शहरात चोऱ्यांचे सत्र वाढले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह शहरात गुन्हेगारी वाढली आहे. चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याने नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुक्तेश शहरातीक दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. नगर शहरातील तपोवन रोडवरील ढवणवस्तीवर बिरोबा मंदिराजवळ असलेल्या निता सुनील आव्हाड यांचे बंद घर फोडून सात हजारांची रोख … Read more

अनलॉक ! शहरातील शुकशुकाट रस्ते पुन्हा गजबजले

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे लॉकडाऊन अनेकदा कठोर निर्बंध लावण्यात आले होते. नुकतेच कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र आता परिस्थिती काहीशी सुरळीत होत असल्याने जिल्ह्यात अनलॉक करण्यात आला आहे. यामुळे शुकशुकाट असलेली शहरातील रस्ते पुन्हा एकदा गजबजले आहे. अहमदनगर जिल्ह्याचा … Read more

गुटखा विकणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-  महाराष्ट्र राज्यात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी आहे. मात्र राज्य सरकारचा आदेश न पाळता राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे गुटखा व मावा विक्री सुरू होती. ५ जून रोजी फॅक्टरी परिसरात दोन ठिकाणी राहुरी पोलिसांनी छापा टाकून सुमारे ९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. राहुरी फॅक्टरी परिसरातील अमिर शेख … Read more

माझ्या दारू व्यवसायाची माहिती पोलिसांना देतो… आता तुझा काटा काढतो

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक शिवारात एकाने दुसऱ्या व्यक्तीस डोक्यात लोखंडी रॉडने मारुन जबर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एकाजणाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, परेश माधव मुळे (रा. धांदरफळ बुद्रूक) हा त्याच्या घरासमोर त्याचा मित्र भाऊसाहेब संपत कानवडे … Read more

केंद्राची मोठी घोषणा; 80 कोटी नागरिकांना मिळणार मोफत धान्य

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केलं.यावेळी त्यांनी सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला . कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी कडकडीत निर्बंध लादले आहेत. या काळात गरीब जनतेला अथवा हातावर पोट असलेल्या लोकांना अनेक समस्यांना सामेरे जावे लागत आहे. या गरीब जनतेसाठी केंद्र … Read more

ब्रेकिंग न्यूज ! पुण्यात एका कंपनीला भीषण आग; १५ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीतील एसव्हीएस या कंपनीला लागलेल्या भीषण आगीत १५ जणांचा मृत्यू झाला असून, काही कामगार बेपत्ता आहेत. तर, २० कामगारांना वाचवण्यात यश आलं आहे. या कंपनीत सॅनिटायझर बनवण्याचे काम सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे. एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस असं कंपनीचं नाव … Read more

पुरावे देऊनही भिंगारच्या ‘त्या’ डॉक्टरवर कारवाई नाही

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्याबाजारात अडकलेले भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटलच्या डॉक्टर दाम्पत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्यासाठी व्हिडिओ चित्रीकरणाचे पुरावे देऊन देखील कारवाई होत नसल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने जिल्हा प्रशासनास स्मरणपत्र देण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, एप्रिल महिन्यात कोरोना महामारीत रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची मोठ्या … Read more

उसाच्या शेतात बिबट्या आढळला मृतावस्थेत

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून उत्तरेकडील भागामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याचे दिसून आले आहे. यातच अनेकदा भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. यातच राहुरी तालुक्यातील कोंढवड शिवारात उसात नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोंढवड शिवारात दत्तात्रय बाळकृष्ण म्हसे … Read more

मिशन राहत मुळे ७० करोना बाधित कुटुंबांना मिळाले २१ लाख रुपये, बाधीत कुटुंबांना संपर्काचे आवाहन.

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- मिशन राहत अंतर्गत कोरोनामुळे कमावती व्यक्ती दिवंगत झालेल्या परिवारांसमोर सध्या समस्यांचा पर्वत उभा आहे. शासनाकडून बऱ्याच घोषणा झाल्या असल्या तरीही अद्याप बाधित परिवारापर्यंत मदतीचा हात पोहोचलेला नाही. अशा स्थितीत प्रत्येक बाधित परिवारास ३० हजार रुपये मिळण्यासाठी Give India यांच्या सहयोगाने स्नेहालय परिवाराने सुरू केलेले ‘स्नेह सहयोग’ अभियान सर्वस्व … Read more

