वाळू तस्कराने घेतला चिमुकल्याचा जीव!

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  संगमनेरात सुरु असलेल्या वाळु तस्करीने काल रात्री एका अडीच वर्षीय बालकाचा बळी घेतला. तर पित्यासह सात वर्षीय बालक गंभीर जखमी झाले आहे.(sand smuggler) या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने दोन तासापेक्षा अधिक वेळ पालिकेच्या शवविच्छेदन गृहाबाहेर ठिय्या दिला होता. मोहम्मद इब्राहीम शेख (वय अडीच वर्ष) असे अपघातालील मृत बालकाचे … Read more

टीईटी घोटाळा ! डेरेंच्या ‘सुखमय’ निवासस्थानाची तब्बल 72 तासांपासून सुरु होते झाडाझडती

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- राज्यात सध्या केवळ आणि केवळ घोटाळे गाजू लागले आहे. दरदिवशी यामध्ये काहीनाकाही घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.(TET Exam Scam) दरम्यान नुकतेच राज्यात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्याबाबत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर मधून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. या घोटाळ्यातील आरोपी संगमनेर येथील रहिवासी सुखदेव डेरे … Read more

धाक दाखवून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडता येणार नाही

st employee news

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  एसटी कर्मचाऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न असल्याने सरकारला न्याय द्यावाच लागेल. कर्मचाऱ्यांच्या लढ्यासमोर सरकारला शेवटी झुकावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांचे संघटन, एकी हेच आंदोलनाचे यश आहे.(ST Workers Strike) धमक्या-धाक दाखवून मेस्मा कायदा लादून व निलंबित करुन आंदोलन चिरडता येणार नाही, असा इशारा विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिला. दरेकर … Read more

चोरट्यांचा धुमाकूळ ! एकाच रात्री तब्ब्ल आठ घरे फोडली

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :-  संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी व आंबी-दुमाला गावात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. म्हसवंडी येथील सात बंद घरे तर आंबी दुमाला येथील एक घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली.(Ahmednagar Crime) यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये कमालीचे दहशत पसरलीआहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील म्हसवंडी येथे मंगळवारी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत लक्ष्मी बाबुराव बोडके, … Read more

चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅव्हल खड्ड्यात जाऊन उलटली

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यातच अनेक अपघात बेशिस्त वाहन चालवल्यामुळे तर काही अपघात खड्ड्यांमुळे होतात. असाच एक अपघात संगमनेर तालुक्यात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅव्हल खड्ड्यात जाऊन उलटली. या अपघातात ट्रॅव्हलचा क्लिनर आणि ट्रॅव्हलमधून प्रवास करणारे चार प्रवासी किरकोळ जखमी झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. … Read more

एकाला मारहाण करत सोन्याची चैन, अंगठी हिसकावून घेतली; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  रस्त्यात टाकलेली लाकडे बाजूला करणार्‍यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार संगमनेर तालुक्यातील राजापूर मध्ये घडला आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संभाजी माधव हासे (वय 52, राहणार राजापुर, ता. संगमनेर ) हे मंगळापूर शिवारातून रात्रीच्या सुमारास … Read more

संगमनेर तालुक्यात बालविवाह रोखला. आई – वडिलांकडून घेतला’ हा’ लेखी जबाब!

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथे ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश आले. आई – वडिलांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून घेत मुलीचा विवाह १८ वर्षे वय पूर्ण झाल्याशिवाय करणार नाही, असा लेखी जबाब लिहून घेण्यात आला. कौठेकमळेश्वर येथे होणारा बालविवाह रोखण्यात यश आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी … Read more

संगमनेरच्या रस्त्यांसाठी १७ कोटींचा निधी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहे. त्यांच्या माध्यमातून विशेष रस्ते दुरुस्ती कार्यक्रमातंर्गत तालुक्यातील रस्त्यांसाठी १६ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी दिली. ते म्हणाले, तालुक्यात विकास कामांचा वेग कायम असून कोरोनातही मंत्री … Read more

आयशर ट्रक पलटी , ट्रक आणि ट्रकमधील मालाचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात बुधवारी (दि.१) पहाटे तीन वाजण्याच्या टायर फुटल्यामुळे मल्चिंग पेपर घेऊन जाणारा आयशर ट्रक पलटी झाला सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. अपघातात ट्रक आणि ट्रकमधील मालाचे नुकसान झाले. नाशिक येथून साताऱ्याला मल्चिंग पेपर घेवून जात असलेला आयशर ट्रक (एम.एच. ४३ यु.८१५९) संगमनेर तालुक्यातील घारगाव … Read more

