अहमदनगर जिल्हा बँकेत मनमानी कारभार ! स्वतःच्या हव्यासापोटी १ कोटी रूपयांच्या वाहनांची खरेदी

अहमदनगर जिल्हा बँकेमध्ये झालेल्या मनमानी कारभाराची ईडीद्वारे चौकशी झाल्यास भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे बाहेर पडतील. बँकेचे अध्यक्ष मनमानी कारभार करीत आहेत. स्वतःच्या हव्यासापोटी १ कोटी रूपयांच्या दोन वाहनांची खरेदी करण्यात आली असून अनेक कारखान्यांना बोगस कर्ज वाटप करण्यात आले, याद्वारे सहकारात आशिया खंडात अग्रगण्य असलेल्या नगर जिल्हा बँकेला डबघाईत लोटण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका माजी राज्यमंत्री … Read more

Chandrasekhar Ghule : नगरच्या राजकारणाला वेगळे वळण! नगर जिल्हा बँकेतील पराभव जिव्हारी, चंद्रशेखर घुले राष्ट्रवादी सोडणार?

Chandrasekhar Ghule : अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अवघ्या एका मताने अध्यक्षपद हुकणे, यामुळे व्यथित झालेले राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले वेगळा निर्णय घेण्याच्या विचारात आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर आता मंगळवारी शेवगावमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ते आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगण्यात येते. यामुळे नगरमध्ये राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. ते … Read more

हार्ट अटॅक ब्रेन स्ट्रोक नंतर पाच महिने बेशुद्ध, विदेशी डॉक्टरांचे प्रयत्न व्यर्थ, पवारांच्या शिलेदाराचे दुःखद निधन

Uday Shelke : अहमदनगर जिल्ह्यातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय गुलाबराव शेळके (वय ४६ वर्ष) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. यामुळे अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. उद्या सकाळी ११ वाजता पिंप्री जलसेन (ता. पारनेर) या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात … Read more

ब्रेकिंग : अहमदनगर जिल्हा बँकेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ कोटी रूपयांची मदत !

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ कोटी रूपयांची मदत दिली. राज्यातील कोरोना व्यवस्थापनासाठी सरकार करत असलेल्या कामाला बँकेनेही या माध्यमातून हातभार लावला आहे. बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, उपाध्यक्ष माधवराव कानवडे व संचालक मंडळाच्या उपस्थितीत एक कोटी रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more

शासनास चुकीची माहिती देऊन फसवणूक करणार्‍या बँकेवर कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने शासकीय, प्रशासकीय व न्याय व्यवस्थेवर दबाव टाकून मागासवर्गीय अनुकंपा धारकांना नोकरीपासून वंचित ठेवल्याचा आरोप करुन अनुकंपा धारकांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्याच्या मागणीसाठी दि.1 मे महाराष्ट्र दिनी राष्ट्रपती भवन समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. वाढत्या कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असून, … Read more

आमदार राजळे जिल्हा बँकेत उपाध्यक्ष होणार?

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली यामध्ये १७ उमेदवार बिनविरोध झाले तर चार उमेदवारांसाठी निवडणूक झाली. जिल्ह्याच्या राजकीय दृष्टिकोनातून जिल्हा सहकारी बँकेला मोठे महत्त्व असून, या बँकेच्या उपाध्यक्षपदी पाथर्डी शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय पटलावर सुरू झाली आहे. जिल्हा सहकारी बँकेमध्ये … Read more

जिल्हा बँक निवडणूक ! फोडाफोडीचे राजकारण परंपरा यावेळी देखील कायम

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कर्जत तालुक्यामधून आ. राधाकृष्ण विखे गटाचे अंबादास पिसाळ ३७ मते मिळाली. तर विरोधी महाविकास आघाडीच्या उमेदवार साळुंके 36 मते मिळाली. यात एक मताने साळुंके यांचा पराभव झाला. यावरून तालुक्यातील जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतांच्या फोडाफोडीचे राजकारण परंपरा यावेळी देखील कायम राहिली. दरम्यान जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदानाच्या … Read more

‘त्यांना’ धडा शिकविण्यासाठी हा खेळ केला; मात्र यात आमच्या सारख्या सर्वसामान्याचा बळी गेला!

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी बरोबर असलेल्या काही लोकांमुळे आमचा पराभव झाला. आ रोहित पवार यांना निशाणा करण्यासाठी तसेच त्यांना धडा शिकविण्यासाठी त्याच्याच पक्षाच्या काही नेत्यांनी आमच्या खांद्यावर बंदूक हा खेळ केला आहे. मात्र त्यांच्या या जिरवाजिरवीत आमच्या सारख्या सर्वसामान्याचा बळी गेला आहे. या पराभवाचे   आ.रोहित पवार यांच्यासह सर्वांनाच … Read more

जिल्हा बॅंकेसाठी पहिल्या दिवशी २३ जणांनी नेले १५३ अर्ज !

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणूक कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार या महत्वपूर्ण निवडणुकीच्या निवडणूक निर्णय अधिकारी पदाची सूत्रे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार दि.२५ जानेवारी पर्यंत आहे. काल … Read more