राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मुर्मू आज मुंबईत; पण ‘मातोश्री’वर जाणार नाहीत!

मुंबई : एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आज मुंबईमध्ये येणार असून भाजप आणि शिंदे गटाच्या आमदरांसोबत त्यांची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवेसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. द्रौपदी मुर्मू या मातोश्रीवर जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराने मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव … Read more

ठाकरे गटाला मोठा धक्का; सेनेच्या १५ खासदारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील ५५ पैकी तब्बल ४० आमदारांच्या साथीने बंड पुकारले आणि या सर्वांच्या बंडखोरीमुळे राज्यात नवा सत्ताबदल झाला. या बंडखोरीने हैराण झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या तब्बल १५ खासदारांनी बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर … Read more

भाजपला दूर ठेवण्यासाठी आगामी निवडणूक एकत्र लढणार; शरद पवारांची घोषणा

मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी सेनेत मोठी फूट पाडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कार्यकारणी बैठक घेतली. या बैठकीमध्ये शिवसेनेसोबतच आगामी निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकत्र लढणार’ … Read more

जिथं आपली ताकद जास्त तिथं कोणाचीही मदत न घेता जागा लढवायची- अजित पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आढावा बैठक पार पाडली. या बैठकीमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ‘आज अनेक पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भाषणे केली. पण आपापल्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसची जागा निवडून येण्याची खबरदारी सर्वांनी घ्यावी’, असे आवाहन अजित पवारांनी केले. ‘राज्यात कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या तर त्या लढविण्याची … Read more

“जो पक्षाचा अन् पक्षप्रमुखांचा निर्णय असतो, त्याच्यासोबत संजय राऊत”

मुंबई : राज्यात शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजपचे सरकार आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. ‘जो पक्षाचा आणि पक्षप्रमुखांचा निर्णय असतो, त्याच्यासोबत मी असतो. संजय राऊत नाराज असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही’, असा दावा शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणाले आहेत. शिवसेनेने यापूर्वी अनेकदा राजकारणापलिकडे जाऊन निर्णय … Read more

“उद्धवसाहेबांना आता शरद पवार जवळचे झालेत अन् आम्ही दूरचे”

मुंबई : शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे गट पडल्याने अवघ्या महाराष्ट्रात या विषयी अनेक चर्चा रंगल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्देशानंतर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिवसेनेच्या बंडखोर गटाने मुंबईत पत्रकार परिषदेत आयोजित केली होती. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी बोलताना एक खंत बोलून दाखवली आहे. ‘कुटुंब प्रमुखाने मार्ग काढायचा असतो. मुलांनी मार्ग काढायचा नसतो. … Read more

धनुष्यबाण नेमका कोणाचा? सेनेच्या ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे धाव

मुंबई : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धुनष्यबाण यावरुन आता शिवसेनेच्या दोन गटांमध्ये कलगितुरा रंगला आहे. दोन्ही गटाकडून धनुष्यबाणावर आपला हक्क बजावला जात आहे.शिवसेनेच्या हातून धनुष्यबाण जाण्याची चिन्ह दिसत असतानाच आता शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत एक याचिका दाखल केले आहे. शिवसेनेने केलेल्या याचिकेमध्ये त्यांनी ‘आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ … Read more

औरंगाबादच्या नामांतराला पवारांचा विरोध? संजय राऊत म्हणाले…

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजप सत्तेत येण्यापूर्वीच्या ठाकरे सरकारने औरंगाबद शहराचे नामांतर करुन संभाजीनगर असे केले. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत काही माहिती किंवा चर्चा झाली नसल्याचे म्हंटले. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्न विचारले असता संजय राऊतांनी या प्रश्नाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवारांनी एवढंच म्हटले आहे की … Read more