केंद्र सरकारने लॉन्च केले नवीन ऑनलाइन पोर्टल! पेन्शनधारकांना मिळतील ‘या’ सुविधा

Ajay Patil
Published:
integreted pensioners portal

पेन्शन धारकांना पेन्शनच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी सुलभ व्हाव्या याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने इंटिग्रेटेड पेन्शनर पोर्टल नावाचे ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आलेले असून या पोर्टलच्या माध्यमातून आता पेन्शनधारकांना अनेक सुविधा मिळणार आहेत व त्यामुळे पेन्शनधारकांना खूप मोठा फायदा होणार आहे.

सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांना पेन्शनच्या संबंधित ज्या काही सेवा दिल्या जातात त्यामध्ये पारदर्शकता व कार्यक्षमता यावी याकरिता खास करून हे पोर्टल लॉन्च करण्यात आलेले आहे. त्यामध्ये आता सेवानिवृत्त लोकांना त्यांच्या पेन्शन मंजुरीबाबत मेसेज किंवा ई-मेलच्या माध्यमातून माहिती दिली जाईल व जेणेकरून त्यांना या संपूर्ण प्रक्रियेची माहिती प्राप्त होण्यास मदत होईल.

 इंटिग्रेटेड पेन्शनर पोर्टल म्हणजे नेमके काय आहे?

इंटिग्रेटेड पेन्शनर पोर्टल हे आता पाच बँकांच्या पेमेंट सेवा आणि पेन्शन प्रक्रिया एकाच प्लॅटफॉर्मवर म्हणजेच एकाच ठिकाणी आणण्यास मदत करणार असून पेन्शनच्या संबंधित ज्या काही सेवा आहेत त्या आता डिजिटल करण्याकरिता व पेन्शनधारकांचे प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी हे पोर्टल खूप मदत करणार आहे.

या पोर्टलमध्ये पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक आणि सेवा संबंधित संपूर्ण तपशील समाविष्ट केला जाऊ शकतो. या पोर्टलच्या मदतीने आता पेन्शनची प्रक्रिया आणि पेमेंट पूर्णपणे डिजिटल करण्याच्या उद्देशाने पाऊल उचलण्यात आलेले आहे. यामध्ये आता रिटायर्ड झालेल्या व्यक्तीला त्याची कागदपत्रे ऑनलाईन जमा करण्याची, कागदपत्रे डीजीलॉकर वर पाठवण्याची आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये पीपीओ जारी करण्याची सुविधा मिळणार आहे.

इंटिग्रेटेड पेन्शनर पोर्टल सुरू झाल्यानंतर आता स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक या पाच बँकांचे संबंधित पेन्शन घेणारे जे पेन्शनधारक आहेत त्यांना पेन्शनशी संबंधित महत्त्वाचा तपशील जसा की जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची स्थिती,

फॉर्म 16 आणि प्राप्त झालेल्या रकमेचा तपशील व पेन्शनची स्लिप यामध्ये पाहता येणार आहे. अगोदर ही सुविधा फक्त स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पेन्शनधारकांसाठीच उपलब्ध होती. म्हणजेच आता या पोर्टलच्या माध्यमातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची मासिक पेन्शनची स्लिप पाहता येणार आहे व त्यासोबत जीवन प्रमाणपत्र आणि फॉर्म 16 जमा करण्याची स्थिती देखील पाहता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe