महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणतात ‘या’ कारणामुळे राजहंसला अधिक पसंती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- दूध व्यवसाय ग्रामीण भागाचा कणा असून सहकारी दूध संघ टिकवणे महत्त्वाचे आहे. खासगी दूध संकलन केंद्राकडून दिशाभूल केली जाते.

सहकारी दूध संघ बंद पडले, तर संकलन केंद्र दूध खरेदी करणार नाही. खासगी संघांवर सहकारी दूध संघाचे वचक आहे. स्पर्धेत राजहंस दूध संघाने उत्पादकांचे हित जोपासल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

रायतेवाडी फाटा येथे सोमवारी संगमनेर तालुका दूध संघाच्या स्वस्त दरात जनावरांची औषधे सुरू केलेल्या मेडिकलच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री थोरात बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, महानंद व राजहंसचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, बाजीराव खेमनर, लक्ष्मण कुटे, आर. बी. राहाणे, साहेबराव गडाख, गणपत सांगळे,

आर. एम. कातोरे, अजय फटांगरे, मिलिंद कानवडे, विलास कवडे, माणिक यादव, भास्कर सिनारे, जनरल मॅनेजर जी. एस. शिंदे, डॉ. सुजित खिलारी, डॉ. पी. बी. पावसे, सुरेश जोंधळे व दूध उत्पादक यावेळी उपस्थित होते. थोरात म्हणाले, दूध व्यवसाय संगमनेर तालुक्याचा प्रमुख व्यवसाय आहे.

येथे दररोज ६ लाख लिटर दुधाचे उत्पादन होते. यामुळे येथील ग्रामीण अर्थव्यवस्था भक्कम आहे. राजहंसने स्वच्छ व निर्मळ गुणवत्तापूर्ण दुधाची परंपरा जपल्याने राजहंसला अधिक पसंती आहे. सहकार शेतकऱ्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. सहकारी संघांनी स्पर्धेला सामोरे गेले पाहिजे.