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने चक्क घोड्यावरून बाजारपेठेत फेरफटका मारत केले तीव्र आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात आज नगर शहरामध्ये आगळेवेगळे आंदोलन काँग्रेसने केले. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह बाजारपेठेत चक्क घोड्यावरून फेरफटका मारत आंदोलन करून नागरिकांचे भाव वाढीवर लक्ष वेधले. बाजारपेठेमध्ये काँग्रेसच्या या अनोख्या आंदोलनाची दिवसभर चर्चा सुरू होती. यावेळी नागरिक आणि व्यापाऱ्यांनी आंदोलकांचे मोबाईल मध्ये … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले फक्त ‘इतके’ रुग्ण जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ८८३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५८ हजार ९५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५३० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

‘माझी वसुंधरा’ पुरस्‍काराने लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीचा सन्‍मान

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- पंचतत्वाचे संवर्धन व जतन करुन शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियान २०२०-२१ अंतर्गत लोणी ग्रामपंचायतीने यश करुन माझी वसुंधरा पुरस्‍कार पटकावला आहे. जागतीक पर्यटन दिनाचे औचित्‍य साधुन मुख्‍यमंत्री ना.उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्‍या हस्‍तें ऑनलाईन कार्यक्रमात सन्‍मान करण्‍यात आला. राज्याच्या पर्यावरण व वातावणीय … Read more

देशात हाहाकार माजला असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सर्वसामान्यांच्या प्रश्‍नावर का बोलत नाही?

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- भांडवलशाही आणि जातीयवादी केंद्रातील भाजप सरकार मुळेच देशाची दुर्दशा झालेली आहे. शेतकरी, युवकांचा रोजगार व कोरोनाच्या गंभीर परिस्थितीने देशात हाहाकार माजला असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या प्रश्‍नांवर का बोलत नसल्याचा प्रश्‍न सामाजिक कार्यकर्ते जालिंदर चोभे मास्तर यांनी उपस्थित केला आहे. मोदी प्रणित भाजप सरकार सत्तास्थानी येण्यास अण्णा … Read more

कोरोना काळातही ग्रामीण भागात पोस्ट कार्यालयाची अविरत सेवा

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- मागील दीड वर्षांपासून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन ठप्प झाले आहे. परंतु अशा आणिबाणीच्या परिस्थितीत ग्रामीण भागातील पोस्ट कार्यालयाची अविरत सेवा सुरु असल्याने सामान्य जनतेला आधार मिळत आहे. अहमदनगर डिव्हीजनमधील कर्मचारी अविरत सेवा देत आहेत. सामान्यांची टपाल पार्सल व त्याचबरोबर पोस्टाने येणारे एटीएम, चेक बुक, … Read more

कुठल्याही राजकीय मदतीविना गावाची कोरोना मुक्ती कडे वाटचाल !

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या तीरावर, प.पु. सुभाषपूरी महाराजांच्या पावन भूमीत, कळसेश्वर देवस्थान च्या निसर्ग रम्य परिसरात अकोले तालुक्यातील कळस बु गावातील युवकांचा “माझ गाव माझी जबाबदारी” या संकल्पनेतून तालुक्यातील प्रथम कोविडं केअर सेंटर उभारून तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील युवकांना प्रेरणा देणारा उपक्रम राबविला, कुठल्याही राजकीय मदतीविना जवळपास ९० रुग्णांना … Read more

शासनाच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवा

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- काँग्रेस पक्षाने कायम गोरगरीब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम केले असून पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी संघटनात्मक पातळीवर चांगले काम करताना शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवा असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची कोरोना परिस्थिती, बी, बियाणे उपलब्धता, त्याचे वाटप व इतर प्रश्नांवर आढावा … Read more

मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाचा पाठपुरावा करावा -बाळासाहेब भुजबळ

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून पाठपुरावा करावा या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चाच्यावतीने शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ आणि पदाधिकार्यांनी पाठविले आहे तर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनाही शिष्टमंडळाकडून निवेदनाची प्रत देण्यात आली. या निवेदनावर श्री.भुजबळ यांच्यासह डॉ.सुदर्शन गोरे, माजी नगरसेवक सुनिल भिंगारे, … Read more

कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार -साहेबराव काते

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- बहुद्देशीय कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव शंकर काते यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव घोरपडे यांनी काते यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र दिले. साहेबराव काते यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य सुरु आहे. काते यांनी मागासवर्गीय समाजाच्या विकासात्मक कार्यात मागील 22 वर्षापासून कार्यरत आहे. … Read more