहापौर बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रा.माणिक विधाते, गटनेते संपत बारस्कर, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, नगरसेवक डॉ.सागर बोरुडे, स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे, फुले ब्रिगेड अध्यक्ष दिपक खेडकर, फार्मसी कौन्सिल अध्यक्ष मनोज खेडकर, ओबीसी सेल अध्यक्ष अमित खामकर,

शाळेचे अध्यक्ष नामदेव गाडीलकर, माध्यमिक विभाग मुख्याध्यापक बाबासाहेब शिंदे, प्राथमिक विभाग मुख्याध्यपिका मनीषा बनकर, मनीषा डुमरे, सचिन पेंडुरकर, विशाल जगताप, संकेत शेलार आदी उपस्थित होते. उपमहापौर भोसले म्हणाले, पर्यावरणाप्रती प्रत्येकाच्या मनात आस्था रुजली पाहिजे. कोरोनाने पर्यावरणासह ऑक्सिजनचे महत्त्व जगा समोर आणले. वृक्ष जगले,

तर सजीव सृष्टी टिकणार असल्याचे उपमहापौर भोसले म्हणाले. स्नेहबंधचे अध्यक्ष शिंदे म्हणाले, जगण्यासाठी अन्न, पाणीपेक्षा अधिक महत्त्वाचा ऑक्सिजन आहे. मात्र ऑक्सिजन देणारे झाडे लावण्यासाठी सर्वसामान्य नागरिक पुढाकार घेत नाही.

जगण्यासाठी झाडे लावून आपणच आपली सोय करण्याची गरज आहे. सर्वांनी नियोजन करुन वृक्षरोपण चळवळीत योगदान देण्याचे आवाहन शिंदे यांनी केले.