संगमनेरची कोरोनाबाधित संख्या ३० हजारांजवळ

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- संगमनेरात तीन दिवसात ४६२ रुग्ण आढळल्याने बाधित संख्येत झपाट्याने वाढ होऊन २८,७९५ झाली. शनिवार पर्यंत २७,२६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मृत्यूची संख्या मात्र समजू शकली नाही. प्रशासन सर्व पातळीवर प्रयत्नशील असले तरी ग्रामीण भागात वाढता प्रादुर्भाव पाहता अलगीकरण कक्ष वाढविण्याची गरज भासत आहे. कोरोनाचा कहर नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे अंगलट … Read more

बळीराजा हवालदिल ; जिल्ह्यात टोमॅटोचे भाव गडगडले

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- टोमॅटोचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. लाखो रुपये खर्च करुनही टोमॅटो विक्रीला नेल्यानंतर वाहनखर्चही निघेनासा झाल्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. टोमॅटोचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात हाती येऊ लागले असून, बाजारात आवकही वाढली आहे. मात्र, दर गडगडल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. सध्या टोमॅटोला … Read more

संगमनेर बसस्थानकाला खासगी वाहनांचा विळखा…कारवाईची होतेय मागणी

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- एसटी बसस्थानकात फक्त एसटी बस येणे अपेक्षित असले तरी, कोणीही चालक आपले खासगी वाहने घेवून येतात. स्थानकामध्ये दुचाकी, चारचाकी वाहने कितीही वेळ लावलेल्या दिसतात. अगदी ‘नो पार्किंग’ लिहिलेल्या फलकासमोरही खासगी वाहने लावलेली दिसतात. असाच काहीसा प्रकार संगमनेर बसस्थानकात आढळून येत आहे. अनेकदा चालक त्यांची दुचाकी, चारचाकी वाहने बसस्थानकाच्या … Read more

दोन वर्षांत वीजचोरी करणाऱ्या पाच हजाराहून अधिकांवर महावितरणकडून कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :-  जिल्ह्यातील महावितरणच्या संगमनेर विभागात संगमनेर, अकोले, कोपरगाव आणि राहाता या विभागात दोन वर्षांत वीजचोरी करणाऱ्या ५ हजार ४४३ जणांवर महावितरणकडून कारवाई करण्यात आल्याचे महावितरण कंपनीकडून सांगण्यात आले. वीजचोरांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार… जुना कायदा जाऊन नवीन कायदा आला. वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास घरात कायमचा अंधार होऊ शकतो. तसेच … Read more

अहमदनगर जिल्ह्याच्या या बसस्थानकातील शौचालयाला दिले राणे यांचे नाव !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्याने संगमनेर शिवसेनेने आक्रमक होत, मंगळवारी बस स्थानकासमोर आंदोलन केले. राणे विरोधी घोषणाबाजी व प्रतिमेला जोडे मारत बस स्थानकातील शौचालयाचे राणे असे नामकरण केले. तर सुव्यवस्था भंग करणाऱ्या राणेंवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. सहायक … Read more

मंत्र्यांच्या तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, नागरिक भीतीच्या छायेखाली

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- संगमनेर शहर आणि परिसरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. लहान मुलांवर हल्ले करण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोकाट कुत्री कळपाने फिरत असल्याने रात्री पादचाऱ्यांना फिरणे धोकादायक झाले आहे. या कुत्र्यांना आळा घालण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. मात्र नगरपालिका प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष देत असल्याने … Read more

रूग्न संख्येत झपाट्याने वाढ , अहमदनगर जिल्ह्यातील या गावात जनता कर्फ्यू घोषित

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- संगमनेर तालुक्यातील, पठार भागांमध्ये पुन्हा करोणा महामारीचा उद्रेक बघायला मिळत आहे. मागील आठवड्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी साकुर जिल्हा परिषद गट दहा दिवसासाठी लोक डाऊन घोषित केला होता काही अंशी करोणा महामारीचे पेशंट कमी झाले पण तरी ही साकुर पठार भागातील काही ग्रामपंचायती हद्दीत करोणा महामारी बघायला मिळत आहे … Read more

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणतात ‘या’ कारणामुळे राजहंसला अधिक पसंती

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- दूध व्यवसाय ग्रामीण भागाचा कणा असून सहकारी दूध संघ टिकवणे महत्त्वाचे आहे. खासगी दूध संकलन केंद्राकडून दिशाभूल केली जाते. सहकारी दूध संघ बंद पडले, तर संकलन केंद्र दूध खरेदी करणार नाही. खासगी संघांवर सहकारी दूध संघाचे वचक आहे. स्पर्धेत राजहंस दूध संघाने उत्पादकांचे हित जोपासल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री … Read more

मंत्री थोरात यांच्या प्रयत्नातून ‘येथे’ शंभर बेडचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर !

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :-महसूलमंत्री मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात १०० बेडसह उपजिल्हा रुग्णालयासाठी मंजुरी मिळाली असल्याची माहिती साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली. घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयांमध्ये सध्या ३० अद्यावत बेडची व्यवस्था होती. मागील कोरोना संकटात यामध्ये तात्पुरती वाढ करण्यात आली. यासह ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरही बसवण्यात आले. पाच बायपप … Read more