‘आम्ही शिवसेनेची विचारसरणी सहन करु, पण भाजपाला अजिबात नाही…’

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- आम्ही शिवसेनेची विचारसरणी सहन करु शकतो, पण भाजपाला अजिबात नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आता धोक्यात आलं आहे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले, अजिबात नाही. भाजपाला … Read more

राजकीय पुढाऱ्याचे वाभाडे काढल्याने बाळासाहेब नाहाटा यांना अटक !

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-श्रीगोंद तालुक्यातील लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतमधील अनियमित कामामध्ये ग्रामपंचायत सरपंच रामदास ठोंबरे यांच्यावर अपात्रेची कारवाई करणे संदर्भात प्रस्ताव का केला अशी विचारणा करत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी शिवीगाळ करत दमबाजी केली आणि गटविकास अधिकारी काळे यांचे दिशेनं बूट फिरकवला. या … Read more

ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारणी लवकर होईल यासाठी कार्यवाही करा

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरोग्य सेवांचे बळकटीकरण केले जात आहे. त्याचबरोबर प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प आणि अतिरिक्त पन्नास बेडस् व्यवस्था कऱण्याचे काम सुरु आहे. हे काम गतीने पूर्ण करण्याच्या निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी आज दिले. त्याचबरोबर, खासगी रुग्णालयांनीही … Read more

म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने लावला साठ हजारांचा चुना !नगरमधील एकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- राज्यात सध्या कोरोना पाठोपाठ म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आधीच कोरोनामुळे बेजार झालेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या वाढत आहेत. मात्र या बिकट अवस्थेत देखील काहीजण संकटात असलेल्या नागरिकांना आधार देण्याऐवजी त्यांची लूट करत असल्याचे समोर आले आहे. असाच प्रकार शिरुर तालुक्यातील पाबळ येथे घडला. येथील एका इसमाला … Read more

तरुणाचे अपहरण करून केले कोयत्याने वार !

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- विद्देचे माहेरघर असलेल्या पुण्यात दिवसेदिवस कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे. नुकतीच भरदिवसा एक तरुणाचे अपहरण करून त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. अनिकेत घायतडक याचा काही दिवसांपूर्वी खून झाला होता. मात्र आपल्या भावाच्या खून प्रकरणात तरुणाच्या मित्राचा हात असल्याच्या संशयातून सागर घायतडक याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने … Read more

विवाहितेची गळफास घेऊनआत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- कुटुंबातील सदस्याची संख्या जास्त असल्याने खूप जास्त काम पडते त्यामुळे पतीला वेगळं सुचवलं मात्र पती कुटुंबीयापासून वेगळं राहत नाही, आणि मला काम होत नाही म्हणून मी आत्महत्या करीत आहे. यात पतीचा काहीही संबंध नाही अशी चिठ्ठी लिहून एका विवाहितेने बेडरूममध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पपिता राहुल वानखेडे … Read more

सरकारकडूननिधी वाटपात ‘दुजाभाव’ भाजपच्या या आमदाराचा घणाघाती आरोप!

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- या सरकारकडून निधी देतांना अतिशय वेगळी वागणूक आपल्याला दिली जाते. ज्या ठिकाणी भाजपचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना एक कोटी तर त्यांचे लोकप्रतिनिधी ज्या ठिकाणी आहेत त्यांना पाच ते सहा कोटी दिले जातात. जामखेड,कर्जत, पारनेर, नेवासे, अकोला, संगमनेर यांच्यासाठी पाच ते आठ कोटी तर शेवगाव – पाथर्डी, राहता व श्रीगोंदा … Read more

गटविकासअधिकाऱ्यास चक्क जीवे मारण्याची धमकी! बाजार समितीच्या ‘त्या’ माजी सभापतीला अटक ….

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :-ग्रामपंचायतमधील अनियमित काम केल्या प्रकरणी सरपंचावर अपात्रेची कारवाई करण्या संदर्भात प्रस्ताव का केला? अशी विचारणा करत. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना बाजार समितीचे माजी सभापती प्रविणकुमार उर्फ बाळासाहेब नाहाटा यांनी अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन अधिकाऱ्यावर बुट फिरकवल्या प्रकरणी नाहाटा याच्यावर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा … Read more

साईसंस्थानचे संभाव्य नव्या मंडळात स्थानिकांचा प्राधान्याने विचार व्हावा

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- साईसंस्थानचे संभाव्य नव्या मंडळात स्थानिकांचा प्राधान्याने विचार व्हावा, अशी मागणी महाविकास आघाडीतील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. साईसंस्थान व ग्रामस्थ यांच्यात महत्त्वाचा दुवा म्हणून भूमिका बजावणारे शिवसेनेचे नेते कमलाकर कोते व त्यांचे सहकारी संजय शिंदे व राहुल गोंदकर, विश्‍वस्तपदाचा अनुभव तसेच साईमंदिरातील दर्शनव्यवस्थेबाबत महत्त्वाचे निर्णय घेणारे डाॅ. … Read more

पाणी प्रश्न मिटणार…सीना नदी खोलीकरणाचे काम प्रगतिपथावर

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवीमधील नदीपात्र खोलीकरणचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. येथील ग्रामस्थांनी मागील वर्षीपासून सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी लोकवर्गणीतून व दानशूर व्यक्तींच्या मदतीतून सीना नदी खोलीकरण कामास सुरुवात केली आहे. पिंपळगाव माळवी परिसर पूर्वीपासून फळे व भाजीपाला पिकविणारा भाग म्हणून प्रसिद्ध आहे. येथील तलावामुळे परिसर शेतीला पाणी उपलब्ध … Read more

कोरोना लढाईचा महत्वपूर्ण टप्पा…१८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविणे अत्यंत महत्वाची बनली आहे. यातच आता देशाने कोव्हिड 19 विरुद्धच्या लसीकरण मोहिमेच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात प्रवेश केला आहे. १८ वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांचे मोफत लसीकरण केले जाणार आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली. प्रारंभी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, … Read more

दारू-मटका, जुगार अड्ड्यांवर छापे पोलिसांचे छापा सत्र

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दोन ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर छापा टाकला. मुद्देमालासह दोन जणांना ताब्यात घेतले. पहिली कारवाई देवळाली प्रवरा येथील बाजार तळावर केली. याठिकाणी आरोपी राजू जबाजी पंडित (वय 45 वर्षे, रा. देवळाली प्रवरा) हा मटका नावाचा जुगार … Read more

दहशत माजवणारा ‘तो’ नरभक्षक बिबट्या अखेर पिंजऱ्यात

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- पाथर्डी तालुक्यांतील जवखेडे खालसा येथील सरगड वस्तीवर धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यात आला आहे. भक्ष्य व पाण्याचा अभाव यामुळे वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ लागले आहेत. मात्र, लपायला जागा नसल्यामुळे तसेच भक्ष्य मिळविण्यासाठी बिबट्या माणसांवर हल्ले करू लागला आहे. यातच पठारी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्याने … Read more

सरकारी नौकरी लावून देतो असे भासवून तरुणाला 18 लाखांना गंडवले

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- सरकारी विभागात नौकरी लावून देतो असे अमिश दाखवून तब्बल 18 लाख 47 हजार 700 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अकोले मध्ये घडला आहे. याबाबत अकोले पोलीस स्टेशनला शेखर नंदू वाघमारे (वय 30,रा.अकोले पोलीस स्टेशनच्या मागे अकोले) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन गंगाधर जोंधळे (रा.कोकणगाव,तालुका,संगमनेर), विजयकुमार श्रीपती पाटील … Read more

जागेच्या वादातून दोन गटात तूफान हाणामारी; परस्परविरोधी फिर्यादी दाखल

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- जागेच्या वादातून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना नगर तालुक्यातील इमामपूर येथे घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. पहिली फिर्याद:-  याबाबत अधिक माहिती अशी कि, भगवान बाेठे यांची आई इमामपूर येथील शेतातील बांधाच्या बाभळी तोडत असताना तुकाराम यशवंत टिमकरे, उदय रामदास टिमकरे, रामदास … Read more

सोन्याचे दर पुन्हा वाढले ! चांदीही महाग,जाणून घ्या संध्याकाळचा भाव

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-सोमवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ नोंदविण्यात आली. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार सोन्याचे दर गुरुवारी 250 रुपयांनी वाढून 46,277 रुपये झाले. आधीच्या व्यापारी सत्रात सोन्याचा दर 10 ग्रॅम 46,027 रुपये होता. त्याचप्रमाणे चांदी 258 रुपयांनी वाढून 66,842 रुपये प्रति किलो झाली. मागील व्यापारात चांदीची किंमत 66,584 रुपये प्रति किलो होती. आंतरराष्ट्रीय बाजारात मजबुतीमुळे … Read more

संजय राऊत म्हणाले त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत…

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- आघाडीचे सरकार किती उत्तम कार्य करू शकते, याचा आदर्श महाराष्ट्राने घडवला आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेने आता भाजपशी जुळवून घ्यावे असे जे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे, त्यावरून राज्यात मोठेच राजकीय वावटळ निर्माण झाले आहे. … Read more

अहमदनगर क्राईम : कामावरुन काढल्याने आला राग; त्यानं थेट ऑफिस पेटविले !

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- कंपनीने कामावरुन काढल्याचा राग मनात धरुन एका व्यक्तीने कंपनीच्या गाड्या व ऑफिस पेटवल्याची धक्कादायक घटना अहमदनगर मध्ये घडली आहे. पोलिसांनी अखेर त्याला अटक केली आहे. ज्या सिमेंट कंपनीच्या तक्रारीवरून त्याला काढून टाकण्यात आले, त्या कंपनीचे केडगावमधील कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केला. तर ज्या ट्रान्सपोर्ट कंपनीने कामावून काढून टाकले, … Read more